Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

१५ मार्चचे पेपर २३ मार्चला

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने १५ मार्च रोजी येणारे सर्व पेपर पुढे ढकलले आहेत. तंत्रशिक्षण विभागातर्फे १५ मार्च रोजी ‘एमबीए-सीईटी’ घेण्यात येणार आहे. याच दिवशी हे पेपर आल्याने एकच गोंधळ उडाला होता.

भिंत कोसळून दोघे ठार

$
0
0
आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील एका बेकरीची भिंत पडून बेकरीतील दोन परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी पहाटे साडेचार वाजता घडली.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

$
0
0
राज्यात गारपिटीमुळे ‘न भुतो’ नुकसान झाले आहे. अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. मुंबईमध्ये गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मंगरूळ (ता. तुळजापूर) येथे दिली.

मुंडेंविरुद्धची याचिका रद्द

$
0
0
निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिल्यावरून भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मंगळवारी रद्द करण्यात आली.

५ हजार जणांचे लचके तोडले

$
0
0
गेल्या वर्षभरापासून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोकाट कुत्र्यांनी नागरिक त्रस्त असून जानेवारी २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत कुत्र्यांनी चावा घेतलेल्या ५ हजार १७१ जणांवर घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात उपचार करण्यात आले. चावा घेतलेल्यांमध्ये बारा वर्षाखालील तब्बल १ हजार ७४१ चिमुकल्यांचा समावेश आहे.

मदतीचा निर्णय आज

$
0
0
सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्याने व गारपिटीने झालेले नुकसान भीषण असून, राज्यात सिल्लोडची परीस्थिती भयानक आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. सरकार तुमच्या पाठीशी असून, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी गुरुवारी (१३ मार्च) रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत, असे अश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी (१२ मार्च) दिले.

‘कन्या’ चित्रप्रदर्शनातून ‘स्त्री शक्तीचा’ संदेश

$
0
0
महिलांविषयी सामाजिक दृष्टीकोन, महिलांच्या भावनाविश्व तसेच स्त्री भ्रूण हत्येविषयी अंतर्मुख करणाऱ्या उगम ग्रुपच्या कन्या चित्रप्रदर्शनातून स्त्री शक्तीचा संदेश देण्यात आला. प्रोझोन मॉलच्या फूड कोर्टवर शनिवार व रविवारी सुरू असलेले हे चित्रप्रदर्शनाला शेकडो नागरीकांनी भेट दिली.

नारी शक्तीचा जागर

$
0
0
नारी शक्तीचा जागर सात आठ आणि नऊ मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर झाला. महिला दिनी औरंगाबादेत किमान ५ व्याख्यान, ओबीसी जनजगारण जनसंघर्षतर्फे १०१ महिलांचा सत्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे शून्यातून विश्व निर्माण केलेल्या ६ महिलांचा सत्कार, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

मॅजिक, सुगंधी स्प्रे बाजारात

$
0
0
पिचकऱ्यावर यंदाही कार्टूनची छापा प्रामुख्याने आहे. यात छोटा भिम,डोरेमॉन, बँट, अॅग्री बर्ड या कॉर्टून असलेल्या पिचकऱ्याबरोबरच मिसाझल टँकसह विविध आकाराच्या टँक असलेल्या पिचकऱ्यांना मागणी असल्याचे बोरा यांनी सांगितले.

औरंगाबादचे निसर्ग रंग चालले ‘इंग्लंड’ला

$
0
0
निसर्गाचे महत्त्व कायम आहे, त्याला बाधा पोहचू नये म्हणून आपण नेहमीच बोलत असतो; पण यासाठी चिमुकल्यांनी जर पुढाकार घेतला तर नक्कीच त्याची वाहवा होतच असते. असाच उल्लेखनीय उपक्रम शहरात होत आहे.

