Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘रोहयो’ घोटाळ्यावर राहुल बोलणार का?

$
0
0
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मोठा गाजावाजा करून केंद्र सरकार मतांचा जोगावा मागत आहे. मात्र, सिल्लोड तालुक्यात या योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना अद्यापही हक्काची पूर्ण मजुरी न देता मध्यस्थांनीच रक्कम हडपली.

सभेमुळे एसटीला २ कोटींचा फायदा

$
0
0
राहुल गांधींच्या सभेसाठी काँग्रेस पक्षाने एसटी विभागाशी प्रासंगिक करारावर १०३५ गाड्या बुधवारच्या कार्यक्रमासाठी घेतल्या आहेत. एका दिवसाच्या नियोजनासाठी एसटी विभागाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

राहुल यांच्या सभेसाठी बंदोबस्त चोख

$
0
0
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बुधवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यांच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह वरिष्ठ अधिकारी आणि हजारो पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

शहरातील ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढल्या

$
0
0
शहरातील पाच रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढल्याचे शपथपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केले. तर, पहिल्या व दुस-या टप्प्यामध्ये कोणकोणती कामे झाली, कोणती राहिली, याविषयीची सविस्तर माहिती अतिरिक्त शपथपत्रात सादर करण्याचे आदेश खंठपीठाने महापालिकेला दिलेत.

पर्यायी रस्त्यासाठी आरटीओ कामाला

$
0
0
औरंगाबाद शहर ते शेंद्रा एमआयडीसी हे चाळीस किलोमीटरचे अंतर अधिक होत आहे. त्यासाठी हार्ड सरफेसचा पर्यायी रस्ता शोधण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आरटीओ’ची भेट घेतली.

‘RTO’तील सुविधांसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा

$
0
0
प्रादेशिक परिवहन विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा विभाग असून, उत्पन्न देणारे विभाग असुनही या कार्यालयात आलेल्या लोकांसाठी सोयीसुविधा मिळत नाही. याशिवाय कामे लवकर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपाययोजना केली जात नाही.

भाजप नगरसेवकांची बजेटसाठी वेगळी चूल

$
0
0
पालिकेच्या बजेटवरून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी मंगळवारी वेगळी चूल मांडली. उपमहापौर संजय जोशी यांच्या दालनात शहराध्यक्ष भगवान घडमोडे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांची बैठक झाली. त्यात सर्व नगरसेवकांच्या वॉर्डातील जास्तीत जास्त कामांचा समावेश बजेटमध्ये असले पाहिजे, अशी सूचना करण्यात आली.

महाराष्ट्राच्या मानगुटीवर रखडलेल्या प्रकल्पांचे भूत


गारपीटग्रस्तांना मदतीसाठी आचारसंहितेची अडचण नाही

$
0
0
राज्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मदत केली जाईल. ही मदत देण्यास लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (चार मार्च) नागपूर येथे सांगितले.

राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार

$
0
0
राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळात अडीच लाख एकरवरील मोसंबीच्या फळबागा जळाल्या होत्या. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही नुकसानभरपाई मिळाली नाही.

लाखांवर कार्यकर्ते जमा होणार

$
0
0
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बुधवारी होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेत मराठवाड्यातून लाखांवर कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राहुल गांधींच्या सभेसाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्यांसाठी शहरातील पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

कर्जाचा भार वाढणार का?

$
0
0
‘स्पील ओव्हर’च्या कामांची बिले देण्यासाठी व विकासकामांचा गाडा वेगाने हाकण्यासाठी कर्ज काढण्याचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मांडला जाण्याची शक्यता आहे.

युतीमध्ये श्रेयासाठी ‘फटाके’

$
0
0
महापालिकेच्या बजेटवरून शिवसेना-भाजपमध्ये मंगळवारी श्रेयवादाचे फटाके फुटले. बजेटमध्ये वाढ करण्याच्या स्कोप ठेवला नाही, असे म्हणून महापौर कला ओझा यांनी स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

गारपिटीचा मारा

$
0
0
दुष्काळाच्या होरपळीनंतरच्या दमदार पावसामुळे मराठवाडी शेतकरी सावरत होता. समाधानकार पावसामुळे रब्बीची पिकंही जोमदार आली, पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उभ्या रब्बीला अडवे करून टाकले.

क्लाउड कम्प्युटिंग, इंटरनेटची दुसरी क्रांती

$
0
0
‘क्लाउड कम्प्युटिंग’ हा इंटरनेटच्या प्रगतीमधील दुसरा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. दुसरी क्रांती संबोधली जात आहे. म्हणजे अजून काही वर्षांनी जगभर ‘नेट’ या शब्द-प्रयोगासोबत ‘क्लाउड’चा वापर सुरू होणार आहे.

महोत्सवाच्या तयारीत रंगकर्मी मग्न

$
0
0
रंगभूमीवर व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांचे प्रमाण वाढले आहे. नवोदित रंगकर्मीसुद्धा नवीन नाटकांसाठी प्रयत्नशील आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्य महोत्सवात रसिकांना खास नवीन नाटकांची पर्वणी मिळणार असून सध्या महोत्सवाच्या तयारीत विद्यार्थी मग्न आहेत.

‘गर्दी’ जमवायची कशी?

$
0
0
औरंगाबादमध्ये सध्या होत असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी जमवायची कशी हा मोठा प्रश्न आयोजकांना पडला आहे. शनिवार-रविवार विकेंड म्हणून साजरा करताना त्याच दिवशी या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, परंतु गर्दी तर होत नाहीच शिवाय आयोजकांनी आणलेले मोठ-मोठे कलाकारही नाराज होऊन या भागाची वेगळीच इमेज करून घेऊ लागले आहेत.

सामाजिक वास्तवाची ‘धग’

$
0
0
‘धग’ चित्रपटाच्या दमदार कथानकामुळे चांगल्या कामाचा शोध संपला. या भू्मिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते. मात्र, सामाजिक वास्तव अभ्यासकांसोबतच सामान्य प्रेक्षकांनाही अंतर्मुख करणारे ठरले. त्यामुळे ही भूमिका करिअरला टर्निंग पॉईंट देणारी ठरली’, असे प्रतिपादन अभिनेत्री उषा जाधव हिने केले. बहुचर्चित ‘धग’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती.

अशोकरावांच्या उपस्थितीत भ्रष्टाचारावर चर्चा

$
0
0
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भ्रष्टाचारावरून भाजप व नाव न घेता आम आदमी पार्टीवर टीकेची झोड उठवली. मात्र, त्याच वेळी सभेच्या व्यासपीठावर आदर्श सोसायटी गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्रीपद सोडावे लागलेले अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. या विरोधाभासाची सभेनंतर चांगलीच चर्चा होती.

राहुल यांच्यापुढे शक्तिप्रदर्शन

$
0
0
‘दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरमुळे (डीएमआयसी) या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. देशातील पहिली औद्योगिक नगरी तुमच्या शहरात वसवली जात असल्याने मागास भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही,’ असे सांगत मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images