Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

लूटमार करणाऱ्यांना तासाभरात अटक

$
0
0
रिक्षाचालकास भररस्त्यावर मारहाण करून पैसे लुटणारे पैसे लुटल्याची घटना शनिवारी जळगाव रोडवर घडली. घटनेची माहिती कळताच सिडको पोलिसांनी अथक प्रयत्न करत अवघ्या एक तासातच लुटमार करणाऱ्या दोघांही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

मध्यवर्ती बसस्थानकातून २६ हजारांचे दागिने लंपास

$
0
0
मध्यवर्ती बसस्थानकामधून जेष्ठ नागरिक महिलेचे २६ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दर्ग्याजवळील झाडाचा अडथळा नाही

$
0
0
शहानूरमिया दर्गा चौकातील चिंचेच्या झाडाचा वाहतुकीसाठी अडथळा होत नाही, असा दावा वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य डॉ. दिलीप यार्दी यांनी केला आहे. उड्डाणुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर हे झाड तोडण्याच्या मागणीने उचल खाल्ली आहे.

वाटमारी करणारे तासाभरात जेरबंद

$
0
0
रिक्षाचालकाला अडवून लुबाडणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या एका तासात सिडको गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. मिसारवाडी भागात पाठलागानंतर ‌हे आरोपी ताब्यात आले. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटीच्या कामावर आज परिणाम शक्य

$
0
0
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोमवारी (तीन मार्च) होणाऱ्या एक दिवस काम बंद आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी हॉस्पिटल) चतुर्थ श्रेणी कर्मचारीही सहभागी होणार आहेत.

रस्ते, पुलांसाठी नाबार्डचे स्वस्त कर्ज

$
0
0
राज्यातील ३११ ग्रामीण रस्ते आणि ६८ पूल यांच्या बांधकामासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेकडून (नाबार्ड) २९१ कोटी २१ लाख ३४ हजार रुपये कर्ज घेण्याचे सरकारने ठरविले आहे. या कर्जावर सव्वासात टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

विद्यापीठात ‘सेंट्रल लंच होम’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा ‌विद्यापीठ ‘सेंट्रल लंच होम’ उभारणार आहे. अत्याधुनिक सुसज्ज असे हे मध्यवर्ती भोजन कक्ष असणार आहे. यात शंभर क्षमतांचे दोन स्वतंत्र भोजन कक्ष असतील.

...तर अधिकाऱ्यांकडून वसुली

$
0
0
महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (एमआरईजीएस) केलेल्या कामांची मजुरी देण्यास उशीर झाला, तर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून विलंबाबाबतची भरपाई वसूल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मजुरी देण्याच्या प्रक्रियेचे वेळापत्रकही सरकारने ठरविले आहे.

हरभऱ्याच्या झाडावरून पाडले!

$
0
0
सध्या नवा हरभरा बाजारात आला असला तरी यंदा पीक मुबलक आल्याने हमीभावापेक्षाही कमी भावाने खुल्या बाजारात हरभरा व्यापारी खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने खरेदी केंद्रे सुरू केल पण, त्यातील अटी आणि दिरंगाईमुळे शेतकरीच कातावले असून ते खुल्या बाजाराकडेच जात असल्याचे दिसत आहे.

मुंडेंच्या विरोधात धस

$
0
0
बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस आणि आम आदमी पक्षाचे 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'फेम नंदू माधव यांच्यात लढत होणार आहे.

लातूर लोकसभेचा उमेदवार ठरविणार काँग्रेसचे पदाधिकारी

$
0
0
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील प्रायमरीज नुसार लातूरचा काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षांतर्गत मतदान १३ मार्च रोजी होणार असल्याची माहिती पक्षाचे निवडणुक निर्णय अधिकारी पियुष त्रिवेदी (राजस्थान)व सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक राठोड (हिमाचल प्रदेश) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उस्मानाबादेत अण्‍णा हजारे पुरस्कृत उमेदवार

$
0
0
उमरगा तालुक्यतील सामाजीक कार्यकर्ते विनायक पाटील - कवठेकर हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अण्‍णा हजारे पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

साडेपाच कोटींची थकबाकी

$
0
0
उस्मानाबाद नगरपालिकेकडे महावितरणची ५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे.थकबाकीच्या सततच्या वाढत्या आलेखामुळे महावितरणने नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हायत्रस्ट लॅम्पच्या वीज जोडणीला स्पष्ट नकार दिला आहे.

दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांची तारांबळ

$
0
0
दहावी परीक्षेच्या प्रवेशपत्रात अनेक चुका आढळून आल्याने ऐनवेळी विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. अशा विद्यार्थ्यांना चूक दुरुस्त करून परीक्षेचे तात्पुरते प्रवेशपत्र देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राबाहेर सकाळी दहापासूनच गर्दी झाली होती.

अवैध दारू, जुगार रोखण्यासाठी विशेष पथक

$
0
0
नविन आयुक्त राजेंद्रसिंह यांनी आपला ठसा उमटवणे सुरू केले आहे. गुन्हेशाखा देखील कात झटकून कामाला लागण्याच्या तयारीत आहे. आयुक्तांच्या सुचनेनुसार दोन झोनसाठी दोन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. तसेच अवैध दारू, पत्त्याचे क्लब, किरकोळ गुन्ह्यासाठी वेगळया पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

चेन्नई एक्स्प्रेसचे उत्स्फूर्त स्वागत

$
0
0
मागील वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेली नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांसह चेन्नईकडे धावली. ‘साउथ इंडियन कल्चरल सोसायटी’ आणि ‘सप्तस्वर कल्चरल सोसायटी’च्या प्रतिनिधींसह शहराच्या महापौर यांनी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

अमरनाथ यात्रा परवान्यासाठी गर्दी

$
0
0
अमरनाथ यात्रेसाठी अत्यावश्यक यात्रा परवाना व अर्ज घेण्यासाठी यात्रेकरुंनी गर्दी केली. सोमवारपासून जम्मू अॅँड काश्मीर बँकेत हा परवाना देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सुमारे दीडशेहून अधिक यात्रा परवान्याचे वाटप झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यात्रा परवान्याचा कोटा यंदा कमी झाल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी नफीसाबेगम

$
0
0
सिल्लोडच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा नफीसाबेगम अब्दुल सत्तार यांची फेरनिवड झाली आहे. उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचेच किरण पवार यांची निवड झाली आहे.

खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या शाळांना अनुदान

$
0
0
शालेय मुला-मुलींच्या क्रीडा कौशल्यांना व्यापक संधी व सुविधा देणाऱ्या शाळांसाठी राज्य शासनाने भरघोस अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंच्या शाळांना पन्नास हजार ते सात लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.

अर्थसंकल्प ११३ कोटींनी वाढवला

$
0
0
पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ११३ कोटींची वाढ करून स्थायी समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प आता बुधवारी (५ मार्च) सर्वसाधारण सभेसमोर मांडला जाईल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images