पुणे-निझामाबाद पॅसेंजरचे वेळापत्रक बिघडले

$
0
0
मराठवाड्यातील विविध भागातून येणाऱ्या प्रवाशांना सकाळी साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान सोडणारी निजामाबाद-पुणे पॅसेंजर दररोज दोन ते तीन तासांच्या उशिराने औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर येत आहे. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे.

व्हिडिओ कॅमेरा सांगणार निवडणूक खर्चाचा आकडा

$
0
0
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची छाननी आणि पडताळणी करण्यासाठी व्हिडीओ चित्रिकरणाचा आधार घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांची सभा परवानगीविना

$
0
0
गारपीटग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात आन्वी (ता. बदनापूर) येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे पाच हजार ग्रामस्थ शेतकऱ्यांना संबोधीत केले. मंगळवारी झालेल्या या सभेला शासकीय परवानगीची औपचारीकता कुणीच पूर्ण केली नाही. ध्वनीवर्धकासाठी वीज आकडा टाकून घेण्यात आली होती.

गारपीटग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

$
0
0
गारपीट ग्रस्त गेल्या काही दिवसांपासून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या राज्यात सुरू असलेल्या गारपीटीमुळे बिचारा शेतकरी व कष्टकरी मरतो आहे. मात्र याचे फारसे गांभीर्य राज्य व केंद्र सरकारला तसेच प्रशासनाला नाही.

उत्तराखंडाप्रमाणे राज्य सरकारने मदत करावी

$
0
0
आचारसंहितेचे कारण पुढे न करता उत्तराखंड मधील जयप्रलयानंतर केंद्र सरकारने ज्यापद्धतीने मदत केली. त्याचप्रमाणे मदत राज्य सरकारने करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

पुत्रांच्या टोळीचा पिता म्होरक्या

$
0
0
जटवाडा रोडवर प्राणघातक शस्त्रांसह दरोडेखोरांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. मंगळवारी रात्री ही कारवाई केली. टोळीचा म्होरक्या गरद्या काळे आहे. उर्वरित चारही आरोपी त्याची मुले आहेत.

मूर्ती चोरीप्रकरणी जैन समाजात रोष

$
0
0
जैन मंदिरात होत असलेल्या चोऱ्या प्रकरणी जैन समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या गुन्ह्याचा तपास लावण्याची मागणी एका शिष्टमंडळाने पोलिस उपायुक्तांना भेटून केली. अवघ्या चार दिवसांपूर्वी हडको एन ११ येथील श्री शांतीनाथ अग्रवाल ‌दिगंबर जैन मंदिरातून आठ मूर्ती व तीन किलोची चांदीची भांडी पळवली.

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाइकांसाठी ‘शेड’

$
0
0
शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र शेड उपलब्ध करण्यात आले असून, ते वापरण्यासाठी नुकतेच खुले करण्यात आले. ‘अजंता फार्मा’च्या वतीने हे शेड तयार केले आहे. त्यामुळे जागा मिळेल तिथे बसणाऱ्या नातेवाईकांची मोठी सोय झाली आहे.

‘सचखंड’ला मे अखेरपर्यंत वेटिंग

$
0
0
येत्या काही दिवसांमध्ये शाळा, कॉलेजांना उन्हाळी सुट्ट्या लागणार असून घराघरांमध्ये सुट्टीचे प्लॅनिंग तयार झाले आहे. उत्तर भारतात सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर भारतात औरंगाबादमार्गे जाणारी एकमेव सचखंड एक्स्प्रेसला मे अखेरपर्यंत वेटिंग असल्यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

लिफ्टला मुहूर्त, एस्कलेटर कधी?

$
0
0
रेल्वे स्टेशनवरील लिफ्ट आणि एक्सिलेटरच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे महिनाभरात लिफ्ट कार्यान्वित होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, मॉडेल रेल्वे स्टेशनचा दर्जा असलेल्या या स्टेशनवर एस्कलेटरचे काम केव्हा सुरू होणार, हा प्रश्न कायम आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images