Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दरोड्याचा प्रयत्न फसला

$
0
0
पद्मपुरा भागातील सुयोग कॉलनी येथे अपार्टमेंटमध्ये शिरून चार शस्त्रधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटुंबीयांनी केलेल्या आरडाओरड्यांमुळे दरोडेखोरांनी कारमधून पळ काढला. कंट्रोल रूम व क्रांती चौक पोलिस ठाण्याला माहिती देऊनही पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.

खुर्शीदांचा राजीनामा घ्या

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सलमान खुर्शीद यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते, खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

शाळा देता का शाळा

$
0
0
मागणी करूनही जिल्हा परिषद प्रशासनाने हायस्कूल देण्यासंदर्भात काहीच कार्यवाही झाली नसल्याच्या निषेधार्थ रांजणगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना भेटून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर विद्यार्थी परतले.

हिंगोलीसाठी कॉँग्रेसचा आग्रह कायम

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात २६ - २२ असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. जागांची अदलाबदल होऊ शकते. हिंगोलीची जागा आम्हाला मिळावी, यासाठी आग्रह धरणार आहोत. हिंगोलीच्या जागेऐवजी कोणती जागा राष्ट्रवादीला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकसभा निवडणूक काँग्रेस वि. संघ

$
0
0
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा आणि भाजपचा मुखवटा घेऊन समोर आले आहेत. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक काँग्रेस विरुद्ध ‘आरएसएस’ होईल. आम्ही संघाचे सर्व डाव उघडकीस आणू, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

‘अॅप्स’ निर्मितीवर भर

$
0
0
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत असलेल्या वाचकांसाठी मराठी प्रकाशन संस्थांनी स्वतंत्र अॅप्सची निर्मिती करुन एक पाऊल पुढे टाकले आहे. या माध्यमातून वाचकांना संबंधित प्रकाशन संस्थेची दर्जेदार पुस्तके मोबाइल आणि टॅबवर उपलब्ध होणार आहेत. ‘ई-बुक्स’नंतर अॅप्समुळे मराठी साहित्यविश्वाला अधिक व्यापक होण्याची संधी मिळाली आहे.

शिक्षकांना पुरस्कार केव्हा?

$
0
0
किरकोळ कारणांवरून दोन वर्षांपासून रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण करण्याचा धडाका जिल्हा परिषदेने गेल्या आठवड्यापासून लावला आहे. ग्रामसेवकांनंतर गुरुवारी अंगणवाडी कार्यकर्त्यांचा गौरव होणार आहे.

अनुशेषाबद्दल राज्यपालांना भेटणार

$
0
0
मराठवाडा, विदर्भ व खान्देशच्या वाढत्या अनुशेषाबद्दल राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी बुधवारी दिली. वाढत्या अनुशेषाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. त्याबद्दल सरकारला जाब विचारावा व घटनेने दिलेल्या अधिकाराचे पालन करावे, अशी मागणी भाजप शिष्टमंडळ राज्यपालांकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

सोसाट्याचा वारा, गारांचा मारा

$
0
0
४० ते ४५ किलोमीटर वेगाने सुटलेले वादळी वारे व गारांसह अचानक झालेल्या जोराच्या पावसाने शहराला बुधवारी सायंकाळी झोडपले. चिकलठाणा भागात घरांवरील पत्रे उडून काही जण जखमी झाले तर, दहा ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अर्ध्या अधिक शहराचा वीज पुरवठा तब्बल दीड ते दोन तासासाठी खंडित झाला होता.

किशोर कदम, मंजुळे यांची मुलाखत

$
0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, औरंगाबाद आणि नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

​आजपासून कुमार गंधर्व संगीत महोत्सव

$
0
0
औरंगाबादमध्ये कलावैभव संस्थेतर्फे या वर्षीचा दोन दिवसीय कुमार गंधर्व संगीत महोत्सव शनिवारपासून (दि. १ मार्च) सुरू होत आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून यात पहिल्या दिवशी धारवाड येथील पंडित कैवल्यकुमार गुरव, औरंगाबाद येथील कृष्णा बोंगाणे, यांचे सुश्राव्य गायन होईल.

