Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

ज्ञानेश्वर पिंपळेचा ठावठिकाणा लागेना

0
0
शिर्डीमध्ये तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या कुख्यात ज्ञानेश्वर पिंपळेचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. अहमदनगर पोलिसांसोबतच शहर गुन्हे शाखा देखील पसार ज्ञानेश्वरच्या शोधात आहे.

एमआयटीत ‘कोरोना’ ची धमाल

0
0
काळाची गरज ओळखून एनर्जी कन्जव्हेशनवर विद्यार्थ्यांनी आतापासूनच काम सुरू केल्याचे दिसत आहे. भविष्यातल्या गरजा, आपल्याकडील उपलब्ध साधने आणि पुढे काय करावे लागेल, याचा विचार करीत एमआयटीत आयोजित कोरोनो २०१४ टेक्निकल इव्हेंटमध्ये विद्यार्थ्यांनी धम्माल केली.

फूल टू एन्जॉय

0
0
अभ्यासाच्या घबाडग्यातून थोडेसे बाहेर पडत अभियांत्रिकीच्या तरुणाईची ‘देवगिरी’त धम्माल सुरू आहे. निमित्त आहे ‘मेकफिएस्टा’, ‘इलेक्ट्रो-विहान’, ‘इनोव्हिजन-१४’ इव्हेंटचे. क्षणाक्षणला उत्कंष्ठा वाढविणारा ‘रोबोकीक’ तर कमीवेळेत आपल्या ‘रोबो’ला ट्रॅकवरुन शर्यत पूर्ण करताना स्पर्धकांची उडालेली धांदल.

देशमुख यांच्या भूमिकेकडे लक्ष

0
0
शिवसेना व भाजपामध्ये उस्मानाबादच्या जागेसंदर्भाने अदलाबदल होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सेनेने या मतदारसंघातून सेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे उस्मानाबाद मतदार संघातून तिरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे.

पावसाने हुकला डांबरीकरणाचा मुहूर्त

0
0
अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांचा डांबरीकरणाचा मुहूर्त हुकला आहे. व्हाइट टॉपिंगच्या कामांना मात्र, अडसर निर्माण झालेला नसून या रस्त्यांच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हाइट टॉपिंगच्या दोन रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत.

डागडुजीच्या ठोक्यात ऑपरेशनचे टाके

0
0
घाटी रुग्णालयातील सर्जिकल इमारतीत असलेल्या तीन ऑपरेशन थिएटरचे सध्या डागडुजीचे काम सुरू आहेत. या ठिकाणी ऑपरेशनही सुरू असून, या डागडूजीमुळे रुग्णांना इन्फेक्शन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनीच वैद्यकीय अधिक्षकांना पत्र पाठवले आहे.

एकाच वेळी दोन पेपर

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाचा पेपर चक्क एमबीए-सीईटीच्या वेळापत्रकादरम्यान आला आहे. सीईटीचा पेपर सकाळी नऊ वाजता, तर बीएचा पेपर दहा वाजता होणार आहे. एकाच वेळेत दोन पेपर आल्याने कोणता पेपर द्यायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला.

पालिकेच्या जागेवर ‘MGP’चे अतिक्रमण

0
0
पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर (एमजीपी) थेट कारवाई न करता पालिकेने आतापर्यंत फक्त नोटिसाच बजावल्या आहेत. नोटिसांना उत्तर देत कागदपत्रांच्या तपासणीसाठी ‘एमजीपी’ने वेळ मागवून घेतला आहे.

गुरुजी इलेक्शनच्या कामाला; परीक्षेचे वांदे

0
0
निवडणूकीच्या कामाला शिक्षक दिल्याने आता परीक्षांचे काम कोण करणार? असा प्रश्न अनेक शाळांना पडतो आहे. हे कमी म्हणून की काय, शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा शिक्षकांच्या यादी मागविल्या आहेत. हीच अवस्था विद्यापीठातील परीक्षा विभागाची झाली आहे.

हायकोर्टाच्या आदेशाने देता येणार परीक्षा

0
0
विहित मुदतीत परीक्षेचे शुल्क न भरलेल्या बीए व बीएसस्सी अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने परीक्षेस बसण्याची परवानगी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

महावितरण विरुद्ध पालिका

0
0
अतिजलद गती विद्युतीकरण प्रकल्पाच्या शहरातील जागा वापरासाठी महावितरण कंपनीकडे जालना पालिकेने ७७ लाख ८४ हजार २५० रुपयाचे देयक मागितले आहे. यातील रस्ता ओलांडून वायर अंथरण्यासाठीच्या खर्चाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामाच्या वापराचे देयक देण्यास महावितरणने नकार दिलाय.

गारपिटीच्या प्रश्नावर पवारांच्या भुलथापा

0
0
केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद सांभळणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गारपीटग्रस्तांना मदत करण्यासाठी पंतप्रधानांशी बोलल्याची थाप मारली आहे. गारपीटग्रस्तांना मदतीची जबाबदारी केंद्र सरकार व पंतप्रधानांवर टाकून ते मोकळे झाले आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी (१० मार्च) येथे केली.

कॅन्सर हॉस्पिटल अजूनही टँकरवर

0
0
शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलच्या उद‍्घाटनापूर्वीपासून आजतागायत महापालिकेकडून कधीच पुरेसे पाणी मिळालेले नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असताना वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

महावितरणची ‘बत्ती गुल’

0
0
मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटीचा व वादळवाऱ्याचा फटका ‘महावितरण’लाही बसला आहे. औरंगाबाद ग्रामीण व जालना सर्कलमध्ये अनेक विजेचे पोल कोसळल्यामुळे वीजपुरवठाच कोलमडला आहे.

गारपिटग्रस्तांना २ दिवसांत मदतःCM

0
0
गारपिटीमुळे २६ जिल्ह्यांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणे, हे सरकारचे कर्तव्य आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे दिली

भरपाईच्या घोषणेसाठी २ दिवसांची मुदत

0
0
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी केला. लातूर जिल्ह्यातील गारपिटग्रस्त भागाचा दौरा करताना, त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सर्वपक्षीय नेत्यांची शुल्कमाफीची मागणी

0
0
गारपिटीमुळे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे. तसेच, आपत्कालिन व्यवस्थापन कार्यालय उभे करून कायमस्वरूपी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज वर्तवावा यासाठी प्रगत वैज्ञानिक तांत्रिक तंत्रज्ञान लातूर जिल्ह्यात विकसीत करण्याची मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

गारपिटीनंतर निवेदनांचा ‘पाऊस’

0
0
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीसह पावसाने झोडपल्यानंतर मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली होती. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि सरकारकडून मदत जाहीर व्हावी, या मागणीसाठी अनेक पक्ष-संघटनांकडून मंगळवारी निवेदनांचा पाऊस पडला.

सूत गिरणीची सुनावणी एप्रिलमध्ये

0
0
परळीच्या सूत गिरणी कर्ज प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये आमदार धनंजय मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांच्यासह १७ संचालकांना खंडपीठाचे न्या. ए. एम. ठिपसे यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन केला. पुढील सुनावणी तीन एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.

एकंबा यात्राःबकऱ्यांचे बळी बंद

0
0
हिमायतनगर येथून जवळच असलेल्या मौजे एकंबा येथील कानोबा (कानिफनाथ) यात्रेत भाविकांकडून बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा मंगळवारी कोर्टाच्या आदेशाने बंद करण्यात आली. तालुक्यातील मौजे एकंबा येथे दरवर्षी दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा (कानिफनाथ) महाराजांची यात्रा अनेक वर्षांपासून भरविण्यात येते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images