Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘झाडू चलाओ’ आंदोलनानंतर तणाव

$
0
0
आम आदमी पार्टीच्या (आप) मुंबईतील कार्यालयावर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्याचा निषेध म्हणून रविवारी आपच्या कार्यकर्त्यांनी हडकोतील राष्ट्रवादी भवनासमोर ‘झाडू चलाओ’ आंदोलन केले. त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

हद्दपार गुन्हेगारांचे शहरात वास्तव्य

$
0
0
शहरातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही गुन्हेगारांचे शहरातच वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे. जिन्सी व सिटीचौक पोलिसांनी अशा दोन हद्दपारांना गजाआड केले आहे.

‘डेस्टिनेशन वेडिंग’ची नवी क्रेझ

$
0
0
लग्न सोहळा अविस्मरणीय ठरावा, यासाठी तो पारंपरिक पण ‘रॉयल’ असला पाहिजे, अशी एक लाट सध्या तरुण पिढीत आलीयं. एकुलता एक लाडका किंवा लाडक्या मुलीच्या लग्नासाठी ‘होऊ दे खर्च’ असे पालकांनाही वाटत आहे.

‘मसाप’चे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर

$
0
0
मराठवाडा साहित्य परिषदेचे उत्कृष्ट ग्रंथांसाठीचे वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात सहा मान्यवर साहित्यिकांचा समावेश असून येत्या १५ मार्च रोजी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

सिनेमे आहेत, थिएटर नाही

$
0
0
सध्या प्रत्येक महिन्यात किमान आठ ते दहा मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. यातील काही चित्रपट औरंगाबादसह मराठवाड्यात प्रदर्शितच होत नाहीत. चित्रपटगृहांचा अभाव आणि वितरणाची स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे मराठी निर्मात्यांची गैरसोय झाली आहे.

बारावी कॉपीप्रकरणी दोन पर्यवेक्षक निलंबित

$
0
0
बारावी परीक्षेच्या वेळी कॉपीमुक्ती मोहिमेला सहकार्य न करणाया दोन पर्यवेक्षकांना निलंबीत करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पर्यवेक्षकांवर नियंत्रण न ठेवल्याप्रकरणी केंद्रप्रमुखाला निलंबीत करण्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांचेकडे पाठविला आहे.

महिलांनी जिजाऊंचे चरित्र आत्मसात करावे

$
0
0
महिलांना अनेक अडचणी व समस्या सातत्याने भेडसावत असतात. मात्र निश्चय केला तर त्यातून मार्ग काढता येतो. प्रत्येक महिलेने जिजाऊचा आदर्श घेऊन स्वतःचे कुटुंब उभारण्याची गरज आहे. यातून समजा आणि देशही बदलेला दिसेल. मात्र, यासाठी प्रत्येक महिलने जिजाऊचे चरित्र आत्मसात करण्याची गरज आहे, असे आवाहन अनाथाची माता सिंधुताई सपकाळ यांनी उस्मानाबादेत केले.

अतिवृष्टी, पूरग्रस्त तालुक्यांना निधी

$
0
0
नांदेड जिल्ह्यात जून व जुलै २०१३ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव व भोकर या पाच तालुक्यात नुकसान झाले होते. येथील शेती व फळपिकांसाठी नुकसान भरपाई म्हणून १८ कोटी ७० लाख ६९ हजार रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन दिला आहे.

‘नाती जपायची कशी?’

$
0
0
नाती हा दोन अक्षरी शब्द, पण तो जपण्यासाठी माणसाला किती आटापिटा करावा लागतो. किती वर्षे खेळतात पती-पत्नी संसाराचा सारीपाट! तरी पण दोघांचेही हिशोब नात्यासंबंधी वेगवेगळेच असतात माणसांचं आयुष्य कमी पडत, नाती जपताना जीवन हे भूमितीप्रमाणे स्वतःची चाकोरी मोजत मापत चाललेलं असतं, त्यातील अगणित समस्या सोडवता सोडवता इष्ट मित्रांच्या नातेवाईकांच्या सहवासात प्रेम, वात्सल्याच्या रेषेवरून चालत राहातात माणसं ! पण काटकोन, त्रिकोणाच्या अंशाची बेरी मात्र सापडत नाही.

