Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

संस्थाचालकाच्या घरात १२वीचा पेपर

0
0
बारावी परीक्षेत शुक्रवारी घेतलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे घबाड चक्क संस्थांचालकाच्याच घरात आढळून आले. कन्नड तालुक्यातील तेलवाडी आश्रमशाळेत हा प्रकार घडला. पोलिसांनी संस्थाचालकासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

राहुल गांधींची 'आयडिया' महाग

0
0
स्थानिक कार्यकर्त्यांना हवा असलेला उमेदवार देण्याची योजना राहुल गांधींनी मांडली खरी, पण त्याच्या अंमलबजावीणीच्या वेळी काँग्रेसच्या पदाधिका-यांना पुरता घाम फुटला आहे.

जात वैधता पडताळणीचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना

0
0
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी नागरिकांना विभागीय जातपडताळणी समितीकडे अनेकदा खेटे मारावे लागतात. या कार्यालयाकडे जातपडताळणी साठी येणाऱ्या प्रकरणे मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे जातपडताळणी होण्यास विलंब होतो. याचा फटका सर्वसामान्यांना बसतो हेटाळण्यासाठी महसूल विभाग विचार करते आहे.

मराठवाडा ग्रंथालय संघाचे आज परभणीत अधिवेशन

0
0
मराठवाडा विभागीय ग्रंथालय तसेच परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे संयुक्त वार्षिक अधिवेशन रविवारी (२३ फेब्रुवारी) श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजीत करण्यात आले आहे. महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उदघाटन होणार आहे.

काही अटीच्या शर्थींवर आडत बाजारात सौदा सुरू

0
0
गेल्या चार दिवसांपासून लातूर येथील आडत बाजार बंद होता. हरभरा आणि तुरीला हमी भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. व्यापारी मात्र राष्ट्रीय पातळीवरच हरभऱ्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे त्या भावाने खरेदी करु शकत नाहीत अशी भुमिका घेत होते. अखेर जिल्हा बाहेरचा आणि परप्रांतिय शेतमाल शेतकऱ्यांच्या संमतीने हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्याचे ठरल्यामुळे बाजारात सौदा निघाला.

प्रशासकीय अधिकारी पगाराएवढा कामाचा मोबदला देत नाहीत

0
0
प्रशासकीय यंत्रणेतील बहुतांश अधिकारी हे आपल्या पगाराएवढा कामाचा मोबदला देत नाहीत, अशी खंत उस्मानाबादचे माजी जिल्हाधिकारी तथा यशदा पुणे येथे उप-महासंचालकपदी बदली झालेले डॉ. के. एम. नागरगोजे यांनी व्यक्त केली.

प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह १३ जणांवर गुन्हा

0
0
गेल्या विधानसभा निवडणुकीतील कंधार लोहा मतदार संघातील शिवसेनेचे पराभूत उमेदवार आणि संस्थाचालक प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थायीच्या बैठकीवर तहकुबीची कुऱ्हाड

0
0
पालिकेतील सर्व वरिष्ठ अधिकारी आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला गेले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीवर तहकुबीची कुऱ्हाड कोसळली. आता ही बैठक सोमवारी होईल.

मासकॉपी प्रकरणातील आरोपींना कोठडी

0
0
तेलवाडी येथे मासकॉपी प्रकरणी अटकेत असलेल्या संस्थाचालकासह, पाच आरोपींना शनिवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. सर्व आरोपींना २७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय चालवणाऱ्या संस्थाचालकाच्या घरातच इंग्रजी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्सप्रती आढळल्या.

औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी

0
0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून तिकिट मिळविण्यासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. एकमेकांच्या गटांवर कुरघोडी करण्यासाठी पक्ष निरीक्षकांसमोर शुक्रवारी जोरदार घोषणाबाजी झाली होती. त्यापुढे जाऊन शनिवारी माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि माजी आमदार नितीन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शहागंजमधील गांधी भवनात जोरदार हाणामारी झाली.

जनावरांची चोरी रोखण्याची मागणी

0
0
सिल्लोड तालुक्यात जनावारांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यांना आळा घालून अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे केली आहे.

जात प्रमाणपत्राचे काम पूर्ण करणार

0
0
बऱ्याच दिवसांपासून रखडलेले राजपूत समाजाच्या जात प्रमाणपत्रचे काम पूर्ण केले जाईल. खऱ्या नागरिकांना प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजेत. राजपूत समाजाच्या मागण्याबाबत आपण कृपाशंकर सिंह यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेट घेऊ असे आश्वासन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

परमीटला उस्मानाबादेत अल्प प्रतिसाद

0
0
प्रवाशी वाहतुकीचे परवाने देण्याचा उपक्रम परिवहन खात्याने (आरटीओने) हाती घेतल्यामुळे यासाठी प्रचंड मागणी होईल. परमीट (परवाने) देताना लॉटरी पद्धतीचा अवलंब करावा लागेल. अशी धारणा मनाशी बाळगलेल्या उस्मानाबाद आरटीओ ऑफीसच्या अधिकाऱ्यांची मात्र यंदा मोठी कुचंबणा झाली.

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत

0
0
गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरणामुळे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडेल की काय? आणि ऐन काढणीच्या हंगामात तोंडचा घास हिरावला जाईल काय? या शक्यतेमुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी या काळजीच्या वातावरणातच गव्हाची सोंगणी, मळणी सुरू केली आहे.

‘अन्नसुरक्षे’त सावळा गोंधळ

0
0
राज्यात एक फेब्रुवारीपासुन अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कायद्याअंतर्गत लाभार्थींची संख्या ठरवताना प्रशासनाचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संतप्त झाले आहेत.

चिंतेच्या झोपेतून सुटका करा

0
0
बजाजनगर परिसरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचे प्रमाणढ वात आहे. त्यात मिसिंग, गाड्या जाळणे, लुटमारी चोऱ्या आदी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण हे गाड्या जाळणे व बेपत्ता होणाऱ्यांचे आहे. गेल्या वर्षभरात ६५हून अधिक गाड्या जाळल्या; मात्र अद्यापपर्यंत त्याचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे या परिसरातील रहिवासी एका ‘चिंतेच्या झोपे’त असतात.

कायद्याचे पालन करा अन्यथा कारवाई

0
0
माथाडी कायद्यांचे काटेकोर पालन न करणाऱ्या आस्थापना विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा माथाडी व असंरक्षित कामगार प्रतिनिधी मंडळाने दिला आहे. कायद्याचे पालन सर्वत्र व्यवस्थित होते, की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षकांचे खास भरारी पथक तयार करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी - आप आमनेसामने

0
0
आम आदमी पार्टीच्या (आप) मुंबईतील कार्यालयावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा निषेध म्हणून रविवारी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये हडकोतील राष्ट्रवादी भवनासमोर ‘झाडू चलाओ’ आंदोलन केले.

लोकपाळ राजा सयाजीराव

0
0
यंदाचा राज्यशासनाचा वाङ्मयीन पुरस्कार ज्येष्ठ लेखक प्रकाशक बाबा भांड यांना जाहीर झाला. ‘लोकपाळ राजा सयाजीराव’ या चरित्रात्मक पुस्तकाला तो पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुस्तकाविषयी....

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
0
एक महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या तरुणाच्या विरोधात पैठण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पैठण पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images