Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘सीव्हीटीएस’ची अवस्था जैसे थे

$
0
0
घाटी रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी ‘सीव्हीटीएस’ विभागात रुजू झालेले सर्जन डॉ. भरत सोनी यांनी अचानक राजीनामा दिल्याची माहिती घाटी प्रशासनाने शासनास कळवली आहे. डॉ. सोनी यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे ‘सीव्हीटीएस’मध्ये बायपास व हृदयविकारासंबंधीच्या अवघड शस्त्रक्रिया होतील.

नांदेडवर तिसऱ्या डोळ्याची नजर

$
0
0
शहरातील वाहनचोऱ्या, साखळीचोऱ्यांच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने नांदेड शहराच्या प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याबरोबरच मिरवणुका, मोर्चे यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीनेही या कॅमेऱ्यांचा उपयोग होईल, असे मानण्यात येत आहे.

उस्मानाबादच्या बजेटमध्ये निवडणुकीची ‘भेट’

$
0
0
नगरसेवकांना दरवर्षी दीड लाख रुपयांचा विकासनिधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि कोणतीही करवाढ नसलेला एक लाख २६ हजार रुपयांच्या शिलकी अर्थसंकल्प पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला. नगराध्यक्षा रेविता बनसोडे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर या वेळी उपस्थित होते.

टीसी भरती फसवणूक गुन्ह्याची उकल

$
0
0
रेल्वेत टीसी भरतीचे आमीष दाखवून बेरोजगारांना सव्वादोन कोटींचा गंडा घालणा-या टोळीच्या सूत्रधाराला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक राजस्थानला रवाना झाले.

महावीर चौक पुलाविरोधात आज नागरिकांचा मुकमोर्चा

$
0
0
महावीर चौकातील उड्डाणपुलाची दिशा बदलावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता मूकमोर्चा निघणार आहे. हा मोर्चा महावीर चौकातून निघून क्रांती चौक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे जिल्हा परिषद मैदानावर जाणार आहे. या मोर्चात जनहित प्रतिष्ठान, औरंगाबाद बस ओनर्स अॅण्ड ट्रॅव्हलर्स असोशिएशन, रिक्षाचालक कृती समिती आदींचे प्रतिनिधी सामील होणार आहेत.

जायकवाडीच्या पाण्यासाठी आंदोलन उभारा

$
0
0
शिवउद्योग सहकारी सेनेने जायकवाडीच्या पाण्यासाठी आंदोलन उभारावे, असे आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. ते रांजणगाव शेणपुंजी येथे मंगळवारी शिवउद्योग सहकारी सेनेने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

कोटला कॉलनीचा पाणीपुरवठा तोडला

$
0
0
पाणीपट्टी, मालमत्ताकर थकल्यामुळे पालिकेने आज मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुभेदारी विश्रामगृह, बांधकाम भवन, कोटला कॉलनीचा पाणीपुरवठा तोडला. त्यामुळे या सर्व ठिकाणी बाका प्रसंग निर्माण झाला आहे. कोटलाकॉलनीमधील रहिवाशांनी पाण्याच्या टाकीवर जावून पाणी का सोडले नाही याची विचारणा केली, पाण्याचे टँकर देण्याची मागणी केली पण त्याला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.

पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांचा नारळ केव्हा फुटणार?

$
0
0
महापालिकेच्या रस्त्यांचा नारळ फुटला आणि रस्त्यांची कामे सुरू झाली. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचा नारळ केव्हा फुटणार, असा खोचक सवाल खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचारला. पालिकेतर्फे ४४ कोटी रुपये खर्च करून ‘व्हाइट टॉपिंग’च्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. या कामाचा नारळ मंगळवारी खैरे यांच्या हस्ते फुटला, तेव्हा ते बोलत होते.

लेखानुदानाला इलेक्शन टच

$
0
0
राज्य सरकारने सादर केलेल्या लेखानुदानात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्शन टच असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. सरकारने कोणतीही दरवाढ केली नसल्याने सर्वसामान्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

पेंटिंग, अप्लाइड आर्टमधून अभिव्यक्तीचे दर्शन

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागाच्या वार्षिक कला प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली. कल्पनेला चित्रस्वरूपात सादर करत विद्यार्थ्यांनी आपल्या अभिव्यक्तीचे दर्शन घडविले. सुमारे ‌दीडशे कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या असून प्रत्येक कलाकृती लक्षवेधक ठरली आहे.

