Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

'छावा'चे प्रा. वडजे यांचे निधन

$
0
0
छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. देविदास वडजे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. कावीळ झाल्यामुळे एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वडजे यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

चढ्या दराने युरिया खताची विक्री

$
0
0
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने 'ना नफा ना तोटा' तत्वावर सुरू केलेल्या खत विक्री केंद्रातून निर्धारीत किमतीपेक्षा जास्त दराने युरीया खताची विक्री केल्याप्रकरणी बाजार समितीचे सचिव व्ही. डी. सिनगर व प्रतवारीकार योगेश हाडोळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

अंधारातही हिमायतनगर झगमगणार

$
0
0
भारनियमाच्या काळात रात्रीला शहरातील सर्व प्रभागात दिवसाचा प्रत्यय यावा, यासाठी शासनाच्या नागरी सुविधा योजनेतून शहरात सर पथदिवे व हायमाक्स लाईट बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अंधारातही हिमायतनगर शहर झगमगणार आहे.

एसटी चालकाने केला पत्नीचा खून

$
0
0
एसटी महामंडळातील चालकाने पैशासाठी पत्नीचा खून केल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे समोर आला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे ही घटना घडली. खून केल्यानंतर संशयित आरोपी असलेल्या चालकाने चक्क ड्यूटी करत नागपूर-पुणे ही बस औरंगाबादपर्यंत आणली. बसमध्ये ४० प्रवासी होते.

विद्यापीठ प्रवेश मर्यादा वाढविणार

$
0
0
यंदा बारावीचा निकाल चांगला लागलेला आहे. यामुळे अनेक महाविद्यालयांनी पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी विद्यापीठाकडे धाव घेतली होती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत, एकही विद्यार्थ्यांचे शिक्षण फक्त प्रवेश मिळाले नाही.

शिवसेना आमदाराला कोर्टाचा ‘धक्का’

$
0
0
महावितरणाच्या अधिका-यांना धक्काबुक्की केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने परभणीतील शिवसेनेचे आमदार संजय जाधव यांना जिल्हा न्यायालयाने ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना २५ हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासाला प्रशिक्षणाचा आधार

$
0
0
चिंचोली तांडा येथे दोन गटात मारामारी झाली. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु त्याच बरोबर तब्बल ५२ तपासी अंमलदार ही घटनास्थळी धावून आले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात ते मग्न झाले.

शौचालय बांधकामासाठी २० कोटी

$
0
0
निर्मल भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधकामासाठी जिल्ह्यातील १०६ गावातील लाभार्थ्यांना १९ कोटी ९२ लाख रुपये मिळणार आहेत. गेल्या वर्षी हा कार्यक्रम टंचाईमुळे राबविता आला नाही.

६५ कर्मचा-यांना ६ महिन्यांची मुदतवाढ

$
0
0
महापालिकेच्या अस्थापनेवर दैनिक वेतनावर काम करीत असलेल्या ६५ कर्मचाऱ्यांना तांत्रिक खंड देऊन सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व कर्मचारी वर्ग दोन व तीन संवर्गातील आहेत.

कळमनुरीला उपविभागीय कार्यालय

$
0
0
कळमनुरी येथे उपविभागीय कार्यालय लवकरच सुरू केले जाणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. हिंगोली शहरात आयोजीत अपंगाना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

राम मंदिराला काहीच हरकत नाही

$
0
0
उत्तरप्रदेशमधील अयोध्येत न्यायालयाने ठरवून दिलेल्या जागेत राम मंदिर आणि मशीद उभारण्यास काहीच हरकत नाही, असे स्पष्ट मत रिपाइचे माजी खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

फवारणी यंत्राच्या खर्चाबद्दल नगरसेवकांचा आक्षेप

$
0
0
शहरात अळीनाशक व किटकनाशक फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फिरत्या फवारणी यंत्राबद्दल नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत आक्षेप घेतला.

इंदिरा आवास योजनेसाठी उस्मानाबाद झेडपीची खास मोहीम

$
0
0
उस्मानाबाद इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलांची कामे मुदतीत पूर्ण व्हावी, यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेने खास मोहीम हाती घेतली असून, या मोहिम अंतर्गत १५ व १६ जुलै रोजी जिल्ह्यातील १ हजार ५३१ घरकुलांना मंजूरी देवून, लागलीच या घरकुलांच्या कामाचा शुभारंभ केला जाणार आहे.

सणानिमित्त साफसफाई; पाणीपुरवठ्याचे नियोजन

$
0
0
रमजान महिन्यापासून दिवाळीपर्यंत विविध सण एकापाठोपाठ येत असल्याने साफसफाई, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, दिवाबत्ती, आरोग्य या मुलभूत सुविधेची विशेष काळजी घेण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

पालिकेचा कोंडवाडा महागला

$
0
0
पालिकेतर्फे मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवले जाते. जनावराच्या मालकाकडून कोंडवाड्याचे विशीष्ट प्रकारचे शुल्क वसूल केले जाते. आता या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. अनामत रक्कम न स्वीकारता थेट वाढीव शुल्कच जनावरांच्या मालकाकडून वसूल केले जाणार आहे.

बोगस आदिवासी शोधासाठी मोर्चा

$
0
0
बोगस अधिकाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी हिंगोलीत शुक्रवारा भर पावसामध्ये मोर्चा काढण्यात आला.

जाधव यांना ३ महिन्यांची सक्तमजुरी

$
0
0
येथील शिवसेनेचे आमदार संजय जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन न्यायालयाने दोषी ठरवले आहे. शुक्रवारी आमदार जाधव यांना तीन महिने सक्तमजूरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. सय्यद यांनी सुनावली.

पैठणमध्ये अवैध धंद्यावर कारवाई

$
0
0
शनिवारी दिवसभरात पैठण पोलिसांनी, व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस वापरणा-या चार, जुगार खेळणा-या सात व अवैध विक्रीसाठी दारू घेवून जाणा-या एक अश्या एकूण बारा जणांना अटक केली. यामुळे शहर व परिसरात अवैध धंदे करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

‘SMS’वर घरपोच भाजीपाला

$
0
0
टमाट्यांनी डोळे वटारले, ढोबळी मिरची, भेंडी, गवार आदी भाजीपाल्यांनेही रंग दाखविण्यास सुरुवात केली तर कांद्याने डोळ्यात पाणी आणले, हा अनुभव ग्राहकांसाठी आता नवीन राहीलेला नाही.

‘शिशुविहार’चे वटवृक्षात रूपांतर

$
0
0
औरंगपुरा भागातील शिशुविहार शाळा ही सहजपणे कोणाचेही लक्ष वेधून घेते. अगदी भरचौकात असलेली ही शाळा औरंगाबाद शहरातील सर्वात जु्न्या शाळांपैकी एक आहे. औरंगाबाद महिला मंडळाची एक ऑगस्ट १९४४ रोजी स्थापना झाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images