Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

स्मशानभूमीत रंगला लग्नसोहळा

$
0
0
स्मशानभूमीत लग्नसोहळा ही गोष्ट सहजासहजी पचनी पडत नाही. राहुलनगर स्मशानभूमी परिसरातील नागरिकांनी एका वेगळ्या लग्नसोहळा अनुभवला. कांचनवाडी स्मशानभूमीतील गायकवाड परिवार या वऱ्हाडी मंडळींचे राहुलनगर स्मशानभूमीत दणक्यात स्वागत करण्यात आले.

हार्वेस्टर, मळणी यंत्राचे दर वाढले

$
0
0
अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांच्या काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतातील पिके सोंगुन, मळणी करून घरी आणण्यासाठी मजूर, हार्वेस्टर, मळणी यंत्राला जादा पैसे मोजावे लागत आहेत.

लाचप्रकरणी तलाठ्यास सक्तमजुरीची शिक्षा

$
0
0
शेतकऱ्यांकडून सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुरुम (ता. उमरगा) सज्जाचे तलाठी रामण्णा माळी व त्याचा सहकारी वसंत देडे याला उमरगा येथील विशेष न्यायालयाने सक्तमजूरी व दंडाची शिक्षा ठोठावली.

७० लाखांचा कर एका दिवसात वसूल

$
0
0
नांदेड येथील पालिकेचा मालमत्ता कर भरण्यास कर दात्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी एकाच दिवसात महापालिकेच्या सहा क्षेत्रिय कार्यालयात मिळून ७० लाखाचा कर वसूल झाला आहे. यात सर्वाधिक ४३ लाख रुपयांची वसुली वजिराबाद झोनने केली आहे.

सातारा परिसराला अतिक्रमणांचा विळखा

$
0
0
शहराच्या अतिशय जवळचा असणारा परिसर म्हणजे सातारा. मागील १५ वर्षात या भागाची झपाटयाने वाढ झाली. परंतु नियोजनबद्ध वाढ न झाल्यामुळे अतिक्रमणाच्या समस्येनेही घेरले गेले आहे. २२ हजार ५०० मालमत्तांची नोंद ग्रामपंचायतीकडे असली तरी निश्चितच त्यापेक्षा जास्त मालमत्ता या भागात आहे.

पंचायत समितीला नवा ‘लूक’

$
0
0
वैजापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीला लवकरच नवा ‘लूक’ मिळणार आहे. प्रशासनाने इमारतीच्या प्रत्येक विभागाचे अद्ययावत फर्निचरसह नूतनीकरण हाती घेतले आहे. शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने मंजूर केलेल्या ३९ लाख रुपयांच्या निधीतून काम सुरू आहे.

‘जलदूत’ची पाणीदार किमया

$
0
0
दु र्लक्षामुळे कोरडी पडलेली येळगंगा नदी, पाणी झिरपण्याची व्यवस्था नसल्यामुळे शेकडो फूट खोल पाणी पातळी आणि ऑक्टोबर महिन्यात सुरू होणारे पाण्याचे टँकर... कौंडगाव (ता. पैठण) या गावाचे दोन वर्षांपूर्वीचे चित्र.

रेल्वेचे वेळापत्रक अपघातामुळे विस्कळित

$
0
0
ठाणे जिल्ह्यातील टिटवाड्याजवळ गुरुवारी झालेल्या लोकल रेल्वेच्या अपघातामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबई ते मनमाड रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ण विस्कळीत झाल्याने शुक्रवारी येणाऱ्या रेल्वे गाड्यांना उशीर झाला.

मनपा कामाची अजब तऱ्हा

$
0
0
पालिकेच्या कामाची अजब तऱ्हा शहरातील काही भागातील नागरिकांना पाहण्यास मिळाली. खड्डे बुजवण्यासाठी चक्क विटांचे तुकडे आणि उखडलेल्या रस्त्यांचे अवशेष वापरले जात आहेत. त्यामुळे वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे.

पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

$
0
0
शिवजयंती मिरवणूक मार्गातील खड्ड्यांमुळे पालिकेचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. त्यांना पालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन कानउघाडणी केली. रस्त्यांची कामे अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

इलेक्शन ड्युटी, नको रे बाबा…

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली असून, निवडणुक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणालाही २२ मार्चपासून (शनिवार) सुरुवात होणार आहे, मात्र आम्हाला निवडणुकीचे काम नको, असे म्हणत इलेक्शन ड्युटीतून सुटका मिळवण्यासाठी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत.

कोणता साथी घेऊ हाती!

$
0
0
लोकसभेसाठी काँग्रेस कोणता उमेदवार देणार, यावर आमचे पत्ते उघडू असे डावी आघाडीचे पदाधिकारी सांगत आहेत. औरंगाबादमध्ये उमेदवार देण्यास फारसी इच्छुक नसलेली डावी आघाडी आपल्या विचाराशी साम्य असलेल्या कोणत्या उमेदवाराच्या बाजूने उभे रहायचे अशा पेचात सापडली आहे.

मासिक बैठकीवर ग्रामसेवकांचा बहिष्कार

$
0
0
फुलंब्री येथील पंचायत ‌समितीमध्ये मंगळवारी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, तालुक्यातील काही पंचायत समिती सदस्यांकडून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीर कामे करावयास लावतात न केल्यास अपमानस्पद वागणूक देण्यात येते.

नाथ षष्ठीला आजपासून सुरुवात

$
0
0
नाथ षष्ठीच्या मुख्य उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी पैठण शहर सज्ज झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट व नाथवंशजामधील न मिटलेला वादाचे, नाथषष्ठी उत्सवावर व भाविकांच्या उपस्थितीवर परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

‘लॉ’चे पेपर रविवारी; विद्यार्थी संभ्रमात

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २२ मार्च रोजी होणारे ‘लॉ’ अभ्यासक्रमाचे पेपर २३ मार्च रोजी घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. ‌शनिवारच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी झाला तोच शुक्रवारी नवीन निर्णय घेण्यात आला.

औद्योगिक गुंतवणुकीसाठी कोरियन कंपनीची चाचपणी

$
0
0
‘कोरिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी’ने (कोट्रा) शहरात गुंतवणुकीच्या दृष्टीने जागा व इतर सुविधांचा अभ्यास सुरू केला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेवून चर्चा केली.

मटन मार्केटची जागा मूळ मालकास परत

$
0
0
नवाबपुरा येथील मटन मार्केटची जागा मूळ मालकास परत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू केली आहे. ती जागा मूळ मालकास परत दिल्यावर मोबदला देण्याचा प्रश्नच नाही, असे या संबंधीच्या प्रस्तावात नमूद केले आहे.

नेत्रपेढ्यांच्या परवान्यांकडे ‘काणाडोळा’

$
0
0
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) नेत्रपेढीसह इतर तीन नेत्रपेढ्यांचे परवाना नूतनीकरण कित्येक महिने रखडल्याने नेत्रदान चळवळीसमोरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सद्यस्थितीत शहरातील पाचपैकी केवळ एका नेत्रपेढीचे परवाना नूतनीकरण झाले आहे.

मलोआचे तळ्यात-मळ्यात सुरू

$
0
0
लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापत आहे. शिवसेना, आम आदमी पक्षाने उमेदवार घोषित केलेत. मात्र, महाराष्ट्र लोकशाही आघाडीचा औरंगाबादच्या उमेदवाराबाबत अजून निर्णय झालेला नाही.

मालखेडा येथील तणाव निवळला

$
0
0
विनापरवानगी बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यासाठी पोलिस आल्यामुळे सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे शुक्रवारी तणाव निर्माण झाला होता. परंतु आचारसंहिता संपेपर्यंत पुतळा मंदिरात ठेवणे व निवडणुकीनंतर परवानगी घेऊन पुतळा बसविण्याच्या प्रशासनाची विनंती गावकऱ्यांनी मान्य केल्याने तणाव निवळला.
Viewing all 47944 articles
Browse latest View live


Latest Images