Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महिन्याभरात कुत्र्यांनी तोडले साडेचारशे जणांचे लचके !

0
0
फेब्रुवारी महिन्यात तब्बल साडेचारशे जणांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्वांवर घाटी रुग्‍णालायात उपचार करण्यात आले. मराठवाड्याच्या सर्वांत मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये बाह्यरुग्‍ण विभागात दररोज सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक रुग्‍ण तपासणीसाठी येतात.

डॅशींग इनिंग सुरू

0
0
पोलिस आयुक्त संजयकुमारच्या जागी राजेंद्रसिंह यांनी पदभार स्विकारला. सुरुवात त्यांनी धडाकेबाज कारवायांनी केली. आपल्या वेगळया शैलीची चुणूक दाखविली. संजयकुमार नंतर जसे आयुक्त हवे होते, तसेच मिळालेत. शहरवासियांना त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. त्या कितपत पूर्ण होतील हे येणारा काळच सांगेल.

लातूर जिल्ह्यात गारपीट सुरुच

0
0
लातूर जिल्ह्याला बुधवारी रात्री गारपीटीचा तडाखा बसला असून यामध्ये शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. बुधवारी सायंकाळी लातूर तालुक्यातील पूर्व भागातील गावांना गारपीटीचा तडाखा बसला आणि काही वेळातच होत्यचे नव्हते झाले आहे.

संकटग्रस्त शेतकऱ्यांचा नेत्यांना विसर

0
0
उन्हाळा सुरू होत असतानाच उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर गारपीट व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतातील उभ्या पिकांची शिवाय फळबागांची मोठ्या प्रमाणास हानी झाली. या मुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्धवस्त झाले.

देवांचाही धाक नाही

0
0
एन ११, सुदर्शननगर भागातील जैन मंदिरात गुरुवारी मध्यरात्री आठ पंचधातूंच्या मूर्तींसह दोन लाखांचा ऐवज पळवण्यात आला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सहा अट्टल गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

कुस्ती प्रशिक्षण केंद्रांना संजीवनी

0
0
महाराष्ट्रात कुस्तीची परंपरा जोपासण्यामध्ये तालमी आणि आखाड्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आधुनिक युगात कुस्ती अत्याधुनिक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जुन्या तालमींची दुरुस्ती अथवा नुतनीकरणाकरिता सात लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

३२ संघटना असूनही वेतनकरार दूरच

0
0
महावितरण, महानिर्मिती व महापारेषणमधील ९२ हजार कर्मचाऱ्यांची अवस्था ‘सारा गाव मामाचा एक नाही कामाचा’ अशी झाली आहे. तीन कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या ३२ संघटना असूनही अद्याप नवीन वेतन करार झालेला नाही. मागील वेतन करारही मुदत संपल्यानंतर २६ महिन्यानंतर झाला होता.

उमेदवारनिवडीअभावी राहुलच्या सभेचा प्र‍भाव शून्य

0
0
प्रदेशाध्यक्षापासून पालकमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी जोर लावून राहुल गांधी यांची बुधवारची सभा यशस्वी केली. पण, काँग्रेसचा उमेदवारच नसल्यामुळे या सभेचा प्रभाव एका दिवसात ओसरल्याचे जाणवत आहे. यापुर्वीच्या शहरातील सभांच्या तुलनेत या वेळी राहुल गांधी यांचे भाषण उत्तम झाले; पण परिणाम काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दांड्या मारणाऱ्या शिक्षकांवर कारवाई का नाही?

0
0
जिल्हा परिषदेत अनेक ‌शिक्षकांच्या संघटना आहेत. मात्र यातील किती संघटनांना शासन मान्यता आहे. याबाबत जिल्हा परिषदेलाच माहिती नसल्याचा खुलासा स्‍थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. यावरून जिल्हा परिषदेच्या स्‍थायी समितीच्या बैठकीतील सदस्यांनी प्रशासनाने चांगलेच धारेवर धरले.

मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ऐन वेळी इच्छुकांची गर्दी झाली आहे. इच्छुकांमध्ये मनसेच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तीन पत्रकारांचा समावेश आहे. जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर येत्या शनिवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उमेदवारांचा अहवाल तयार करणार आहेत.

