Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

फी माफीवरून गाजली अधिसभा

$
0
0
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मराठवाड्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपीटग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा व प्रवेश माफ करावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेत सदस्यांनी एकत्रित केली. तशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव मंजूर झाला.

LBT चुकवणारा नांदेडात ट्रक पकडला

$
0
0
लबीटी चुकवण्याच्या उद्देशाने दोन बिले बाळगून महापालिकेची दिशाभूल करणारा ट्रक पकडून त्यातील गजाळीवर (स्टील) आकारण्यात येणाऱ्या मूळ करासह दुप्पट शास्ती वसूल करण्यात आली आहे. स्थानिक संस्था कर विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.

परभणी रेल्वेला १.५ हजारांचा दंड

$
0
0
आरक्षीत जागेवर प्रवास न करता आल्याने दाखल केलेल्या दाव्यात परभणी रेल्वेला दंडापोटी दीड हजार रूपये देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे. तिकीटाचे ३१२ रुपये परत करण्याचा आदेशाने प्रवासाला दिलासा मिळाला आहे.

अपहार : पालिकेचा लिपिक बडतर्फ

$
0
0
मालमत्ता कर आणि बीएसयुपी लाभार्थ्याच्या लोकवाट्याची रक्कम महापालिकेच्या खात्यात न भरता त्याचा अपहार करणाऱ्या वजिराबाद झोनमधील निलंबित लिपीक रामकृष्ण नरसिमलू ताडपवार यास पुढे नोकरी मिळण्यास अपात्र होईल, अशा रितीने सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी शुक्रवारी बजावले आहेत.

भाजीपाल्याचे दर गडगडले

$
0
0
गारपीट, अवकाळी पाऊस आणि प्रतिकुल हवामानामुळे यंदा फळबागासहीत भाजीपाल्याची स्थिती ‘न भूतो’ अशी चिंतामय झाली असुन, यामुळे शेतकरी पुरता नागावला गेला आहे.

मैदानांच्या शुल्कात तब्बल १.५ पट वाढ!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचार सभांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मैदानांच्या शुल्कात दीडपट वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या मालमत्ता विभागाने आयुक्तांकडे सादर केला आहे. आयुक्तांची त्यावर स्वाक्षरी झाल्यावर राजकीय पक्षांना मैदानाच्या शुल्कापोटी पालिकेकडे पंधरा हजार रुपये भरावे लागणार आहेत.

सातारा पालिकेवर १२ आक्षेप दाखल

$
0
0
सातारा-देवळाई नगर पालिकेच्या स्थापन करण्याच्या अधिसूचनेवर १२ आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या आक्षेपांवर सुनावणी घेऊन निर्णय देतील. त्यानंतर नगर पालिकेच्या स्थापनेचा मार्ग सुकर होईल.

कोटींच्या उड्डाणामुळे अधिकारी त्रस्त

$
0
0
आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या बांधकामासाठी सरकारकडून भरीव वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा त्रास वाढला आहे. पूर्वी मंजूर झालेली केंद्रे आणि उपकेंद्रे रद्द करून आमच्याकडे नवा प्रस्ताव करा, अशी मागणी सदस्य, पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे आता पुढे काय करावे, असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे.

१ लाखाची खंडणी मागितली; तिघांवर गुन्हा

$
0
0
बांधकामाविरोधात केलेली तक्रार मागे घेऊन बांधकाम पुन्हा सुरू करू देण्यासाठी १ लाख खंडणी मागणाऱ्या तिघांविरोधात कोर्टाच्या आदेशाने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदीच्या उत्तरपत्रिका गहाळ

$
0
0
दहावी परीक्षेतील हिंदी विषयाच्या काही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे शनिवारी समोर आले. एका बॅगमध्ये या उत्तरपत्रिका असल्याचे आढळून आल्या. उत्तरपत्रिकांसह, प्रश्नपत्रिका, जेवणाचा डबा असलेली बॅग सायंकाळी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.

