Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मराठा आरक्षणावरून सरकारवर तोफ

0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील सरकारने लोकसभा निवडणूकीआधी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत आमदार विनायक मेटे यांनी राज्यातील सरकारचा निषेध केला.

गारपिटीने मराठवाड्याला झोडपले

0
0
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना जोरदार गारपीट व अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यात हाहाकार उडाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोलीत पावसाने जोरदार हजेरी लावली. बीड जिल्ह्यात वृक्ष कोसळून तिघांचा मृत्यू झाला.

पवारांचे इमर्जन्सी लँडिंग

0
0
गारपीटग्रस्त मराठवाड्याच्या दौ-यादरम्यान केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरला प्रतिकूल हवामानाचा फटका बसला. हिंगोली आणि परभणीत जोरदार पाऊस झाल्यामुळे पवारांच्या हेलिकॉप्टरचे अंबेजोगाई येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे षडयंत्र

0
0
शिक्षणखात्यातील अधिकाऱ्यांनी मागासवर्गियांच्या शिक्षण संस्था इतर संस्थांकडे वर्ग करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप संत कबीर मानवता संगोपन केंद्र शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक मधुकर भोळे यांनी केला.

कौटुंबिक मालिकांना ‘सेन्सॉरशिप’ हवी

0
0
सध्याच्या दूरचित्रवाणीवरील कौटुंबिक मालिंकामधून महिलांचे चित्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असून एक अर्थाने महिलांची प्रतिमा मलिन केली जात आहे. कौटुंबिक वातावरण दुषित करणाऱ्या या मालिकांना सेन्सॉरशीप हवी, असे मत लोकप्रशासनाच्या अभ्यासक डॉ. प्रतिभा पाटील यांनी केले.

‘नांदेड-कुर्ला’ दर गुरुवारी धावणार

0
0
नांदेडसाठी येत्या ११ मार्चपासून कुर्ल्याहून नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. ही रेल्वे कायमस्वरूपी असून या रेल्वेमुळे लातूर, परभणी आणि नांदेडकडील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी एक नवीन रेल्वे मिळाली आहे.

भाजप शेतकरी आघाडीची आज निदर्शने

0
0
महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांत गारपीट आणि अतिवृष्टीने पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. जनावरे दगावली, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी भाजप शेतकरी आघाडीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

कृषी पंपांचे विद्युतीकरण रखडलेलेच

0
0
शेतीला पाणी देण्यासाठी कृषी पंपांच्या विद्युतीकरणाचे राज्यपालांना कळविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याची तसदी ऊर्जा विभागाने घेतलेली नाही. कृषी पंपांच्या विद्युतीकरणाचा अनुशेष दूर करण्याच्या गतीबद्दल राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी असमाधान व्यक्त केले आहे.

हैदराबादचा मुक्तीलढा स्वातंत्र्यलढ्यापेक्षा मोठा

0
0
‘भारतामध्ये इतर सर्व संस्थाने विलिन झाल्यामुळे हैदराबाद संस्थानदेखील आज ना उद्या देशात विलिन होणार आणि त्यामुळेच हा मुक्तीलढा दुय्यम होता, असा मतप्रवाह होता आणि आहे. मात्र हे संस्थान मुक्त होऊ नये, म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रिटिशांवर दबाव वाढत होता, वेगळे राजकारण शिजत होते, अडचणीचा ठरणारा ‘जैसे थे’चा करार झाला होता.

‘राज यांच्या विधानामुळे संभ्रमित होऊ नये’

0
0
‘लोकसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवेल आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी आमचा पाठिंबा आहे,’ राज ठाकरे यांच्या या विधानांवर संभ्रमित होण्याचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी (९ मार्च) येथे व्यक्त केली.

गारपिटग्रस्तांसाठी विशेष पॅकेज द्या

0
0
‘शंभर वर्षांत झाली नाही, एवढी हानी मराठवाड्यात या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झाली असून एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे, त्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवावी,’’ अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादेत ‘मटा’शी बोलताना केली.

एका आठवड्यात मदत द्या

0
0
शिवसेनेने गारपीटग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी आठ दिवसाची मुदत दिली आहे. आठ दिवसात मदत वाटप सुरू झाली नाही तर, रस्त्यावर उतरू व बँकांची वसुली बंद पाडू, असा इशारा दिला आहे. आस्मानी संकटासोबतच सरकारची निष्क्रियता व उदासिनतेचे सुलतानी संकट मोठे आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

आता डोळे निवडणूक आयोगाकडे

0
0
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या गारपिटीने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारमधील मंत्री आता जिल्ह्यांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मदत द्यायची की नाही याची परवानगी निवडणूक आयोगाकडून घ्यावी लागणार आहे.

बलात्कार करणारे ५ नराधम गजाआड

0
0
अमरावतीवरुन आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पाच नराधमांना अटक करण्यात क्रांती चौक पोलिसांना पाच दिवसानंतर यश आले. शनिवारी रात्री या सर्वांना अटक करण्यात आली.

समांतर : अवमान याचिका दाखल करू

0
0
समांतरप्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी सरकारने आमचे मत विचारात न घेतल्यास किंवा आहे त्या परिस्थितीत योजना मंजूर केल्यास किंवा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार १८ मार्च २०१४ पर्यंत कुठलाच निर्णय न घेतल्यास अवमान याचिका खंडपीठात दाखल करू, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

डेंगी काढतोय पुन्हा डोके वर

0
0
गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारा, थंडीमुळे संपूर्ण वातावरण पालटले असून, त्याचा परिणाम म्हणून विविध श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजार झपाट्याने वाढले आहेत. बहुतांश घरांमध्ये एखादा तरी रुग्ण दिसून येत आहे. विशेष म्हणजे याच वातावरणामुळे पुन्हा एकदा डेंगीसदृश रुग्ण वाढले आहेत.

येत्या ४८ तासांत गारपिटीचा अंदाज

0
0
येत्या ४८ तासांमध्ये मराठवाड्यातील बहुतेक भागात पाऊस पडेल व तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. दरम्यान, औरंगाबाद शहर व जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला शनिवारी दुपारपासून वादळी वारे, पाऊस व गारांनी झोडपले आहे.

गारपिटीचे अस्मानी संकट

0
0
अभूतपूर्व गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने संपूर्ण मराठवाड्यातील रब्बी पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. गेल्या अडीच-तीन आठवड्यांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या निसर्गाच्या फटक्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधणेही महसूल व कृषी विभागाला अवघड झाले आहे.

बनावट सह्या करून बँकेतून उचलले कर्ज

0
0
मुख्याध्यापकाच्या बनावट सह्या करुन सेवकाने बँकेतून ५० हजार रुपयाचे कर्ज परस्पर उचलल्याचा प्रकार चिकलठाणा येथील बबनराव ढाकणे विद्यालयात उघड झाला. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाने सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपारांचा बिनधास्त वावर

0
0
शहरातून हद्दपार करण्यात आलेले असतानाही या गुन्हेगारांनी पुन्हा शहरामध्ये वास्तव्य केल्याचे दिसून येत आहे. सिडको पोलिसांनी ही बाब गंभीर घेतली असून अशा गुन्हेगारांचा शोध घेत कारवाई करण्यात येत आहे. सात दिवसांमध्ये चार हद्दपारांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images