Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘एएमटी’मुळे पालिका तोट्यात नाही

$
0
0
महापालिकेच्या क्षेत्रात साडेचार वर्षे ‘एएमटी’ नावाने सिटी बस सेवा सुरू होती. पण, या सेवेमुळे पालिकेचा आर्थिक तोटा झालेला नाही, असा निर्वाळा पालिकेच्याच प्रशासनाने दिला आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल ‘मटा’ च्या हाती लागला आहे. त्या अहवालात ‘एएमटी’चा लेखाजोखा मांडला आहे.

...कीड लागण्यापासून वाचवू शकतो !

$
0
0
नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखोंचा गंडा, स्वस्तात सोने देतो असे सांगून व्यापाऱ्यास लुटले असे फसवणुकीचे अनेक प्रकार अधूनमधून समोर येतात. यातून धडा घेणे गरजेचे आहे.

तीन आरोपी ताब्यात

$
0
0
बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी तीन आरोपींना क्रांती चौक पोलिसांनी राजस्थानच्या कोटा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. यामध्ये प्रमुख सूत्रधाराची पत्नी; तसेच दोन आरोपींचा समावेश आहे. यापूर्वी सहा आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.

तीन दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

$
0
0
तरुणाने अश्लील शिविगाळ केल्याने पेटवून घेतलेल्या तरुणीची तीन दिवसांच्या मृत्यूशी झुंजीनंतर बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली. रविवारी रात्री जयभीमनगर टाउन हॉल परिसरात तरुणीने पेटवून घेतले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन महिलांना अटक करण्यात आली आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बीचे नुकसान

$
0
0
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पिकाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. फळबागांनाही पावसाचा तडाखा सहन करावा लागला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जवळपास वीस टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

स्पेशल ट्रॅकवर होणार वाहन ब्रेकची तपासणी

$
0
0
शेंद्रा एमआयडीसी येथे वाहनांच्या ब्रेकची तपासणी शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे. या वेळी वाहनाने पिवळा पट्टा पार केल्यास त्या वाहनांना बाद ठरविण्यात येणार आहे.

कॉपीमुक्तीत अडसर ठरणाऱ्या संस्थाचालकांवर गुन्हे

$
0
0
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील. परीक्षार्थींना तणावमुक्त वातारणात परीक्षा देता येईल अशी व्यवस्था संब‍ंधित अधिकाऱ्यांनी करावी. संस्थाचालकांनी त्यांच्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त परीक्षा होतील याची दक्षता घ्यावी. ज्या संस्थाचालकांनी या कामी हयगय केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.

बीड मतदारसंघाचा पेच कायम

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने हिंगोली, हातकणंगले, मावळ आणि बीड या चार मतदारसंघांतील उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहेत. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत बीडचा समावेश नसल्याने मुंडेसमोर कोण यासाठी उत्सुकता लागली आहे. आगा‌मी काळात जयदत्त क्षीरसागर अथवा सुरेश धस यांच्यापैकी एकाचे नाव फायनल होणार आहे.

मनसेतल्या दुफळीने ‘कृष्णकुंज’ घामाघूम

$
0
0
टोलविरोधी आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत वाद टोकाला पोहचला आहे. या अंतर्गत दुफळीची माहिती घेण्यासाठी जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन काळे, पुढील आठवड्यात येणार आहेत, तर बाळा नांदगावकरांनीही पदाधिकाऱ्यांना मुंबईला बोलावले आहे.

उस्मानाबादेतील लढत काका-पुतण्यात

$
0
0
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून महायूतीतर्फे सेना आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या मतदार संघात यंदा काका-पुतणे अशी लढत पहावयास मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

जनतेचा उमेदवार म्हणून लोकसभा लढविणारच

$
0
0
परिवर्तन यात्रेच्या समारोपानिमित्त तुळजापूर येथे आयोजित सभा म्हणजे शक्तिप्रदर्शन नव्हे तर ही सभा म्हणजे विचारांचे प्रदर्शन आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात विकासाची गंगा आणून या लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडविण्यासाठीच आपली उमेदवारी आहे, अशी घोषणा लोकमंगल समूहाचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख यांनी केली.

‘ते’ माकड अखेर जेरबंद

$
0
0
हतनूर- जैतापूर रस्त्यावर मातोश्री फार्मजवळ एक महिन्यापासून उच्छाद मांडलेले माकड अखेर गुरूवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. या माकडाने १७ जणांना चापट बुक्याने मारहाण करून बोचकारले होते. त्यापैकी एक जण अद्यापही उपचार घेत आहे. या माकडाची परिसरात दहशत बसली होती.

'त्या' शिक्षकांचे पगार थांबवा

$
0
0
‘बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे ताब्यात न घेणाऱ्या ज्युनिअर कॉलेजांमधील शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे पगार थांबवा,’ असे पत्र विभागीय मंडळाने ‌शिक्षण उपसंचालकांना गुरुवारी दिले. विभागात बारा कॉलेजांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे स्वीकारलेले नाहीत, याची यादीही बोर्डाने जाहीर केली.

‘आप’मधून चौघांची हकालपट्टी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त आयोजित सभेत झालेल्या गदारोळानंतर ‘आम आदमी पार्टी’ने कठोर भूमिका घेऊन माजी जिल्हा संयोजकांसह चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तीन कार्यकर्त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आल्या आहे, अशी माहिती पक्षातर्फे देण्यात आली.

पालिकेचे बजेट आज

$
0
0
पालिकेचे ‘प्रो-पूअर’ बजेट शुक्रवारी स्थायी समितीला सादर केले जाणार आहे. हे बजेट साडेपाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

झोपडपट्ट्यांबाबत धूळफेक

$
0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १९९५पर्यंतच्या झोपडपट्ट्या नियमित करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली घोषणा मुंबई-पुणे येथील झोपडपट्टीवासीयांसाठीच लाभदायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

‘आप’च्या बैठकीत कलगीतुरा

$
0
0
‘आम आदमी पार्टी’च्या कार्यकर्त्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मराठवाडा प्रभारी शकील अहेमद यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गदारोळ उडाला.

नव्या धरणांसाठी निधीचे काय?

$
0
0
सध्या सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याशिवाय नवे प्रकल्प हाती घेऊ नयेत, या भूमिकेवर राज्यपाल ठाम आहेत. त्यामुळे ६०० हेक्टर क्षमतेपर्यंतचे नवे प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी दिले आहेत. नव्या सिंचन प्रकल्पांसाठी निधी कसा उपलब्ध होईल, अशीही विचारणा त्यांनी केली आहे.

अध्यादेशानंतरच पेपर तपासणी

$
0
0
बारावी उत्तरपत्रिका तपासणीचा पेच कायम आहे. उर्वरित मागण्यांच्या संदर्भात सरकार अध्यादेश काढत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवणार असल्याचे, गुरुवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने स्पष्ट केले.

उद्योग भरारीसाठी क्लस्टर

$
0
0
ग्रामीण भागात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ‘क्लस्टर’ पद्धतीचा स्वीकार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना जाहीर करण्यात आली आहे. ‘डी’, ‘डी प्लस’ या औद्योगिक वर्गीकरणातील भाग आणि विनाउद्योग वर्गातील जिल्ह्यांसाठी ही योजना असेल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images