Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परीक्षेच्या काळात उडवले अर्धा तास फटाके

$
0
0
वाढदिवसाचा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी माननीयांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. मात्र, ती करत असताना दहावीची परीक्षा सुरू असल्याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवले नाही. विशेष म्हणजे पोलिसांनीही बघ्याचीच भूमिका या ठिकाणी वठवली.

महावितरणची पालिकेकडे ५.५ कोटींची थकबाकी

$
0
0
उस्मानाबाद नगरपालिकेकडे महावितरणाची ५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या सततच्या वाढत्या आलेखामुळे महावितरणाने नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हायमास्ट लॅम्पच्या वीज जोडणीला स्पष्ट नकार दिला आहे.

गारपिटग्रस्तांना विशेष पॅकेज द्या

$
0
0
बीड जिल्ह्यात सोमवारी झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले आहे, बीड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात नैसर्गिक आपत्ती आली असताना सरकार मात्र मराठवाड्यातील गारपिट झालेल्या भागात पंचनामे करायला उशिर करीत आहे, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.

अवकाळीच्या फटक्याने शेतकऱ्यांचा खिसा फाटका

$
0
0
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली. द्राक्षांसह अन्य फळांना उठाव नसल्यामुळे फळ आणि भाजीपाल्याचे दर कमी करण्याची पाळी व्यावसायिकांवर आली आहे.

१० हजार हेक्टरवरील नुकसानाचा लातूरमध्ये अंदाज

$
0
0
गेल्या दोन दिवसांत गारपिटीने लातूर जिल्ह्याला थंडगार केले आहे. या भयानक अशा गारपिटीमुळे लातूर जिल्ह्यातील किमान दहा हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

१० हजार हेक्टरवरील नुकसानाचा लातूरमध्ये अंदाज

$
0
0
गेल्या दोन दिवसांत गारपिटीने लातूर जिल्ह्याला थंडगार केले आहे. या भयानक अशा गारपिटीमुळे लातूर जिल्ह्यातील किमान दहा हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘एवढी गारपिट गेल्या ३० वर्षांत पाहिली नाही’

$
0
0
बीड जिल्ह्यात सोमवारी गारप‌िट झाली. मार्च महिन्यात गेल्या तीस वर्षांत अवकाळी पाऊस आणि गारपिट एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंद झालेली नाही. या गारपिटीने आंबा, डाळिंब, खरबूज, टरबूज, मोसंबी, द्राक्ष या फळ पिकाबरोबर गहू, ज्वारी, हरबरा, कापूस, तूर आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

$
0
0
जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला. ज्वारी, गहू, हरभरा या महत्त्वाच्या पिकांसोबतच फळबागा उध्वस्त झाल्या. कृषी विभाग नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करीत असून बुधवारी प्राथमिक अहवाल उपलब्ध होईल.

गारपिटीने पिके भुईसपाट

$
0
0
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना अक्षरशः आडवे - तिडवे झोडपले. रब्बी पिके ऐन काढणीत असताना कोसळलेल्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झालेत. फळबागांच्या नुकसानीमुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या वतीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी सुरू आहे.

फायटरने मारहाण करीत तरुणाला लुबाडले

$
0
0
फायटरने मारहाण करुन तरुणाला लुबाडल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गारखेडा इंदिरानगर भागातील सय्यद निसार सय्यद मुश्ताक (वय २७) हा तरुण दुपारी इंदिरानगर येथील नूर मशिदीपासून जात होता.

‘सिडको’कडून शेतकऱ्यांची फसवणूक

$
0
0
सिडको वाळूज महानगरासाठी शेतकऱ्यांच्या केवळ २५ टक्केच जमिनी संपादित करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात जास्तीची जमीन संपादित करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप तीसगाव येथील शेतकरी कृती समितीचे राणोजी जाधव यांनी मंगळवारी (चार मार्च) पत्रकार परिषदेत यांनी केला.

रोख रक्कम, भेट वस्तूंवर संक्रांत

$
0
0
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चावर जिल्हा प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. निवडणुकीच्या काळात ५० हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि १० हजारांपेक्षा जास्त किमतीचे गिफ्ट बॉक्स असणाऱ्यांना भरारी पथकाच्या झाडाझडतीला सामोरे जावे लागणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सोमवारी (तीन मार्च) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

भारताला हिंदूराष्ट्र संबोधणे घटनाबाह्य

$
0
0
भारतीय घटनेच्या अनु‌च्छेदाची सुरुवातच ‘इंडिया दॅट इज भारत’ने होते. धर्मनिरपेक्षता हा घटनेचा मूळ गाभा आहे. त्यामुळे भारताला हिंदुस्थान किंवा हिंदुराष्ट्र संबोधने अयोग्य व घटनाबाह्य आहे असे मत अॅड. जी. आर. शेळके यांनी व्यक्त केले.

वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी घेतले कोंडून

$
0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारापासून महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत धाव घेऊनही डीपी मिळत नसल्यामुळे पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी महावितरणच्या कार्यालयातच स्वतःला कोंडून घेतले.

मनसेला शोध तुल्यबळ उमेदवारांचा

$
0
0
लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा पेच कायम असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मराठवाड्यातील पदाधिकारी व इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहेत. राज्यातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मोजक्याच जागा लढवण्याबाबत पक्षात खल सुरू आहे.

बोर्ड अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा निषेध

$
0
0
उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे घेतल्यानंतरही बोर्ड व शिक्षकांमधील संघर्ष थांबलेला नाही. बोर्ड अधिकाऱ्यांनी जबाबदारीने विधाने करावीत असे सांगत ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी बोर्डात धाव घेतली आहे. अधिकाऱ्यांनी शिक्षकांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा निषेध केला.

गळ्यावर तलवार ठेवून ४ लाखांचा ऐवज लुटला

$
0
0
पिठुंबरा गल्लीतील एका घरात गळ्यावर तलवार ठेवत पाच दरोडेखोरांनी चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळवला. शहराच्या मध्यभागी घडलेल्या घटनेने लोकांत दहशत पसरली आहे. सुभाष खंडू शिंगाडे (वय ६१) हे सेवानिवृत्त कर्मचारी मंगळवारी आपल्या घरी झोपले होते.

राष्ट्रवादीमध्येच माझे काही विरोधक

$
0
0
राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आपले काही विरोधक आहेत. त्यामुळेच पक्षाने नोटीस बजावल्याचे कानावर आले. प्रत्यक्ष नोटीस मिळालेली नाही. पण काळजीचे कारण नाही, असे म्हणत आमदार विनायक मेटे यांनी घरचा आहेर दिला.

मोबाइल रिचार्ज करताय, तरुणींनो जरा सावधान...

$
0
0
मोबाइल रिचार्ज करणाऱ्या तरुणीचा नंबर मिळवून तिला फोनद्वारे त्रास देणाऱ्या तरुणाला नागरिकांनी मंगळवारी सकाळी चांगलाच चोप देऊन नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले. हा प्रकार अजबनगर भागात घडला. यामुळे मोबाइल रिचार्ज करताना तरुणींनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.

नांदेडमध्ये राज्यातील पहिले ज्येष्ठ नागरिक भवन

$
0
0
महापालिकेकडून उभारले जाणारे राज्यातील पहिले ज्येष्ठ नागरिक भवन नांदेडमध्ये नाना नानी पार्क परिसरात साकारत आहे. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते या भवनाचे मंगळवारी भूमिपूजन करण्यात आले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images