पैठणकरांना दिवसभर ‘शॉक ट्रीटमेंट’

$
0
0
थकबाकीच्या कारणावरून महावितरणने शहरातील स्ट्रीट लाइटचा विद्युत पुरवठा खंडित केला, तर मालमत्ता कराची थकबाकीचे कारण पुढे करत पैठण पालिकेने महावितरणच्या शहरातील कार्यालयांना सील केले.

ग्रामसेवकांचे आंदोलन तीव्र करू

$
0
0
राज्यभरातले २७ हजार ९२७ ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी दिला आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृहप्रश्नी आंदोलन

$
0
0
वसतिगृहांच्या विविध समस्यांवर आदिवासी विद्यार्थी कृती समितीने सोमवारपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले.

‘काम बंद’चा घाटीला फटका

$
0
0
घाटी रुग्णालयातील रिक्तपदे, अनुकंपाची विनाअट भरती तसेच, कर्मचाऱ्यांच्या आउटसोर्सिंगचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी घाटी महाविद्यालय तसेच, रुग्णालयातील तब्बल बाराशे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी घाटीत दोन तास काम बंद आंदोलन केले.

रोजचा दोनशे रुपयांचा भुर्दंड

$
0
0
धुळे-चाळीसगाव महामार्गावरील पडेगाव भाग आता शहराशी जोडला गेला आहे. या नवीन भागाच्या मुख्य रस्त्यावरून एसटी बस वाहतूक नियमितपणे होते. मात्र, शहरातून या ठिकाणी जाण्यासाठी सिटी बस नसल्याने या भागातील लोकांना शहरात येण्यासाठी रिक्षांचा आधार घ्यावा लागत आहे.

फेब्रुवारीत तिन्ही ऋतू मुक्कामी

$
0
0
यावर्षीच्या फेबुवारी महिन्यात नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्न पडावा या पद्धतीने हवामानात तीव्र बदल होत आहेत. कडाक्याची थंडी व उन्हाळ्याची जाणीव करून देणारे ऊन, असा अनुभव घेतल्यानंतर ढगाळ वातावरण, पाऊस व गारपिटीने पावसाळ्याचीही जाणीव करून दिली.

दोषी १,४०४ शाळांवर कारवाई

$
0
0
राज्यात विशेष पटपडताळणी मोहिमेत १४०४ दोषी शाळा आढळल्या आहेत. या शाळांविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी हमी प्राथमिक शिक्षण संचालकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत

$
0
0
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावरून स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. मोकाट कुत्रे पकडण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप या वेळी केला. कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठीचे टेंडर सहा महिन्यांपासून काढलेले नाही, अशी कबुली अधिकाऱ्यांनी दिली.

चुका निस्तरण्यासाठी शाळांना ‘पत्र’

$
0
0
हॉ‌ल तिकिटमधील ‌झालेल्या चुका निस्तरण्यासाठी आता बोर्डाने शाळांना एक नव्हे तर चक्क दोन-दोन पत्र पाठविली आहेत. या पत्रात सूचनांचा भडिमार केला आहे.

पोलिस ठाण्यातच दे दणादण!

$
0
0
सिडको पोलिस ठाण्यामध्ये सोमवारी सायंकाळी गुन्हेप्रकटीकरण पथकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गुन्हेप्रकटीकरण पथकातून काढल्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

उत्तरपत्रिकांचे गठ्ठे पोस्टात

$
0
0
नियामकांच्या बैठका उधळून लावणाऱ्या ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सोमवारी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे टपाल कार्यालयात पुन्हा परतले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>