Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आता पोस्टाचे लवकरच विभाजन

$
0
0
पोस्ट विभागाकडून लवकरच बँक सेवा सुरू केली जाणार आहे. कोअर बँकींग सॉफ्टवेअर, एटीएम आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. मात्र बँकींग व पोस्टाचे कामकाज यांची सरमिसळ होऊन सेवांवर परिणाम होऊ नये यासाठी पोस्ट कार्यालयाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.

बीड जिल्हा परिषद सदस्याचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

$
0
0
बीड जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच माजलगाव (जि. बीड) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीराम विठ्ठलराव खळगे यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अभय ठिपसे यांनी फेटाळला.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पाचशे कार्यकर्त्यांची कुंडली

$
0
0
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा जय्यत तयारीला लागली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये समाजविघातक कृत्ये करणाऱ्या पाचशे कार्यकर्त्यांची कुंडली पोलिसांनी जमा केली आहे. या कार्यकर्त्यांवर कारवाईचा इशारा पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांनी दिला आहे.

मंगळसूत्र चोरट्यांचे आव्हान कायम

$
0
0
शुक्रवारी मंगळसूत्र चोरट्यानी पुन्हा एकदा दोन मंगळसूत्र पळवून पोलिसांना आव्हान दिले आहे. एन ४ भागातून भर दुपारी तर रात्री सहकारनगर भागात या घटना घडल्या. याप्रकरणी मुकूंदवाडी व उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भंगार निमआराम गाडयांच्या प्रवासाला लवकरच ‘ब्रेक’

$
0
0
मध्यवर्ती बस स्थानकावरून औरंगाबाद ते पुणे या मार्गावर धावणारी निमआराम बस भंगार झाले असून या बस बदलण्याची मागणी मागणी अनेक दिवसांपासुन केली जात आहे. अखेर एसटी प्रशासनाने या सर्व निमआराम बस बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटीच्या चालक, वाहकांनाही प्रवाशी वाढविण्याचे 'टार्गेट'

$
0
0
डिझेलचे वाढलेले दर आणि कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च वाढला असल्यामुळे एसटी विभागाचा कारभार आर्थीक अडचणीत आला आहे. यामुळे आता एसटी विभागाने प्रवाशी वाढ अभियान राबविण्याचा निश्चय घेतला आहे.

प्राचार्याच्या पुत्राची कर्मचाऱ्याला मारहाण

$
0
0
कोर्टात सुरू असलेली केस मागे घेण्याची धमकी देत प्राचार्याच्या पुत्राने सेवकाला मारहाण केली. हा प्रकार बुधवारी रात्री हडको एन १२ भागात घडला. हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सेवकाच्या पत्नीवरही आरोपीने सुरीने हल्ला चढवला.

‘शॉपिंग टुरिझम’नंतरही दुकानाशी नाळ कायम

$
0
0
शहरात गेल्या काही वर्षांमध्ये मॉल संस्कृती रुजल्याचे चित्र आहे, शॉपिंग टुरिझम ही संकल्पना या निमित्ताने पुढे आली आहे. मॉलमध्ये गर्दी वाढत असतानाच पांरपरिक किराणा व अन्य रिटेल दुकानांची नाळ मात्र अद्यापही शाबूत असल्याचे दिसून आले आहे.

वाहनचोरी प्रकरणातील सराईत चोरट्याला अटक

$
0
0
आंतरराज्य टोळीतील पसार वाहनचोरास गुन्हे शाखेच्या प‌थकाने गुरुवारी सिडको बसस्टँड परिसरात अटक केली. या चोरट्याने जून २०१३ मध्ये सिडको एन ७ भागातून टाटा सफारी पळवली होती.

मराठवाड्यासाठी ७३१ कोटी द्या

$
0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे, हे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. हे पथक केंद्र सरकारला अहवाल सादर करेल, मात्र मदत वाटपाच्या निकषांत बदल करण्याचा अधिकार मंत्रिगटाचा आहे.

३० वर्षे खराब न होणारा रस्ता

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पंचवटी कॉर्नर ते लोखंडी पूल हा ४०० मीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केले जात आहे. रस्ता पुढील ३० वर्षे हा रस्ता खराब होणार नाही, असा दावा पीडब्ल्यूडीकडून करण्यात येत असून तो ३१ मार्च नंतर रहदारीसाठी खुला होईल.

हज यात्रेकरूंचा कोटा कमी

$
0
0
मक्का येथे बाधकाम सुरू असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व देशांच्या यात्रेकरुंचा कोटा वीस टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. भारतातून दरवर्षी हज यात्रेला एक लाख २५ हजार भाविक जातात.

मुंडेंच्या विजयासाठी मोर्चेबांधणी

$
0
0
बीड जिल्ह्यातून रोजगारासाठी वाळूज एमआयडीसीत स्थलांतरित झालेल्या मतदारांची मोट बांधण्यासाठी आमदार पंकजा मुंडे-पालवे या प्रयत्न सुरू केले आहे.

महापौरांना कोसळले रडू

$
0
0
शिवजयंती कार्यालयाच्या उद‍्घाटनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी खासदार चंद्रकांत खैरे महापौर कला ओझा यांच्यावर चांगलेच संतापले. चारचौघात कानउघाडणी केल्यामुळे महापौरांना रडू कोसळले.

खैरे घसरले आयुक्तांवर

$
0
0
लोकसभा निवडणूक तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिवसेनेचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे सत्ताधाऱ्यांवर टीका करता करता महापालिका आयुक्तांवरच घसरले.

दुष्काळ, गारपीटीची भीषणता रांगोळीतून

$
0
0
मराठवाड्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने कवेत घेतले. या तडाख्याने ‘होत्याचं नव्हतं होणं’ काय असतं, हे अनुभवणं असंख्यांच्या नशिबी आलेलं. निसर्गाने संकट धाडले. त्याने हाती आलेली पिके डोळ्यादेखत मातीत मिसळून टाकली. दुष्काळात पाणी नव्हते.

भंगार गोदामाला आग

$
0
0
मोंढा नाका प‌रिसरात सय्यद अल्लाऊद्दीन सत्तारी या भंगार विक्रेत्याचे गोदाम आहे. शुक्रवारी दुपारी पावणेदोन वाजता या गोदामातील प्लॅस्टिकच्या भंगार सामानाने पेट घेतला. अल्पावधीतच गोदामातील अन्य साहित्याने पेट घेतल्यामुळे आग भडकली.

आताच पुतळे का आठवतात?

$
0
0
शिवरायांचे समुद्रात स्मारक उभारण्याला आपला विरोध नाही, परंतु त्यांनी निर्माण केलेले गड-किल्ले हीच खरी स्मारके असून, त्याचे संवर्धन करावे असा पुनरुच्चार करताना निवडणुकीच्या तोंडावरच शासनाला पुतळे आठवतात का? असा जळजळीत सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

गारपीट उठली जीवावर

$
0
0
आचारसंहितेचे कारण देत राजकारण्यांनीही मदत मिळवून देण्यात असमर्थता दर्शवल्याने आपत्तीग्रस्त शेतक-यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पीकासाठी घेतलेले भलेमोठं कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत असलेल्या शेतक-यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करायला सुरुवात केली आहे.

‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली

$
0
0
गौताळा अभयारण्याजवळील वनविभागाच्या चौकीजवळ शुक्रवारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. शहरातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा तो मृतदेह असल्याचे समोर आले आहे. हा खून कोणी व कशासाठी केला याचा तपास कन्नड पोलिस करत आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images