प्रश्नांचे पर्यायच बदलले

$
0
0
हॉल तिकिटांमधील चुकांचा गोंधळ थांबला नाही, तोच दहावी संस्कृतच्या विद्यार्थ्यांना शनिवारी पुन्हा बोर्डाच्या कारभारामुळे मनस्ताप सहन करावा लागला. संस्कृत विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नांना देण्यात आलेल्या पर्यायांचा क्रम बदलण्यात आला.

चिंता कर्जफेडीची अन् भविष्याची...

$
0
0
अवकाळी पाऊस आला. त्यानं सोबत गारांचा मारा आणला. या गारांच्या माऱ्यानं झाडावर लगडलेली हस्त बहाराची डाळींब पडली. अंबे बहाराच्या फुलांनाही गळ लागली. वर्तमानातलं पीक गेलं. भविष्यातलंही गेलं. हाती उरले फक्त कर्जाचे हप्ते. ‘पुढं कसं होणार हे माहिती नाही. कर्ज तर चुकणार नाही.

शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0
गारपिटीमुळे झालेले नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून कळंब तालुक्यातील शेतकऱ्याने शनिवारी आत्महत्या केली. बालाजी बागल (शिंगोली, ता. कळंब) असे या शेतकऱ्याचे नाव असून, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राज ठाकरेंना आचारसंहितेचा फटका

$
0
0
वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास एक लाख रुपयांची मदत केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या बीड दौऱ्यात त्यांनी ही मदत केली होती.

पीक ठरलं मातीमोल

$
0
0
‘अवकाळी पाऊस आला, त्यानं सोबत गारांचा मारा आणला. गारांच्या माऱ्यानं झाडावर लगडलेली हस्त बहाराची डाळींब पडली. अंबे बहाराच्या फुलांनाही गळ लागली. हाती उरले फक्त कर्जाचे हप्ते. पुढं कसं होणार माहिती नाही. कर्ज तर चुकणार नाही. बँकेवाले आज नाहीतर उद्या येणार. आता सगळ्यांचं जसं होईल, तसंच आपलही...,’ प्रिंपीराजा येथील तरूण डाळींब उत्पादक शेतकरी संतोष दगडू रांजणे गारपिटीमुळं झालेलं नुकसान दाखवताना सांगत होते.

हज यात्रेकरूंचा कोटा कमी

$
0
0
मक्का येथे बाधकाम सुरू असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व देशांच्या यात्रेकरुंचा कोटा वीस टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. भारतातून दरवर्षी हज यात्रेला एक लाख २५ हजार भाविक जातात. यंदा वीस टक्के कोटा कमी केल्यामुळे पंचवीस हजार भाविकांचा हिरमोड होईल.

प्रदूषण की निर्मलता, पर्याय निवडा

$
0
0
जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज असून, अन्य राष्ट्रांच्या तुलनेत आपण खूपच पिछाडीवर आहे. प्रदूषण वाढल्याने याचा परिणाम वातावरणातील बदलांवर होत आहे. आगामी पिढीला काय द्यायचं? निर्मलता कि प्रदूषण हे आता समाजाने ठरविण्याची वेळ आली आहे.

चारचौघांत कानउघाडणीनंतर महापौरांना कोसळले रडू

$
0
0
शिवजयंती कार्यालयाच्या उद‍्घाटनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी खासदार चंद्रकांत खैरे महापौर कला ओझा यांच्यावर चांगलेच संतापले. चारचौघात कानउघाडणी केल्यामुळे महापौरांना रडू कोसळले. त्या कार्यक्रम सोडून निघाल्याही पण खासदार खैरेंनीच त्यांची समजूत काढून थांबण्यास भाग पाडले.

गाडेकरांमुळे अस्वस्थता

$
0
0
गेल्या काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपासून अलिप्त असलेले पदाधिकारी राज ठाकरेंच्या दौऱ्यात सक्रिय झाले. त्यांच्या शिरकावामुळे मनसेतल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरलीय.

सिल्लोड- सोयगावमध्ये सतरा केंद्रे संवेदनशील

$
0
0
जालना लोकसभा मतदार संघात समावेश असलेल्या सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदार संघात सतरा मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांनी दिली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images