Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

जागावाटपाचा निर्णय आज मुंबईत

0
0
वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ आणि शिवराज्य पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय सोमवारी, १७ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत होईल.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास सक्तमजुरी

0
0
पोटदुखी बरी करण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीला येथील पहिल्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश कविता अग्रवाल यांनी १२ वर्ष सक्त मजुरी व दहा हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

बोगस डॉक्टरांची परभणीत शोधमो‌हीम

0
0
जिल्ह्यात १२० बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचा अंदाज असून त्यांच्याविरूद्धची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

मतदानाच्या टक्केवारीसाठी विशेष जनजागृती मोहीम

0
0
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

निवडणुकीसाठी नांदेड पोलिस दल सज्ज

0
0
आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड पोलिस दल सज्ज झाले आहे. जनतेने भयमुक्त वातावरणात मतदान करावे असे आवाहन पोलिस अधिक्षक परमजितसिंह गहीया यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

मालमत्ता करवसुलीसाठी हडकोतील दुकानाला सील

0
0
महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यात दिरंगाई करणाऱ्या हडकोतील एका मालमत्तेतील दुकानाला शनिवारी महापालिकेच्या विशेष वसुली पथकाने सील ठोकले. सहाय्यक आयुक्त गुलाम सादेख यांच्या नेतृत्वाखालील वसुली पथकाने ही कारवाई केली.

‘यशवंतराव चव्हाण’ चित्रपटावर आचारसंहितेचे सावट

0
0
जब्बार पटेल दिग्दर्शित यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतानाच त्यावर आचारसंहितेचे सावट पसरले आहे. राष्ट्रीय संत संदेश पार्टीने निवडणूक संपेपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पर्यटक निघाले दक्षिणेला

0
0
शाळा व महाविद्यालयायांना लवकरच लागणार असलेल्या सुट्यांमुळे अनेकांनी उन्हाळी पर्यटनाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. पर्यटन व देवदर्शन एकाच फेरीत होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक उत्तर भारताचा तुलनेत दक्षिण भारताला अधिक पसंती देतात.

रोजगार योजनेच्या अर्जांची पालिकेत दहा हजारांना विक्री

0
0
सुवर्ण जयंती रोजगार योजनेच्या अर्जांची पालिकेच्या प्रकल्प संचालक विभागाकडून दहा हजार रुपयांत विक्री केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. हा आरोप ऐरणीवर आला आणि प्रकल्प विभागाचे प्रभारी अधिकारी व उपायुक्त यांच्यात खडाजंगी झाली. अखेर प्रभारी अधिकारी सुट्टीवर निघून गेले.

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना गुरुवारची डेडलाइन

0
0
आरोग्य विभागातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बदल्या झाल्या. पण, चारही जिल्ह्यांतून १५ अधिकारी, कर्मचारी असे आहेत, की ते बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत.

दरमहा फक्त दहा रुपये एलबीटी भरण्याचे आवाहन

0
0
राज्यातील व्यापाऱ्यांनी राज्य शासनाच्या एलबीटी धोरणाच्या विरोधात असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल २०१४ पासून आयात होणाऱ्या मालावर फक्त दहा रुपये प्रतिमाह एलबीटी भरण्याचे ठरवण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानेही व्यापाऱ्यांना दरमहा दहा रुपये एलबीटी भरण्याचे आवाहन केले आहे.

स्कॉलरशीपची परीक्षा अखेर २३ मार्च रोजी

0
0
तांत्रिक अडचणी, मनुष्यबळाची कमतरता या ना त्या कारणावरून स्कॉलरशीप परीक्षेला मुहूर्त मिळत नव्हता. दोन, नऊ आणि शेवटी १६ मार्च रोजी परीक्षा होणार असे तोंडी जाहीर केले होते. परीक्षा परिषदेने आता स्कॉलरशीपसाठी २३ मार्च हा दिवस निश्चित केला आहे.

रिक्षा परवाना वाटपात खोट्या माहितीचा ‘खोडा’

0
0
आरटीओ कार्यालयाकडून वाटप करण्यात येत असलेल्या रिक्षांच्या नवीन परवान्यांसाठी पन्नास अर्जदारांनी खोटी माहिती भरल्याचे समोर आले आहे. खोटी माहिती भरल्यामुळे रद्द झालेल्या परवान्यांचे वाटप वीस मार्चनंतर पर्यायी यादीतून केले जाणार आहे.

मोसंबीचा आंबे बहार झडला

0
0
गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळात मोठ्या कष्टाने जगवलेल्या मोसंबीच्या बागा गारपिटीमुळे यंदाशी शेतकऱ्यांच्या पदरात काही टाकणार नाहीत. बहुतांश बागांमधील आंबे बहार गारपिटीमुळे झडला आहे. मृग बहारही अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे संकटात आला आहे.

मानेंचा दिल्लीत आत्मदहनाचा इशारा

0
0
कॉँग्रेसच्या प्रायमरीज निवड प्रक्रियेत पराभूत झालेले लातूरचे माजी उपनगराध्यक्ष मोहन माने यांनी, दिल्लीत ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

आपचा ‘ओबामा पॅटर्न’ जोरात

0
0
नागपूर येथे ‘डिनर विथ अरविंद केजरीवाल’ नंतर हाच प्रयोग औरंगाबादमध्ये राबविला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांनी वापरलेला पॅर्टन केजरीवाल वापरत असल्याची चर्चा आहे.

दोन आकडी खासदार गाठणार

0
0
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार दोन आकडी संख्या गाठतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केला. मनसे, आप या पक्षांचा राज्यात फारसा प्रभाव पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आज होणार जागावाटपाचा निर्णय

0
0
वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ आणि शिवराज्य पक्षांनी एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय सोमवारी, १७ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत होईल.

निवडणुकीचे रंग फिके

0
0
लोकसभा निवडणुकीचे काउंटडाउन सुरू झाले असले तरी, ग्रामीण भागात अद्यापही निवडणुकीचे रंग फिकेच आहेत. गारपीट आणि अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीमध्ये निवडणुकीची चर्चाही कोणी करताना दिसत नाही.

‘एमआयएम’ लोकसभेच्या रिंगणात

0
0
मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images