Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

उत्तरपत्रिका तपासणी आजपासून

0
0
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्काराचे सावट दूर झाले आहे. तपासणीवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शुक्रवारी घेतला. उर्वरित मागण्यांचे अद्यादेश आठ दिवसांत काढण्याचे शासनाने मान्य केल्याने बहिष्कार मागे घेण्यात आल्याचे महासंघाने स्पष्ट केले.

पदवी मिळाल्याचा आनंद

0
0
कोणाच्या चेहऱ्यांवर पदवी मिळाल्याचा आनंद, कोणाच्या चेहऱ्यावर मित्रांपासून दूर जाण्याचा विरह. तर पालकांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहणारा आनंद अशा वातावरणात मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचा सतरावा दीक्षांत समारोह उत्साहात पार पडला. समारोहात हॉटेल मॅनेजमेंटच्या १०३ व ४६ कलीनरी आर्टच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

‘भूमिगत’ च्या वाटाघाटी जमेना

0
0
भूमिगत गटार योजनेच्या वाटाघाटी जमत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. वाटाघाटीच्या तीन फेऱ्या झाल्यावरही इच्छुक ठेकेदाराने फक्त पाच कोटी रुपये कमी केल्यामुळे या योजनेचे टेंडर रिकॉल होणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नरेंद्र महाराजांचे औरंगाबादेत प्रवचन

0
0
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी चार मार्च रोजी नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानाच्या वतीने सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून गरजू शेतकऱ्यांना १६० फवारणी पंप वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री संप्रदायाचे सचिव अभिजित पगारे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

दहावीची परीक्षा सोमवारपासून

0
0
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहे. औरंगाबाद विभागातून १ लाख ६६ हजार ७६७ परीक्षार्थी परीक्षेला बसले आहेत.

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

0
0
भोळ्या स्वभावाची पत्नी आहे म्हणून लग्नानंतर दोन वर्षातच तिचा खून करणाऱ्या नवऱ्यास येथील जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. ही शिक्षा दुसरे जिल्हा न्यायाधीश एस. बी. म्हस्के यांनी सुनावली.

बजेट १८० कोटींनी वाढणार?

0
0
आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटला मूर्त स्वरूप देण्यासाठी स्थायी समितीच्या सदस्यांची शनिवारी रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात आयुक्तांचे बजेट सुमारे १८० कोटी रुपयांनी वाढवण्याचे संकेत देण्यात आले. सोमवारी आयुक्तांच्या बजेटवर स्थायी समितीत चर्चा होणार आहे, त्यात वाढ सुचवली जाण्याची शक्यता आहे.

राहूलच्या सभेसाठी एक हजार वाहने

0
0
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या औरंगाबादेतील ससाभेठी येत्या बुधवारी (पाच मार्च) जालना जिल्‍ह्यातून एक हजार बस आणण्‍याचे नियोजन जालना जिल्‍हा काँग्रेसने केले आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (एक मार्च) सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

पैठणमध्ये शेतकऱ्यांची कंपनी

0
0
शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत पोचवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा चांगला मोबदला मिळावा म्हणून पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिष्ठान अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली आहे.

अण्णा चारित्र्यवानांचा प्रचार करणार

0
0
येत्या लोकसभा निवडणुकीतील भ्रष्टाचारी उमेदवारांविरुद्ध त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपवर मतदारांचा विश्वास नाही

0
0
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेताल वक्तव्य करून निवडणुका जिंकण्याचे मनसुबे रचित आहे, परंतु काँग्रेस पक्षाच्या विचाराचे नागरिक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. देशात काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सिल्लोड येथे व्यक्त केला.

यशवंतराव पुरस्कारांचे आज वितरण

0
0
नवमहाराष्ट्र युवा अभियान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय सामाजिक, युवा व क्रीडा युवा पुरस्कारांचे वितरण रविवारी शहरात होणार आहे. यानिमित्ताने फॅन्ड्री चित्रपटाच्या टीमसमवेत प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

गारपिटीने २ लाख एकरांचं नुकसान

0
0
गेल्या दोन-तीन दिवसांतील पाऊस, गारपिटीमुळे मराठवाड्यातील २ लाख ५ हजार ४८० एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या दुष्काळात होरपळून निघालेल्या औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

५ ठेक्यातून पालिकेने गाठला कोटीचा पल्ला

0
0
तयबाजारी आणि पार्किंगच्या पाच विविध ठेक्यातून पुढच्या आर्थिक वर्षात महापालिकेला ९४ लाखाचे उत्पन्न मिळणार आहे. मनपाचे अप्पर आयुक्त राम गगराणी यांच्या उपस्थितीत जाहीर लिलावाची प्रक्रिया पार पडली. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न अनुक्रमे अडीच आणि सव्वापटीपर्यंत वाढले आहेत.

चांदणीतून बार्शीसाठी पाणी नेण्यास विरोध

0
0
परंडा (जि. उस्मानाबाद) शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. तर दुसरीकडे परंडा तालुक्यातील चांदणी प्रकल्पातून बार्शी (जि. सोलापूर) शहरासाठी ५३ कोटी रुपये निधी मंजूर करून मोठी पाणीपुरवठा योजना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी मंजूर करून घेतली. ‌

पत्नीचा खून : पतीस जन्मठेप

0
0
भोळ्या स्वभावाची पत्नी आहे म्हणून लग्नानंतर दोन वर्षातच तिचा खून करणाऱ्या नवऱ्यास येथील जन्मठेप व एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. ही शिक्षा दुसरे जिल्हा न्यायाधीश एस. बी. म्हस्के यांनी सुनावली.

भूम तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

0
0
हिवाळा संपत असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यावर मात्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील १३ गावांना टँकरद्वावरे पाणी पुरवठा करण्याची वेळ उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्हा प्रशासनावर येवून ठेपली आहे.

गेवराईत बांधले शिरपूर बंधारे

0
0
पडणाऱ्या पावसाचा वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवून जमिनीत मुरवन्याचा धडा या दुष्काळाने जिल्ह्यातील जनतेला मिळाला. या दुष्काळाचा धडा घेवून अनेक पाणलोटाची कामे बीड जिल्ह्यात सुरू आहेत. जिल्ह्यातील गेवराई तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील काही गावात शिरपूर पद्धतीचे बंधारे केले आहेत .

बीअर, दारूची दुकाने बंद करण्याची मागणी

0
0
हर्सूल टी पॉइंट येथील बिअर शॉपी व देशी दारूच्या दुकानाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीने शनिवारी, १ मार्च रोजी आंदोलन केले. साई बिअर शॉपी, श्रेयस बिअर शॉपी व देशी दारूच्या दुकानाविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

मळणीयंत्रात पदर अडकून महिलेचा मृत्यू

0
0
हिवरा खालसा (ता. घनसावंगी) येथे मळणी यंत्राच्या पंख्यात साडीचा पदर अडकल्याने महिलेचा मृत्यू झाला. संगिता कुमार कदम (वय ३५) असे त्या महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी हा अपघात घडला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images