Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘जितो स्कूल’ची शहरात सुरुवात

$
0
0
आजच्या आधुनिक युगात शालेय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्थेची उभारणी ‘इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन’ (जितो) संस्थेने केली आहे. आधुनिक शिक्षण संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देणे शक्य होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.

फिरण्यासाठी तो चोरायचा दुचाकी

$
0
0
गुन्हे शाखेच्या प‌थकाने शहरातून दुचाकीचोराला सोमवारी दुपारी अटक केली आहे. या आरोपीकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. केवळ वीस दिवसांत फिरण्यासाठी आरोपीने या दुचाकी चोरल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली.

मेडिकलचे दुकान फोडताना चोरटा ताब्यात

$
0
0
मेडिकल दुकानाचे छत फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला दुकान मालकाने रंगेहाथ पकडले. रविवारी रात्री अकरा वाजता एन २ भागात हा प्रकार घडला.

विमा घोटाळ्याचा तपास आव्हानात्मक

$
0
0
शहरात पोलिस उपायुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर हाती घेतलेल्या नवजीवन विमा कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळयाचा तपास करताना अनेक अडचणी आल्या. पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांनी तर आरोपीला पूर्वीच क्लीनचीट दिली होती.

संग्रामनगर उड्डाणपूल मजबूत

$
0
0
संग्रामनगर उड्डाणपुलाच्या स्लॅबला भेगा पडल्या नसून हा एक्स्पान्शन जॉइंट असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले. या तडेसदृश्य दिसणाऱ्या भेगा एका ठिकाणी नसून दुसऱ्या ठिकाणी असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. दोन गर्डरमध्ये अंतर ठेवले नाही, तर पुलाला तडे जाण्याचा धोका असतो, असा दावा करण्यात आला.

झेडपी कर्मचारी युनियनचे उपोषण

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून अडचणी दूर करण्याबाबत सांगितले.

कामगार, पाल्यांना विदेशी भाषेची गोडी

$
0
0
कष्टकरी कामगार व त्यांच्या पाल्यांना इंग्रजीसह जर्मनी, जपानी आदी विदेशी भाषेची गोडी लागली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून शहरातील सुमारे १४० पेक्षा अधिक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. विदेशी भाषा अवगत करण्यासाठी नाममात्र शंभर रुपये फी आकारली जात आहे.

‘समांतर’च्या ठेकेदाराने भरले ‘भूमिगत’चे टेंडर

$
0
0
समांतर जलवाहिनीचे काम मिळालेल्या ठेकेदाराने भूमिगत गटार योजनेचे काम मिळवण्यासाठी टेंडर भरले आहे. त्यामुळे पालिकेत वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. भूमिगत गटार योजनेसाठी चार ठेकेदारांनी टेंडर भरले असून त्यांच्या कागदपत्रांनी छाननी केली जात आहे.

मोबाइल चोरीप्रकरणी दोघांना अटक

$
0
0
व्हिडिओकॉन कंपनीच्या गोदामामधून लाखो रुपयांचे मोबाइल हँडसेट लंपास केल्याप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कानपूर (उत्तरप्रदेश) येथून जेरबंद केले. कोर्टाने त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी दिली.

तीन लाखांवर बालकांना ‘दो बूँद जिंदगी के’

$
0
0
पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेत येत्या रविवारी (२३ फेब्रुवारी) जिल्ह्यातील तीन लाख ११ हजार ८४९ बालकांना पोलिओची लस पाजण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनी मंगळवारी (१८ फेब्रुवारी) येथे केले.

निम्म्या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर गदा?

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या निम्म्यावर आणण्याचा विचार करत आहे. त्यासाठी विद्यापीठाने एक कमिटी स्थापन केली असून, असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला जाणार आहे.

प्रा. देसरडा यांची नियुक्ती

$
0
0
राज्यातील दुष्काळावर मात करणे आणि जलस्रोत व्यवस्थापनासाठी पुण्यातील ‘गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स’मध्ये केंद्र सुरू करण्यात येत आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांची व्हिजिटिंग प्रोफेसर पदावर नियुक्ती केली आहे.

‘दयेच्या अर्जावर कालमर्यादेत निर्णय हवा’

$
0
0
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या तिघा जणांची फाशी सुप्रीम कोर्टाने रद्द केली आहे. कोर्टाच्या या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दयेच्या अर्जावर कालमर्यादेचे बंधन हवे, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तोतया ‘पीएसआय’चा पोलिस ठाण्यांमध्ये वावर

$
0
0
तोतया पीएसआय म्हणून वावरणाऱ्या सरीता रामराव कुलकर्णी यांचा अनेक पोलिस ठाण्यांत वावर असल्याचे उघड झाले आहे. ‘ग्रामीण’च्या विशेष शाखा विभागात नव्याने रुजू झालेल्या एका महिला कर्मचाऱ्यास तिच्याबाबत संशय निर्माण झाला.

शिवजयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

$
0
0
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने सकाळी आठ वाजता क्रांती चौक येथील शिवाजी महाराजाच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल.

ड्युटी, मजुरी, आळसातून मतदान नाही

$
0
0
मतदान का केले नाही? या एका प्रश्नासाठी अनेक कारणे तयार आहेत. गेल्या निवडणुकीत काहींना ‘इलेक्शन ड्युटी’ होती. काहींसाठी मतदानापेक्षा मजुरी, कंपनीतील नोकरी महत्त्वाची होती. काही मतदारांत मात्र मतदानाविषयी उदासीनता होती. अशा अनेक कारणांचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला आहे.

उद् घाटन आता, उपचारांचे नंतर बघू

$
0
0
मूत्रविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी घाटी रुग्णालयात अद्ययावत नेफ्रॉलॉजी विभाग बांधण्यात येत आहे. मंजुरीनंतर निधीसाठी टाळाटाळ केल्याने गेल्या सहा वर्षांपासून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

विद्यापीठाचे उपकेंद्र; कोटींची तरतूद

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ बीड, जालन्यातही उस्मानाबादपाठोपाठ आपले उपकेंद्र सुरू करणार आहे. त्यासाठी टोकण निधी म्हणून एक कोटी रुपयांची खास तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्यात आली. कॉलेजांची वाढती संख्या आणि त्यामुळे वाढणारा कामकाजाचा ताण लक्षात घेता विद्यापीठाचे हे पाऊल उल्लेखनीय ठरणार आहे.

खड्डे विसरा, मोदींचे सरकार आणा

$
0
0
‘खड्डे विसरा आणि आता केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आणा. त्यासाठी कामाला लागा, मतदान करा,’ असे आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी नागरिकांना केले.

SPIच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेतलेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेतील (एसपीआय) दहा विद्यार्थी ‘एसएसबी’चा खडतर टप्पा पार करत ‘एनडीए’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यात पाच विद्यार्थी एअरफोर्स, चार विद्यार्थी आर्मी तर, एक विद्यार्थी नेव्हीसाठी पात्र ठरला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images