भावनांनी ओथंबलेला समारंभ

$
0
0
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात काही समारंभ असे असतात जे आयुष्यभरासाठी लक्षात राहणारे असतात. यात म्हणजे कॉलेजचा निरोप समारंभ. ज्या कॉलेजमध्ये आयुष्याची महत्वाची वर्ष गेली.

‘मातृशक्तीचा अविष्कार’ विषयावर आज व्याख्यान

$
0
0
पन्नालालनगर विकास संस्था व श्री अष्टविनायक ग्रंथालय पन्नालालनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शंकरराव कोप्पलकर स्मृती व्याख्यानमालेत शुक्रवारी २८ फेब्रुवारी ला ‘मातृशक्तीचा अविष्कार’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

पारनेरकर महाराज पादुका पूजन सोहळा

$
0
0
समर्थनगर येथे पूर्णवादरत्न लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या उपस्थितीत ‘पारनेरकर महाराज पादुका पूजन समापन सोहळा’ नुकताच झाला.

तरूणाईला वाटतेय मराठीच्या संवर्धनाची गरज

$
0
0
मराठी राजभाषा दिनानिमित्त व्यक्त केल्या तरूणांनी भावना; विविध कार्यक्रमांत मराठीच बोलण्यावर भर; शासनाकडूनही भरपूर अपेक्षा

सोशल साइटवर मराठी प्रेम

$
0
0
सध्याची तरुणाई टेक्नोसॅव्ही आहे, तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अग्रेसर असलेली तरुणाई आपल्या मायबोली मराठीला विसरलेली नाही. टेक्नोसॅव्ही तरुणाई फेसबुक, व्हॉटसअपवर मराठी पेज, मराठी व्हिडिओ, मराठी डॉयलॉगला पसंत करतात.

कर्नाटकी भजनाचा सुरेल नजराणा

$
0
0
‘वेंकटाजलनिलयम् वैकुंठपूरवासम्’, ‘रामकृष्णगोविंद नारायणा’ यांसारख्या अस्सल कर्नाटकी ढंगाच्या गायकीचा अनुभव घेता आला, तो नामदेव सभागृहात. बॉम्बे लक्ष्मी राजगोपालन यांनी आपल्या शास्त्रीय गायनाच्या मैफिलीत कर्नाटकी संगीतातील सर्व वैशिष्ट्यं नेमकी आणि ठळकपणे मांडली.

‘ई-बुक’ वाचू आनंदे

$
0
0
नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत ‘ई-बुक’ वाचनाकडे विद्यार्थी वळले आहेत. मोबाइलवर सगळ्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अनेकांनी ‘ई-बुक’ डाउनलोड केलेत. पुस्तक हाती धरुन वाचन करण्याचा आनंद निराळा असतो, असे काही विद्यार्थ्यांचे मत आहे.

सिटी बससाठी ‘मार्स कॅब’चा ‘बूम’ प्रस्ताव

$
0
0
शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी सिटी बस सुरू करण्याची तयारी वसई-विरार येथील ‘मार्स कॅब’ प्रा. लि. या कंपनीने दर्शवली आहे. त्यानुसार या कंपनीने पालिकेकडे ‘बूम’ (बाय, ओन, ऑपरेट, मेन्टेन) पद्धतीने सिटी बस चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. पालिकेने हा प्रस्ताव घेऊन ठेवून दिला आहे. त्या संदर्भात अद्याप काहीच चर्चा केली नाही.

सिटी बससाठी ‘जेएनएनयूआरएम’चा सहारा

$
0
0
शहरात सिटी बस सुरू करण्यासाठी ‘जेएनएनयूआरएम’ (जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना) या योजनेचाच पालिकेला सहारा आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास शहरासाठी किमान दीडशे सिटी बस उपलब्ध होतील.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images