Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बर्फाने आच्छादले लोहा

$
0
0
लोहा, कंधार तालुक्यात गुरूवारी सायंकाळी प्रचंड गारपिटीचा फटका बसला. कंधार शहर व लगतच्या धोडजचा डोंगराळ भाग बर्फाच्छादित झाला. लोहा तालुक्यातील रिसनगाव, सावरगाव परिसरात गारांचा चार फुटांपर्यंत थर साचला. लाखो रूपयांचे नुकसान झाले असून रब्बीचे पीक, आंब्यासह फळबागाही उद्घवस्त झाल्या आहेत.

रब्बी हंगाम उद्ध्वस्त

$
0
0
गेल्या दोन आठवड्यांतील अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यातील तब्बल तीन लाख ५९ हजार ५५९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या तडाख्यामुळे विभागातील रब्बी हंगाम उध्वस्त झाला असून, आठ नागरिकांसह १४८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा

$
0
0
गारपीट, अवकाळी पाऊस शिवाय सध्या निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातीलच नव्हे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

मतदारांना नाव नोंदविण्यासाठी अंतिम संधी

$
0
0
निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी रविवारी ( ९ मार्च ) प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक शाखेकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदार यादीसह उपस्थित राहणार आहेत.

निवडणूकीमुळे ‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

$
0
0
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील लोकसभा निवडणूका १७ एप्रिल रोजी होणार असे जाहीर झाले आहे. विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी परीक्षा पुर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे १७ एप्रिल रोजी जे पेपर होणार होते ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत.

मंत्र्याना आचारसंहितेची अडचण नाही

$
0
0
लातूर जिल्ह्यात गारपीटीने हाहाकार माजवला आहे. या नुकसानीमुळे बळीराजा पुर्णपणे कोलमडून पडला आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी मात्र अद्याप या जिल्ह्यातील आपत्तीची पाहणी करण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे जनसामान्यात अंसतोष वाढत आहे.

...कारभारी सुस्त, विद्यार्थी त्रस्त

$
0
0
शाळांपासून कॉलेजपर्यंत सध्या सगळीकडे परीक्षा सुरू आहेत. दहावी, बारावीत बोर्डाचा कारभार चव्हाट्यावर आलाय. या गलथान कारभाराचा फटका बोर्डाच्या प्रतिमेला बसलाच सोबतच सर्वाधिक ससेहोलपट विद्यार्थ्यांची झाली. असेच हाल विद्यापीठात संशोधनासाठी रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांचे सुरू आहेत.

कॅन्टीन एक, दर दोन

$
0
0
पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबादमध्ये पर्यटकांचा राबता असतानाही, त्यांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याऐवजी गोंधळामध्ये वाढ करणाऱ्या प्रकारांचीच वाढ होताना दिसत आहे. रेल्वे स्टेशनवरील एका कॅन्टीनमध्ये या प्रकाराचा प्रत्यय आला असून, या कॅन्टीनमध्ये एकाच पदार्थासाठी दोन वेगवेगळे दर लावण्यात आले आहेत.

ओट्यांची लॉटरी लागेना

$
0
0
किरकोळ भाजीपाला विक्रेते आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात एकमत न झाल्यामुळे भाजीपाला मार्केटमध्ये बांधलेले ओटे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय गेल्या सहा महिन्यांपासून रेंगाळला आहे. ओट्यांची संख्या कमी व अर्ज जास्त आल्याने ड्रॉ काढण्यात येणारा होता. दरम्यान, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रब्बी गावांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त

$
0
0
राज्यात यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि गरपिट झाली. बीड जिल्ह्याला सुद्धा याच मोठा फटका बसला आहे. असे असताना जिल्हा प्रशासनाने मात्र जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी पिकांची अंतिम पैसेवारी पन्नास पैशापेक्षा जास्त असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

अब्दुल सत्तारांकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी

$
0
0
गेल्या चार दिवसात झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आमदार अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांच्या सोबत तालुका कृषी अधिकारी व नायब तहसीलदारांची उपस्थिती होती.

आरोग्य केंद्रांना रुग्णसेवेचे वावडे

$
0
0
जिल्ह्यातील विविध आरोग्य उपकेंद्रांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही तेथे रुग्णांना व्यवस्थित सेवा देण्यात येत नाही. रुग्णांची संख्या वाढत असतानाही, विविध उपकेंद्रांवर कमी रुग्णसंख्या असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे.

काँग्रेसच्या उमेदवारसाठी सात जणांत लढत

$
0
0
राहुल गांधीच्या संकल्पनेतील प्रायमरीज या प्रयोगातून लातूर राखीव लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार होण्यासाठी सात जनांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यासाठी ११६२ मतदार असून १३ मार्च रोजी मतदान होणार आहे.

उस्मानाबादेतील लढत रंगतदार ठरणार

$
0
0
महायुतीतील चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या शिवसेना व भाजपामध्ये आता जागांची अदलाबदल होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये सेनेकडेच गेली आणि २००९चे लोकसभेसाठीचे सेनेचे उमेदवार रवी गायकवाड यांचीच यावेळी लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा झाली.

रोजंदारीवर महिला ‘सरपंच’

$
0
0
राजकीय क्षेत्रात महिला सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहते आहे. त्यातीलच एक आशेचा लख्ख किरण म्हणजे गावगाडा सांभाळत रोजंदारी करून संसाराचा रथ चालवण्याचे आव्हान पेलणाऱ्या शोभा बोलकर. त्या कन्नड तालुक्यातील आडगाव भोसलेच्या सरपंच असून, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही दुसऱ्यांदा सरपंच होण्याचा मान बोलकर यांनी मिळवला.

खटारा बसमधून पर्यटकांचा प्रवास

$
0
0
शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मोठा गाजावाजा करत एसटी महामंडळाने काही दिवसांपूर्वी अजिंठा लेणीसाठी बस सुरू केली. मात्र, अजिंठ्यासाठी चालणारी जुनाट खटारा गाडीच या नवीन मार्गासाठी देण्यात आली आहे. या गाडीला प्रवाशांची संख्याही अत्यंत कमी असल्याने वेगाने धावण्यापुर्वीच या गाडीला अडथळ्याचा प्रवास सुरू झाला आहे.

‘बॅकस्टेज’वर आमचीही मक्तेदारी

$
0
0
रंगभूमीवर महिला कलाकार आणि दिग्दर्शकांची लक्षणीय कामगिरी असली तरी बॅकस्टेजमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे. प्रकाशयोजना, रंगभूषा, संगीत, नेपथ्य, वेशभूषा या प्रकारात अभावानेच महिला दिसतात.

‘स्वयंसिद्धा’

$
0
0
‘अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ या शब्दांत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी माणसाच्या जिद्द अन् चिकाटीचं वर्णन केलंय. या वर्णनाला साजेशा शहरातील सहा जणी स्वयंसिद्धा ठरल्या आहेत.

गारपीटीने पिके आडवी

$
0
0
तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतातली पिके आडवे झाली. त्यात मुख्यतः गहू, हरभरा, कांदा, लसून घासचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचे बैठक सत्र

$
0
0
एलबीटी हटाव व्यापार बचाव, असा नारा देत स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात व्यापारी एकवटले आहे. पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. गुरुवारी रात्री अंतिम निर्णय न झाल्याने येत्या मंगळवारी (११ मार्च) पुन्हा बैठक आयोजित केली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images