Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिकेकडे महावितरणची ५.५ कोटींची थकबाकी

0
0
उस्मानाबाद नगरपालिकेकडे महावितरणची ५ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे.थकबाकीच्या सततच्या वाढत्या आलेखामुळे महावितरणने नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हायत्रस्ट लॅम्पच्या वीज जोडणीला स्पष्ट नकार दिला आहे.

परभणी जिल्ह्यातील उद्‍ध्वस्त पिकांचे पंचनामे

0
0
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, सेलू, मानवत व पाथरी तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीने प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. या गारपीटीमध्ये गाय, म्हैस, वासरांचही मोठया प्रमाणात मृत्यू झाला.

संशोधकांच्या आळशी वृत्तीमुळे ‘नोबेल’ मिळत नाही

0
0
संशोधकाची आळशी मनोवृत्ती राष्ट्र उभारणीसाठी घातक ठरत आहे. सध्यस्थितीत देशभरातील संशोधन आणि संशोधकांच्या बाबतीत ही परिस्थिती दिसून येत आहे. डॉ. सी. व्ही. रमण, रवींद्रनाथ टागोर यांच्यानंतर भारताला नोबेल पारितोषिक मिळाले नाही, असे मत हैद्राबाद येथील उस्मानीया विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक व जेष्ठ वैज्ञानिक डॉ. सी मनोहराचारी यांनी व्यक्त केले.

पैठण शिवसेनेत पुन्हा गटबाजी

0
0
पैठण शिवसेनेत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली. बुधवारी उपजिल्हाप्रमुख विनायक हिवाळे यांच्या पैठण येथील संपर्क कार्यालय उद‍्घाटनाच्या कार्यक्रमावर माजी आमदार संदिपान भुमरे यांच्या गटाने अघोषित बहिष्कार टाकला.

आचारसंहिता लागू होताच होर्डिंग काढले

0
0
येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले असून येत्या १७ एप्रिलला नांदेड येथे मतदान घेण्यात येणार आहे. नांदेड महापालिकेने शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी असलेले होर्डींग मंगळवारी रात्री पासूनच काढण्यास सुरुवात केली होती.

‘सिडको फेज-३’ला शेतकऱ्यांचा विरोध

0
0
सिडकोकडून विकसित करण्यात येणाऱ्या महानगर फेज ३ च्या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीत कडाडून विरोध केला. आम्हाला टीडीआर नको, पैसेही नको. यापूर्वी फेज १, २ साठी २५ टक्क्यांहून जास्त घेतलेल्या जमिनीचा मोबदला द्या, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

नेफ्रॉलॉजीत डायलिसिसला दीड महिना अवकाश

0
0
मूत्रविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी घाटी रुग्णालयात अद्ययावत नेफ्रॉलॉजी विभाग बांधण्यात आला आहे. उपकरण खरेदी प्रक्रियेच्या कासवगतीमुळे किमान दीड महिन्यानंतर डायलिसिस नेफ्रॉलॉजी विभागात हलवण्यात येणार आहे.

नातवाच्या मदतीने आजीबाईंच्या चोऱ्या

0
0
सायबर सेलच्या पथकाने मोबाइल व लॅपटॉप चोरीच्या गुन्ह्यामध्ये दोन तरुणांना अटक केली आहे. यापैकी एका तरुणाच्या आजीने नातवाच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. आजी फरार झाली असून आरोपींना मुद्देमालासह क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

राहुल यांच्या सभेवर दोन कोटींचा खर्च?

0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा झाली आहे. त्यामुळे या सभेसाठी झालेला खर्च काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारांच्या निवडणूक खर्चामध्ये समाविष्ठ करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

बालकल्याण समितीला प्रतीक्षा अध्यक्षांची

0
0
अनाथ, निराधार, काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची जबाबदारी असलेल्या जिल्हा बालकल्याण समिती परिपूर्ण करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.

