Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादच्या विभाजनाचा प्रस्ताव

0
0
औरंगाबाद तालुक्याचे दोन तालुक्यांत विभाजन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ. येत्या दशकभरात दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडोर (डीएमआयसी) प्रकल्पामुळे शहर आणि परिसरात होणारे स्थलांतर विचारा घेता विभाजनाऐवजी तालुक्याचे त्रिभाजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राणे यांच्यावर कोर्टाचे ताशेरे

0
0
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला औरंगाबाद आयटी पार्कमधील भूखंड रद्दबातल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.

स्ट्रॉँग बसची डर्टी रोडवर चाचणी

0
0
चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एसटी बस अधिक स‌क्षम आणि मजबुत करण्यात यश मिळविले आहे. कार्यशाळेत तयार केलेल्या विशेष बसची सध्या खराब रस्त्यांवर चाचणी केली जात आहे. यात मजबुती सिद्ध झाल्यानंतर अशाच प्रकारच्या अन्य बस तयार केल्या जाणार आहेत.

परीक्षा एक, हॉल तिकिटे दोन

0
0
बोर्डाने यंदा चुकांचा कळस गाठण्याचा निर्धारच केलाय. आता दहावीच्या परीक्षेत एका-एका विद्यार्थ्यांना चक्क दोन-दोन हॉल तिकिटे देण्याचा ‘पराक्रम’ केलाय. हे तर काहीच नाही, अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटवरील फोटोही गायब केलेत. त्यामुळे परीक्षा देण्याआधीच बोर्डाचा रिझल्ट फेल आलाय.

प्रायोगिक’चे भविष्य उज्ज्वल

0
0
‘व्यावसायिक नाटकांप्रमाणेच प्रायोगिक नाटकांना स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. नाटकाच्या प्रतिसादाला नैमित्तिक कारणं असतात. अगदी लहान शहरांतही प्रायोगिक नाटकांना प्रतिसाद मिळतोय.

खाशाबा जाधव स्पर्धेसाठी जालना सज्ज

0
0
महाराष्ट्र राज्यकुस्तीगीर परिषद, जालना जिल्हा तालीम संघ व जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या खाशाबा जाधव करंडक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी जालना शहर सज्ज झाले आहे. या स्पर्धेमुळे जालना शहर कुस्तीमय होऊन गेले आहे.

सिडको पोलिस ठाण्यात सर्वांचेच तोंडावर बोट

0
0
‌सिडको पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणानंतर सर्वांनी चुप्पी साधली आहे. ‌कोणीही अधिकारी कर्मचारी या विषयावर बोलण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले. दरम्यान, सोमवारी रात्रीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती जाणून घेतली.

एमसीईडीतील बिंदू नामावलीची

0
0
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातील (एमसीईडी) बिंदू नामावलीची अद्ययावत माहिती पुढील पंधरा दिवसांत सादर करा, असे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. एल. थूल यांनी येथे दिले.

संशोधक वृत्तीच्या प्राध्यापकांची देशाला गरज

0
0
प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबर संशोधनातही भरीव असे कार्य केले पाहिजे. भारतात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले.

अंगणवाडी कार्यकर्तींचा उद्या गौरव समारंभ

0
0
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे गुरुवारी ४२ अंगणवाडी कार्यकर्तींना आदर्श पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मौलाना आझाद संशोधन केंद्रात गुरुवारी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष शारदा जारवाल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येईल.

ऑटोरिक्षा परवान्यांचे वाटप Live

0
0
राज्यातील रिक्षा चालकांना नवीन रिक्षा परवान्यांचे वाटप २७ फेब्रुवारीला लॉटरी पद्धतीने होईल. त्याचे संकेतस्थळावरून लाइव्ह प्रसारण केले जाणार आहे. राज्यातील ८१,४५६ रिक्षा परवान्यांचे लॉटरी पद्धतीने वितरण करण्यासाठी १,७५,३४९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. यात फी भरलेल्या १,५२,८६२ अर्जदारांमधून कार्यालयनिहाय लॉटरी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे काढण्यात येणार आहे.

समाजकल्याण विभागासाठी कर्मचारी मिळेना

0
0
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात १२ मंजूर पदांपैकी ८ पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही कर्मचारी मिळत नसल्याने नाराज झालेल्या समाजकल्याण समितीच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. चौधरींनी तत्काळ कर्मचारी देण्याचे आश्वासन दिले आहे.

आरटीओला हवा वर्दळ नसलेला रस्ता

0
0
शहर अथवा शहराबाहेर एका मोठ्या निर्मनुष्य, वाहनांची वर्दळ नसलेला आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा असलेल्या रस्त्याच्या शोधात आरटीओ कार्यालयाचे अधिकारी आहेत. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर ट्रकसह इतर मोठ्या वाहनांच्या पासिंगसाठी रस्ता शोधण्याची जबाबदारी आरटीओ कार्यालयावर येऊन पडली आहे.

वीज दरवाढ आक्षेपांसाठी

0
0
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे वीज नियामक आयोगाकडे ९३१२ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. या दरवाढीवर वीज ग्राहकांना हरकती किंवा सूचना पाठविण्याची आज (२६ फेब्रुवारी ) अखेरची तारीख आहे.

जालना जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा तहकूब

0
0
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा विरोधकांच्या आक्रमक पावित्रयाने आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळात अखेर तहकूब करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष आशा भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात २०१५-१५च्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले.

वाळू संघर्षातून परस्परविरोधी तक्रारी

0
0
वाळू वाहतूकदार आणि तहसीलदार यांच्या संघर्षातून जाफराबादमध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाफराबाद येथील तहसीलदार सुमन मोरे यांचे पती उद्धवराव अडसूळ यांच्या विरोधात रस्त्यात अडवून मारामारी करण्याच्या आरोपावरून पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तहसीलदार मोरे यांनी वाळू वाहतूकदार शेख हबीब शेख उस्मान यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे.

सिल्लोड तालुक्यात पावसामुळे गव्हाचे नुकसान

0
0
तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला जात असल्यामुळे शेतकरी चिंतित झाले आहेत.

त्या खुनाचा तपास विशेष पथकाकडे

0
0
नवजात शिशूचा खुन प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्तांनी विशेष पथकाकडे सोपवण्यात आला आहे. खुनाची कबुली देणाऱ्या मातेची व आजीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. घाटी हॉस्पिटलमध्ये १३ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता.

नवीन बसच्या निर्मितीला ब्रेक

0
0
मागील दोन महिन्यांपासून एसटी मध्यवर्ती कार्यशाळेला नवीन चेसिसचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे याठिकाणी जुन्या बसच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. आगामी दीड महिना जुन्या गाड्यांची पुनर्बांधणीचेच काम एसटीच्या विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यांना करावी लागण्याची शक्यता आहे.

शहरातील वृद्ध, चिमुकले न्युमोनियामुळे त्रस्त

0
0
गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. दोन ऋतूमध्ये होत असलेला बदलांमुळे वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले आहे, यामुळे शहरातील खासगी रुग्णालयात न्युमोनिया, सर्दी, खोकला तसेच ढाळ वांत्यांचा त्रास असलेल्या रुग्णांची गर्दी झाली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images