Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

‘आरटीआय’चा कानमंत्र पाळा

$
0
0
सीए होण्यासाठी ‘आरटीआय’चे पालन करा. रीड अर्थात वाचा. थिंक म्हणजे विचार करा, इंटरप्रीट अर्थात अनुमान करा. परीक्षांचा ताण न घेता आव्हान समजून सामोरे जा, असा कानमंत्र मुंबई चार्टर्ड अकाउटंट सोसायटीचे माजी अध्यक्ष उदय साठे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

हे मनसेचे ‘लेकरू’ याला कसं आवरू

$
0
0
निवडणुकीची धामधूम सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्या कामालाही गती आली. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या रंगात, आणि ढंगात रंगू लागला आहे. शहरात कार्यक्रम असला की तो पेपरमध्ये छापून येण्यासाठीची सर्वांचीच धडपड असते.

ढगांच्या गर्दीतून जाऊया !

$
0
0
उन्हाळा सुरू झालाय. परीक्षाच्या संपत आल्यात. आता बच्चे कंपनीला वेध लागलेत खूप-खूप फिरायचे. धमाल, मस्ती करायचे. तर मोठ्यांना त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवण्याचे. सुट्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अनेक जण विमान प्रवासाला पसंती देताहेत. त्यामुळे औरंगाबादहून निघणाऱ्या विमानांचे मे पर्यंतचे बुकींग सध्या जोरात सुरू आहे.

वृद्धत्वापर्यंत जपा किमान २० दात

$
0
0
जगातील १३६ देशांमधील दंतवैद्यांच्या १९१ संघटना यंदाचा जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा करीत आहेत. या वर्षी ‘निरोगी हास्याने साजरा करा जागतिक मौखिक आरोग्य दिन’ हे घोषवाक्य घेण्यात आले आहे. या निमित्ताने बालकांपासून वृद्धांपर्यंत मौखिक आरोग्याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

भूखंड माफिया टोळीतील मुख्य आरोपी पसार

$
0
0
डॉ. कादरी यांना जमिनीचा वाद मिटवण्यासाठी एक कोटीची खंडणी मागणाऱ्या भूखंड माफियाच्या टोळीतील मुख्य संशयीत आरोपी पसार झाले आहेत. तीन आरोपींना पूर्वीच पकडण्यात आले असून सध्या ते हर्सुल कारागृहात आहेत.

सेवानिवृत्त डिवायएसपीविरुध्द गुन्हा

$
0
0
जातपडताळणी विभागातून सेवानिवृत्त झालेल्या पोलिस अपअधीक्षकाविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आढळल्यामुळे अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने केलेल्या चौकशीमध्ये हा प्रकार उघड झाला असून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

उस्मानाबादचा पारा ३७ वर

$
0
0
जिल्ह्यात झालेली गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच निर्माण झालेला गारवा आता कमी होत चालला असून, उस्मानाबादकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून उस्मानाबादचा पारा ३३ वरून ३७ वर गेला आहे.

भोंदूबाबाविरूद्ध कारवाई करा

$
0
0
कळंब तालुक्यातील मलकापूर येथे भोंदूगिरी करून जनतेस लुटणाऱ्या एकनाथ लोमटे या भोंदूबाबा महाराजाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत केली.

गारपीटग्रस्त फळबागांचे पंचनामे रखडले

$
0
0
गारपिटीत रब्बी पिकांचे आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे कृषी क्षेत्राचे अर्थकारण कोलमडले आहे. या परिस्थितीतून सावरण्यास शेतकऱ्यांना किमान तीन वर्षे लागणार आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागात फळबागांचे पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कृषी सहायक पाहणीशिवाय बनावट पंचनामे करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

८२ मैदानासाठी महापालिकेने केले शुल्क निश्चित

$
0
0
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने प्रचार सभेसाठी लागणाऱ्या विविध ८२ मैदानांचे प्रत्येकी सहा तासांचे भाडेवजा शुल्क निश्चित केले आहे.

एलबीटी चुकवणारी दहा मालवाहू वाहने पकडली

$
0
0
एलबीटी चुकवून शहरातील बाजारपेठेत दाखल झालेली तब्बल दहा मालवाहू वाहने स्थानिक संस्था कर विभागाच्या विशेष पथकाने मंगळवारी पकडून त्यातील सर्व माल ताब्यात घेतला आहे.

महिलांना इलेक्शन ड्युटी मतदारसंघातच मिळणार

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी महिला कर्मचाऱ्यांना त्या कार्यरत असलेल्या विधानसभा मतदारसंघातच इलेक्शन ड्युटी देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

अपंग मतदारांना मतदानासाठी सुविधा

$
0
0
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी अंध, अपंग मतदारांना सुलभ मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

मिनीट्रेन आचारसंहितेच्या कचाट्यात

$
0
0
सिडको एन आठ येथे पालिकतर्फे तयार करण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डन मधील मिनीट्रेनला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. ट्रेनबद्दलची निविदा पालिकेने तयार केली. पण आचारसंहितेमुळे निविदा प्रसिध्द करता येत नाही, अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

‘सुपर सॅटर्डे’ला १९ हजारांवर नोंदणी

$
0
0
गेल्या शनिवारी मतदार नोंदणीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यांत १७ हजार २७७ नागरिकांनी नाव नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. ३१ जानेवारीनंतर जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या मोहिमेत सुमारे ५० हजारांवर नवे मतदार नोंदविण्यात आले आहेत.

महायुतीकडून मनसेच्या उमेदवाराचा कानोसा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात महायुतीने आपला उमेदवार जाहीर करुन सध्या बाजी मारली. प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची नावे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत.

१९ रस्ते होणार वर्षभरात पूर्ण

$
0
0
महापालिकेच्या हद्दीतील १३ रस्ते आठ महिन्यांत, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील सहा रस्ते एका वर्षापर्यंत पूर्ण करणार असल्याचे शपथपत्र महापालिका व बांधकाम विभागाने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात बुधवारी सादर केले.

हक्क असूनही लाभ नाही

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात महत्त्वाच्या कुठल्याही विषयावर ठोस निर्णय गेल्या काही महिन्यात घेतला गेला नाही. याचा फटका शिक्षकांनाच बसला आहे. आंतरजिल्हा बदल्या, पदोन्नती, समायोजन, पती - पत्नी एकत्रीकरण अशी अनेक प्रकरणे जूनपासून नुसती चर्चेत आहेत.

सोशल साइट्सवरुन ‘जागरुक’ साद

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मतदार नोंदणी झाली. मतदार नोंदणी आणि मतदानाबाबत या निवडणुकीत तरुणाई विशेष जागरुक झालीय. मतदान करुन योग्य उमेदवार निवडून देण्याची संधी कुणी गमावू नये, असे मत पहिल्यांदाच मतदान करीत असलेल्या तरुणांनी मांडले.

एक हजार घरट्यांमध्ये चिमण्यांनी थाटला संसार

$
0
0
चिमण्यांची संख्या घटली अशी चिंता करीत बसण्यापेक्षा गेल्या तीन वर्षापासून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. पक्षीप्रेमींनी वाटप केलेल्या कृत्रीम घरट्यांपैकी सुमारे २५ टक्के म्हणजे एक हजार घरट्यांमध्ये चिमण्यांच्या संसार थाटला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images