आचारसंहितेत वर्क ऑर्डरही कुचकामी

0
0
निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काढण्यात आलेल्या वर्क ऑर्डरही आता कुचकामी ठरणार आहे. लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू झालेल्या कामांशिवाय कोणतीही कामे करता येणार नाही.

तरुणाईला उत्कंठा प्रचाराची

0
0
लोकसभा निवडणुकीचे तरुणाईला वेध लागले आहेत. बीपीओ, आयटी, एमआयडीसी आणि कॉलेजातील तरुणांना या उत्कंठावर्धक निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होण्याची इच्छा आहे. मतदारांना ‘गृहित’ धरणाऱ्या उमेदवारांपेक्षा मतदारांशी चर्चा करुन विकास करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

करा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ व्हा निवांत !

0
0
इव्हेंट मॅनेज करून देण्यात आणि इव्हेंट मॅनेज करून घेण्यात आजकाल औरंगाबादकर खूप फेमस झाले आहेत. किटी पार्टी, बर्थडे पासून लग्नापर्यंतचे सर्व छोटे-मोठे उत्सव साजरे करणारे आजकाल औरंगाबादमध्ये ‘सरळ सरळ कॉण्ट्रॅक्ट देऊन टाकू अन् मोकळं होऊ’ असं म्हणत निवांत होऊ लागले आहेत.

वन विभागातील कार्याची दखल आता जीपीएसद्वारे

0
0
वन विभागातंर्गत केले जाणाऱ्या विविध कामांची नोंद आता जीपीएस (ग्लोबल पोझीशिंग सिस्टम)द्वारे केली जात आहे. वन विभागातील बंधारे, तसेच वृक्षलागवडीसह अतिक्रमीत जागेची माहिती देण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जात आहे.

‘विमेन्स डे’ला आविष्कार… ‘संचारस्वातंत्र्या’चा!

0
0
औरंगाबादला गतिमान बनविण्यात दुचाकीस्वार महिलांचा पुरुषांइतकात मोठा वाटा आहे. आपल्या लाडक्या स्कूटरवर वा मोटारसायकलीवर स्वार होऊन आपलं संचारस्वातंत्र्य अनुभवणाऱ्या औरंगाबादकर महिला या शनिवारी, महिलादिनी, ‘महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेजर ऑल विमेन बाइक रॅली’मध्ये सहभागी होऊन आपल्या वाहनाबद्दल आगळी कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.

शंभरावर घरांवर फिरणार बुलडोजर

0
0
जयभवानीनगरचा चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पुढील आठवड्यात पाडापाडी केली जाणार आहे. त्यावेळी सुमारे शंभरावर घरांवर पालिकेचा बुलडोजर फिरणार आहे. कोर्टाच्या आदेशानुसार हे पाडकाम होणार आहे.

हॉटेलचालकाची आत्महत्या

0
0
लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी तरुणी तसेच बालकाचा विष पाजून, खून करून हॉटेलचालकाने आत्महत्या केल्याचा प्रकार मित्रनगरमध्ये गुरुवारी उघडकीस आला. आकाशवाणीमागील मित्रनगरमध्ये ही घटना घडली.

निवडणूकीचा परीक्षेवर परिणाम नाही

0
0
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या परीक्षांच्या तारखांचा मेळ घातला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये १७ व २४ एप्रिल असे दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.

‘सिद्धार्थ’मध्ये धबधबा

0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि पालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे कामाला लागले. व्हाईट टॉपिंगच्या रस्त्याचे काम त्यांनी गुरुवारी प्रत्यक्ष सुरू केले. त्यानंतर सिद्धार्थ उद्यानाची त्यांनी तब्बल दोन तास पाहणी केली.

पालिकेत गाड्यांची श्रीमंती

0
0
आर्थिकदृष्ट्या ढेपाळलेल्या महापालिकेत पदाधिकारी-नगरसेवकांच्या महागड्या गाड्यांमुळे श्रीमंतीची झलक पाहण्यास मिळत आहे. पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना पूर्वी पालिकेच्या खर्चाने घेतलेल्या गाड्या (चार चाकी वाहने) वापरण्यासाठी देण्यात येत होत्या.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images