ट्रकच्या धडकेमुळे पोलिसाचा मृत्यू

$
0
0
वाळूज पोलिस ठाण्याहून रात्रीपाळी करून घरी परतणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने त्यातील एक जण जागेच ठार झाला तर, एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबई-नागपूर हायवेवर हा अपघात घडला.

औरंगाबाद सभेत चव्हाणांचे पुनर्वसन?

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील प्रचाराची अधिकृत सुरवात करण्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पाच मार्च रोजी सभा होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन पक्षश्रेष्ठी अधिकृतरीत्या जाहीर करण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे.

तेजस्विनीला बालेवाडीत मोफत सुविधा

$
0
0
आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी मुळेला पुण्यातील बालेवाडी शुटिंग रेंज व निवास सुविधा मोफत उपलब्ध होईल. तशी घोषणा क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. तेजस्विनीला बालेवाडीत मिळणाऱ्या असुविधांसंदर्भात ‘मटा’ने आवाज उठविला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थितीत करुन तिला न्याय मिळवून दिला.

घृष्णेश्वर मंदिरावर सीसीटीव्हीची नजर

$
0
0
महाशिवरात्रीनिमित्त घृष्णेश्वर मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मंडळ सदस्य चढणार कोर्टाची पायरी

$
0
0
कार्यकाल संपल्यानंतर अशासकीय सदस्यांना घरचा रस्ता दाखविणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विरोधात हे सदस्य आता कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सदस्य आणि मंडळ यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

तेरा जिल्ह्यांत समादेशकाची प्रतीक्षा

$
0
0
राज्यात होमगार्ड संघटनेत तेरा ठिकाणी जिल्हा समादेशक नेमण्यात आलेले नाहीत. परिणामी याचा अतिरिक्त पदभार जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे आहे. वाली नसल्यामुळे होमगार्डची अवस्था दयनीय झाली आहे. निवड समितीच्या जाचक प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे जिल्हा समादेशकाची पदे भरली गेली नाहीत. औरंगाबादच्या होमगार्ड संघटनेलाच आठ वर्षांनंतर जिल्हा समादेशकाची नेमणूक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांची सरप्राइज व्हिजीट

$
0
0
पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी मंगळवारी सकाळी जिन्सी पोलिस ठाण्याला अचानक भेट देत आपल्या फिल्ड वर्कला सुरुवात केली. पोलिस ठाण्यातील सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यांच्या या अचानक व्हिजीटमुळे अन्य पोलिस ठाण्यातील अधिकारीही कामाला लागल्याचे दिसून आले.

कुलगुरूपदासाठी साठ जण रांगेत

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. कुलगुरूपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपली. कुलगुरू शोध समितीकडे सोमवारपर्यंत साठ उमेदवारांचे अर्ज आले तर, आज दिवसभर अर्जांची छाननी सुरू होती.

‘भूमिगत’साठी वाटाघाटी

$
0
0
भूमिगत गटार योजनेच्या टेंडरबद्दल संभाव्य ठेकेदाराशी वाटाघाटी सुरू आहेत. प्रतीक्षा करा, असा सबुरीचा सल्ला पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिला. या योजनेसाठी केंद्र सरकार कडून १४४ कोटी रुपयांचा पहिला हप्ता आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भूमिगत गटार योजनेचे टेंडर निश्चितीचा प्रस्ताव लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत यावा, यासाठी काही पदाधिकारी व नगरसेवक आटापीटा करू लागले आहेत.

सिटीबसला हवे स्वतंत्र आगार

$
0
0
प्रशासनाच्या कुचकामी कारभारामुळे काही वर्षांपासून शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढेपाळली आहे. सिटीबस सेवेला शिस्त लावण्यासाठी आणि ही सेवा कार्यक्षण करण्यासाठी, सिटीबसला स्वतंत्र आगारच तयार करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. सिटीबसचा कारभार स्वतंत्र केल्याशिवाय, सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची सूतराम शक्यता नाही.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images