Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘राज’वर तिसऱ्या आघाडीत मतभिन्नता

$
0
0
राज ठाकरे यांच्या समावेशावरून तिसऱ्या आघाडीत मतभिन्नता आहे. मनसेच्या समावेशाला डाव्या पक्षांचा सैद्धांतिक विरोध असून जनता दल धर्मनिरपेक्षची मूक संमती आहे. येत्या ११ मार्च रोजी होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे.

आज धूम मचाले...

$
0
0
मैत्रीणींनो तुमची तयारी झाली असेलच... तुम्ही, तुमची दुचाकी आणि ‘महाराष्ट्र टाइम्स हिरो प्लेजर ऑल विमेन बाइक रॅली’ आपण उद्या (८ मार्च) शनिवारवाडा इथं सकाळी आठ वाजता भेटणार आहोत.

गारपीटग्रस्तांवर कर्ज वसुलीचा बडगा

$
0
0
दुष्काळानंतर गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता बँकेच्या पीक कर्जाच्या वसुलीलाही सामोरे जावे लागणार आहे. दुष्काळामुळे पीक कर्ज वसुलीला देण्यात आलेली स्थगिती सहकार विभागाने उठविली आहे.

दर्डा, काळेंच्या उमेदवारीची नुसतीच चर्चा

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी शालेयशिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांना मिळाली. आमदार डॉ. कल्याण काळेंचे नाव फायनल झाले. अशी नुसतीच चर्चा शुक्रवारी दिवसभर औरंगाबादेत होती. राजेंद्र दर्डा जिंतूर दौऱ्यावर होते. तर आमदार काळे घरगुती कामात व्यस्त होते. दर्डा आणि काळेंच्या चर्चेमुळे अन्य इच्छुकांची मात्र चिंता वाढली होती.

मतविभाजन टाळण्यासाठी ‘आप’पुढे प्रस्ताव

$
0
0
लोकसभा निवडणुकीतले मतविभाजन टाळण्यासाठी, महाराष्ट्र लोकशाही आघाडीतील भारिप बहुजन महासंघाने आम आदमी पक्षाला राजकीय समझोत्याचे पत्र दिले आहे.

शिक्षकांसह विद्यार्थ्यांवर कॉपी प्रकरणी गुन्हे

$
0
0
इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे घबाड चक्क संस्थांचालकाच्याच घरात आढळून आल्याचे प्रकरण ताजे असतानाच बारावीच्याच इतिहासाच्या पेपरमध्ये कॉपी प्रकरणी आठ जणांवर गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. यात केंद्रप्रमुख, तीन शिक्षक यांच्यासह चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आशाला आधार देण्यासाठी पुढाकार

$
0
0
आडरानात बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या एका महिलेस आधार देत तिचे घर शोधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या सात महिन्यापासून कुंटूबापासून दुरावलेल्या त्या महिलेस नीटपणे बोलता येत नसल्याने घर शोध मोहिमेत अडचणी निर्माण होत आहे.

गेट सेट गो...

$
0
0
पर्यटन राजधानीतील धाडसी महिला ज्या क्षणाची वाट बघत होत्या, तो येऊन ठेपला आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता महिला आपली गाडी स्टार्ट करतील आणि शहरातील रस्त्यावरून आत्मविश्वासाने भन्नाट रायडिंग करतील. या रॅलीत ‘ठष्ट’नाटकातील सहा कलाकार हेमांगी कवी, अक्षया भिंगार्डे, सुपर्णा श्याम, रेश्मा रामचंद्र, पूजा गायकवाड, आशा ज्ञाते आदी सहभागी होणार आहेत.

इंग्रजीचा पेपर झाला...

$
0
0
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत शुक्रवारी इंग्रजीचा पेपर झाला आणि विद्यार्थ्यांची चेहऱ्यावरील भीती दूर झाली. कडक तपासणी आणि चोख बंदोबस्तात शहरातील पेपर झाला, तरी ग्रामीण भागातील केंद्रांचे चित्र वेगळे होते.

दाटून कंठ येतो

$
0
0
जीवलग मैत्रिणीविषयी आठवणीना उजाळा देण्याची संधी महिला दिनी विविध क्षेत्रात यश मिळविणाऱ्या महिलांचे गुणगौरव केला जात असतानाच, संघर्षमय जीवन जगणाऱ्या माझी मैत्रिण प्राजक्ता (नाव बदलेले आहे) यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही.

तिघांचे एकाच वेळी विषप्राशन

$
0
0
मित्रनगर भागात गुरुवारी घडलेल्या तिघांच्या खून व आत्महत्येच्या प्रकरणात मनोज जैस्वालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमार्टमच्या अहवालामध्ये तिघांनी विष प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

‘CBS’ कॉम्प्लेक्ससाठी निविदा

$
0
0
शहरातील सर्वांत महत्त्वपूर्ण असलेल्या मध्यवर्ती बस स्‍थानक सीबीएसच्या इमारतीच्या कामासाठी पुनर्निविदा काढण्यात येणार आहे. या निविदेची विक्री २३ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.

भावी शिक्षक झाले ‘नापास’

$
0
0
परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. पहिल्यांदाच झालेल्या परीक्षेत भावी शिक्षक ‘नापास’ झाले. प्राथमिक स्तरावर केवळ ४.४३ तर उच्च माध्यमिक स्तरावर ५.९५ टक्केच विद्यार्थी पात्र ठरले.

तरुणी, महिला झाल्या जागरुक

$
0
0
सिटी चौक हद्दीतील एका शैक्षणिक संस्थेमध्ये एका महिला क्लार्कला तेथील अधिकाऱ्याने खोटे कारण सांगून कामाला बोलावले. या महिलेने जाब विचारला असता, तिचा विनयभंग करीत कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकाराला न घाबरता तिने पोलिस ठाणे गाठून धाडसाने गुन्हा दाखल केला.

केंद्रीय पथकाचा बुधवारी दौरा

$
0
0
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे पथक येत्या बुधवारी (बारा मार्च) मराठवाड्यात येणार आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गारपिट मराठवाड्याचा पिच्छा सोडना

$
0
0
गेल्या अडीच आठवड्यांपासून अवकाळी पाऊस, गारपीट मराठवाड्याच्या मागे हात धुवून लागली आहे. औरंगाबादसह, बीड, उस्मानाबाद, जालना जिल्ह्यांना गारपिटीने शनिवारी (८ मार्च) जोरदार तडाखा दिला.

शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करा

$
0
0
गारपीट, अवकाळी पाऊस शिवाय सध्या निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातीलच नव्हे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी पिकासहीत फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

परीक्षा निवडणुकीमुळे रद्द

$
0
0
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील लोकसभा निवडणूका १७ एप्रिल रोजी होणार असे जाहीर झाले आहे. विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी परीक्षा पुर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे १७ एप्रिल रोजी जे पेपर होणार होते ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत.

नाथवंशजामध्ये वाद अद्याप कायम?

$
0
0
नाथषष्ठी यात्रा उत्सव तयारी संबंधी प्रशासनानेने घेतलेल्या आढावा बैठकीत कालाहंडी फोडण्यावरून गेल्या वर्षी नाथवंशजामध्ये निर्माण झालेला वाद यावर्षीही निर्माण होऊ शकतो असा प्रयत्न करण्यात आला. त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही.

शिक्षण संस्थेची याचिका फेटाळली

$
0
0
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळास २००९ मध्ये परळी येथे मंजूर झालेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाविरुद्ध नवगण शिक्षण संस्थेने दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images