१.२५ कोटींच्या प्रस्तावाला ४ मिनिटांमध्ये मंजुरी

0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची धास्ती घेऊन सभापती नारायण कुचे यांनी बुधवारी आयोजित केलेली स्थायी समितीची बैठक गुपचूप संपवली. अवघ्या चार मिनिटांमध्ये सव्वा कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देत सभापतींसह स्थायीच्या सदस्यांना घरचा रस्ता धरला.

रस्त्यांच्या कामांवरून पालिका प्रशासनाची कोंडी

0
0
रस्त्यांच्या कामांसाठी पालिकेच्या प्रशासनाकडे सुमारे सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे आता पाचशे कोटी रुपयांमध्ये कोणते रस्ते बसवायचे, यासाठी पालिका प्रशासनाची कसोटी लागणार आहे.

गारपिटीने १ लाख एकरला फटका

0
0
बीड जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या घेतलेल्या माहितीनुसार एक लाख एकरहून अधिक शेती पिकाचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे .

निद्रा विकारांवर ‘स्लीप लॅब’

0
0
‘एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस’ या अभिमत विद्यापीठाच्या वतीने अमेरिकेतील पेनसिल्वानिया विद्यापीठाच्या सहकार्याने नवी मुंबईतील कामोठे येथील एमजीम रुग्णालयात ‘स्लीप मेडिसिन अँड रिसर्च सेंटर’चे उद्घाटन गुरुवारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

घाटीत गळके वॉर्ड, टॉयलेट तुंबले

0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मनोविकृती विभागाच्या जुन्या वॉर्डामधून वाहणाऱ्या अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे रुग्ण, नातेवाईक; तसेच डॉक्टर-कर्मचारी हैराण झाले आहेत. त्यातच गेल्या आठवड्यापासून वॉर्डातील बहुतेक सर्व टॉयलेट चोकअप झालेत.

SSC बोर्डाचे ‘कारभारी’ निलंबितच

0
0
मुदत संपल्यानंतरही पद न सोडणाऱ्या एसएससी बोर्डाच्या सदस्यांच्या निलंबनाच्या कारवाईवर हायकोर्टाचा औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. तसेच सदस्यांची मुदतवाढीची मागणी करणारी याचिका बुधवारी फेटाळली.

इंग्रजांप्रमाणे भाजपलाही घरी पाठवू!

0
0
‘इंग्रजांना काँग्रेसच्या विचारांनी पराभूत केले. त्यांना आम्ही प्रेमाने घरी पाठविले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाला आम्ही प्रेमाने घरी पाठवू,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केले.

मोबाइल रिचार्ज करताय, सावधान!

0
0
तरुणींनो मोबाइल रिचार्जसाठी दुकानदाराला मोबाइल क्रमांक सांगताना सावधान! कारण दुकानदार विश्वासू नसेल तर तो तुमच्या क्रमांकाचा गैरवापर करू शकतो किंवा तुम्हाला फोन करून त्रास देऊ शकतो. असाच एक प्रकार नुकताच औरंगाबादमध्ये समोर आला आहे. तरुणीला फोन करून त्रास देणाऱ्या या तरुणाला लोकांनी चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केला आहे.

राहुल चुकले,ज्योतिबाई फुले म्हणाले!

0
0
महिला संरक्षण, महिला सबलीकरण यासाठी आम्ही हे केले, ते केले असे दावे करणा-या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य झिजवणा-या जोतिबा फुले यांचे नावही घेता आले नाही. औरंगाबादेत झालेल्या सभेत त्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाचा उल्लेख चक्क ज्योतिबाई फुले असा केला.

औरंगाबादेत नववे जलसाहित्य संमेलन

0
0
पाणी प्रश्नाबाबत समाजात जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने भारतीय जलसंस्कृती मंडळ आणि एमआयटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १३ व १४ मार्च रोजी नववे जलसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images