Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

तोतया महिला पीएसआय गजांआड

0
0
पोलिस उपनिरीक्षक आहे, अशी थापा मारुन पोलिस अधीक्षक कार्यालयासह अन्य काही पोलिस ठाण्यात सर्रास वावरणाऱ्या एका तरुणीस सिडको पोलिसांनी अटक केली आहे. वर्दीच्या जोरावर तसेच थापा मारुन तिने काही जणांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचेही समोर येत आहे.

बोगस स्वातंत्र्यसैनिकांवर गुन्हे

0
0
खोटी कागदपत्रे व प्रतिज्ञापत्रे देऊन स्वातंत्र्य सैनिकांचे लाभ मिळविणाऱ्या २९८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

सातारा-देवळाईला नाथसागराचे पाणी

0
0
प्रस्तावित सातारा-देवळाई नगर पालिकेच्या हद्दीतील रहिवाशांनाही औरंगाबादप्रमाणेच पैठण येथील जायकवाडी प्रकल्पातून पाणी आणावे लागणार आहे. या पालिकेची रोजची गरज सुमारे चार दशलक्ष लीटर (एमएलडी) पेक्षा जास्त पाण्याची आहे. एवढे पाणी पुरविणारा एकही जलस्रोत परिसरात नाही.

रिक्षाचालकांची बेशिस्त वाहतूक ‘जैसे थे’

0
0
सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून होत असलेली रिक्षाचालकांची बेशिस्त वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नांना रिक्षाचालकांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. उड्डाणपुलाखालील रोडवर अंतर्गत रस्त्यांचा वापर रिक्षाचालक करीत असल्याने बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस हैराण झाले आहेत.

देवगिरी अभियांत्रिकीचा निकाल उंचावला

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा प्रथम वर्ष (प्रथम सत्र) अभियांत्रिकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विभाग सलग पाचव्यांदा सर्वप्रथम आला आहे.

सिनेमांसाठी मोठ्या कंपन्यांना शहराची भुरळ

0
0
औरंगाबाद शहर व परिसरात आता शूटिंगसाठी नामांकित कंपन्यांनी आपले बस्तान बसवण्याच्यादृष्टीने हालचाल करण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या बॅनरच्याखाली निर्मित होत असलेल्या नव्या व जुन्या दिग्दर्शकांनाही औरंगाबादची भुरळ पडली आहे.

आला टार्गेटचा महिना

0
0
फेब्रुवारी महिना अर्धा संपला की जिल्हा परिषदेला वेध लागतात ते टार्गेट पूर्ण करण्याचे. आरोग्य विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभागात लगीनघाई सुरू होते. यंदा आरोग्य, पंचायत विभागाच्या टार्गेटची पुरती वाट लागलेली आहे. तीच परिस्थिती शिक्षण व बांधकाम विभागाची आहे.

‘मतदार मित्रां’ ची नियुक्ती

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक गावात ‘मतदार मित्र’ ची नियुक्ती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या. तसेच लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

करवसुली न झाल्यास सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई

0
0
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली ७० टक्क्यांपेक्षा अधिक न झाल्यास संबंधित सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्य कार्यकारी (पंचायत) वासुदेव सोळंके यांनी दिला आहे.

पोस्टाच्या पैसे काढण्याच्या सुविधेला उशिर

0
0
पोस्ट बँकिंग सेवा अधिक चांगली करण्यासाठी, कोअर बँकिंगने सर्व पोस्ट कार्यालय पिनॉकल सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम सुरू आहे. औरंगाबाद शहरातील एक लाख आठ हजार ग्राहकांना कोअर बँकिंग सेवा देण्यात येणार आहे.

साडेसहाशे नव्या रिक्षा परवान्यासाठी २२५६ अर्ज

0
0
राज्यातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयातंर्गत रिक्षा परवान्यांचे वाटप करण्याची घोषणा करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात ६५० परवान्यांसाठी दोन हजारांवर अर्ज आले असून बीड आणि जालना जिल्ह्यात या परवान्याच्या वाटपाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

तीनशे महिलांना घातला चाळीस लाखांचा गंडा

0
0
जिल्ह्यातील तिनशे महिलांना कोपरगावच्या आनंद जैन मंच संस्थेने ४० लाखाला गंडा घातला. याप्रकरणी पंधरा आरोपीविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने सिडको पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घाटीत अकार्यक्षमतेची ‘शर्यत’

0
0
घाटी रुग्णालयातल्या विभागात सध्या अकार्यक्षमतेची शर्यतचला गलेली दिसते. ‘सीव्हीटीएस’च्या पाठोपाठ आता ‘नेफ्रॉलॉजी’ विभागावरही हा ठपका बसणार आहे. कारण किडनी प्रत्यारोपण, मुत्ररोगाच्या अवघड शस्त्रक्रियेचा मूळ उद्देश इथे साध्य होताना दिसत नाही.

पंधरा दिवसांपासून पैठण शहर अंधारात

0
0
पैठण नगर पालिकेने स्ट्रीट लाइटचे एकूण चार कोटी रुपयाचे बिल थकवल्यामुळे महावितरणने शहरातील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. परिणामी, शहरात पंधरा दिवसापासून अंधार पसरला आहे.

लक्ष केंद्रित करण्याची गरज

0
0
‘गेल्या काही वर्षात मराठवाड्यात तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्यात. यावर सातत्याने लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून दहशतवादाविरोधात जनजागृती करणे आवश्यक आहे,’ असे मत दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक नविनचंद्र रेड्डी यांनी व्यक्त केले.

दोन कोटींचा गंडा घालणारे ताब्यात

0
0
राजस्थान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सहा आरोपींना क्रांती चौक पोलिसांनी कोर्टाच्या आदेशाने मंगळवारी ताब्यात घेतले. या आरोपी विरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात तरुणांना रेल्वेमध्ये टिसीच्या नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा पोलिसांचे पथक आरोपींना घेऊन शहरात दाखल झाले होते.

सीबीसीटी मशिनचे आज लोकार्पण

0
0
शासकीय दंत महाविद्यालयात जिल्हा वार्षिक योजनेतून दिलेल्या कोन बिम कम्प्युटराईज्ड टोमोग्राफी (सीबीसीटी) या अद्ययावत यंत्राचे लोकार्पण गुरुवारी होत आहे.

५०८ प्रकरणांसाठी चार हजार अर्ज

0
0
मौलाना आझाद आर्थीक विकास महामंडळाच्या माध्यमातुन कर्ज मिळविण्यासाठी बेरोजगारांची गेल्या काही दिवसांपासुन रांगच लागलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी फक्त पाचशे आठ प्रकरण मंजूर होणार आहे.

पालिकेने वाढवली पाणीपट्टी

0
0
समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने नागरिकांना पाणीपट्टी वाढीचा बोजा टाकला आहे. गतवर्षीपासून पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्यात आली असून तीन दिवसानंतर पाणीपुरवठा केला जात असताना कराचा बोजा मात्र पालिकेने वाढवला आहे. यंदा नागरिकांना या करापोटी तीन हजार रुपये भरावे लागणार आहेत.

चिंता आहे...पण वेळ देता येत नाही

0
0
सकाळी कार्यालयातून आलेला फोन वाजला की, डयुटीवर पोहोचण्याची घाई. डयुटीवर दहा ते बारा तास घालविल्यानंतर थकून घरी आल्यानंतर अंथरूणावर पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच डोळे उघडतात.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images