Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धनादेशासाठी महिलांची साठे महामंडळात गर्दी

$
0
0
महिला समुद्धी योजनेचा धनादेश त्वरीत मिळावा, अशी मागणी करत काही महिलांनी सोमवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयात धडक मारली.

शिक्षण विभागावर आता ६ कॅमे-यांची नजर

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सहा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढील काळात शिक्षण विभागात होणारी गर्दी कमी होणार आहे.

सही इंग्रजीत, पण मतदानासाठी मदतनीस

$
0
0
मतदान म्हटले की साम, दाम, दंड, भेद आलेच. आजकाल ‘दामा’वर अधिक भर दिला जातो. आपल्याला मतदानासाठी झालेली अर्थपूर्ण चर्चा सफल झाली की नाही हे तपासण्यासाठी लढविलेली नवीनच शक्कल औरंगाबाद प्रदेश महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीत दिसून आली.

नांदूर मधमेश्वर बंधा-याचा डावा-उजवा कालवा बंद

$
0
0
नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर दारणा प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी कालव्यांतून वळविण्याचा उद्योग सुरू करण्यात आला होता.

'त्या' झेडपी शाळांची पटपडताळणी

$
0
0
जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी व्यापक मोहिम हाती घेतल्यानंतर महिनाभरातच मोठा फरक दिसून येत आहेत.

स्प्रिंकलर पावसाने पिकांना जीवदान

$
0
0
दुष्काळाने होरपळ झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्वसू नक्षत्रात स्प्रींकलर पद्धतीने झालेल्या पावसाने थोडाफार आधार दिला. १ जुन ते १३ जुलै दरम्यान उस्मानाबाद शहर व परिसरात सुमारे ५२२ मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

३ लाख ९० हजारांचे दागिने चोरीस

$
0
0
सिल्लोड शहरातील व्यापारी किशोर हरिलाल अग्रवाल यांच्या म्हसोबा गल्लीतील घरातून शुक्रवारी रात्री चोरट्यांनी तीन लाख ९० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस रायटरला प्रशिक्षणाची गरज

$
0
0
कुठल्याही गुन्ह्याचा पंचनामा करताना त्यात पोलिस रायटरकडून अनेक त्रुटी होताना आणि नेमका याचाच फायदा आरोपींना निर्दोष सुटण्यासाठी होतो.

बोगस डॉक्टरांसाठी शोध मोहीम

$
0
0
वैद्यकीय शिक्षण न घेता वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांकडून अशिक्षित व सर्वसामान्य पेशंटवर बोगस उपचार केले जातात. यामुळे रुग्णांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी CCTV

$
0
0
समाजात दिवसेंदिवस घडणाऱ्या महिला, मुलींवरील अत्याचारांच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत गुजराती कन्या विद्यालयाने आपल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

चौकशीचे पॅचवर्क करू नका ...

$
0
0
स्थायी समितीच्या सभापतींना व सदस्यांना रस्त्यांच्या पॅचवर्कच्या चौकशीतून खरोखरच काही निष्पन्न करायचे असेल तर त्यांनी चौकशीचे 'पॅचवर्क' होईल असे वागू नये.

मराठा आरक्षणासाठी 'शिवबा'चा २४ जुलैला मोर्चा

$
0
0
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी येत्या २४ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राजे छत्रपती शिवबा युवा सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष मनोज जरांगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पावसाच्या रिपरिपीमुळेमका, कापसाला जीवदान

$
0
0
यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजा बरसत असल्याने तालुक्यातील शेतकरी समाधानी आहेत. गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे मका व कापसाला जीवदान मिळाले आहे.

बदललेल्या वेळापत्रकामुळे अडचण

$
0
0
कामगार, कष्टकरी वसाहत म्हणून ओळखली जाणाऱ्या हमालवाडा, रेल्वेस्टेशन वॉर्डात पाण्याची कमतरता नाही, पण बदललेल्या वेळापत्रकामुळे दोन दिवसांआड कमी दाबाने येणारे पाणी हीच समस्या नागरिकांनी बोलून दाखविली.

नोकराने पळवला ३७ हजारांचा ऐवज

$
0
0
नोकराने कँटीनमधून ३७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी रेल्वेस्टेशन भागात घडली.

उपमुख्यमंत्री पवारांचा पुढील महिन्यात बीड दौरा

$
0
0
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातील अर्ध्या डझनाहून अधिक विविध शासकीय कार्यालये आणि इतर इमारतींच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढच्या महिन्यात बीड दौऱ्यावर येणार आहेत.

रिक्त जागांसाठी झेडपी अध्यक्ष आक्रमक

$
0
0
बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुला हे मंगळवारी पाटोदा आष्टीतालुक्यात शिक्षकाच्या रिक्त जागा प्रकरणी आक्रमक झाले.

जादूटोणाविरोधी कायद्यासाठी लातुरात 'अंनिस'ची धरणे

$
0
0
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जादूटोणाविरोधी विधेयक पारीत करण्याच्या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात लातुरातील गांधी पुतळ्यासमोर तोंडाला काळे फासून धरणे आंदोलन केले.

तोतया पोलिसाकडून नऊ गुन्हे उघड

$
0
0
गुन्हेशाखेने पकडलेल्या राणी टोळीच्या तोतया पोलिसाकडून शहरात केलेले नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्या ताब्यातून एक लाख 61 हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

मुलींच्या सुरक्षेसाठी शाळा सरसावल्या

$
0
0
मुलींच्या सुरक्षेसाठी आधुनिकतेची कास धरत सिसिटीव्ही कॅमेरे शाळेत बसवित गुजराथी कन्या प्रशालेने पहिले पाऊले टाकले आहे. हे पाहून आधुनिकीकरणातून आपल्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शहरातील अन्य काही शाळांनीही पुढाकार घेतला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images