Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

बीएलओ वाटणार पोलिंग चिट

$
0
0
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांच्या घरोघर जाऊन पोलिंग चिट (व्होटर्स स्लीप) वाटण्याचे काम निवडणूक आयोग करणार आहे. मतदानाच्या पाच दिवस आधी व्होटर्स स्लीप मतदारांपर्यंत पोचविण्यात याव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

खतगावकर यांची नांदेडमधून माघार

$
0
0
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी त्यांचे मेव्हणे व नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे.

अशोक चव्हाणांचा मार्ग मोकळा

$
0
0
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी त्यांचे मेव्हणे व नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे.

मोदींमुळे ऐक्य धोक्यात येईल!

$
0
0
'नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर देशाच्या ऐक्याला सुरूंग लागेल', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर आज हल्ला चढवला. गुजरातमधील दंगलीची जबाबदारी मोदींचीच असल्याचे सांगत त्यांनी आपल्या आधीच्या भूमिकेवरही यावेळी यू टर्न घेतला.

सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचा हात?

$
0
0
राज्यात मोठ्या प्रमाणत झालेल्या सिंचन घोटाळ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शनिवारी (२२ मार्च) येथे केला. नंदू माधव यांच्या प्रचारार्थ बीडमध्ये आयोजित सभेत बोलत होत्या.

नव्या जालन्यात ‘लाखमोला’ची अस्वच्छता

$
0
0
नगर पालिका शहराच्या नवीन जालना भागातील सार्वजनिक स्वच्छतेवर रोज तब्बल एक लाख रुपये खर्च करत आहे, तरी देखील सर्वत्र कचरा, तुंबलेली गटारे आणि घाणीचे साम्राज्य नव्या जालन्यात पसरलेले आहे. आठ प्रभागांचे क्षेत्र असलेला नवा जालना मुख्य बाजारपेठ व अन्य महत्त्त्च्या व्यापारी संस्थांनी व्यापलेला परिसर आहे.

प्रधान सचिवांकडे आयुक्तांबद्दल तक्रारी

$
0
0
महापालिकेच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांनी प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांची भेट घेऊन आयुक्त आणि उपायुक्तांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या. श्रीकांत सिंह यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. योग्यवेळी तोडगा काढण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.

एलबीटी’ विभागामुळे व्यापारी त्रासले

$
0
0
महापालिकेच्या एलबीटी अधिकाऱ्यांनी काढलेल्या फर्मानाची चिरफाड करीत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रधान सचिवांच्या समोर अक्षरशः तक्रारींचा पाढाच वाचला. प्रधान सचिवांनीही या तक्रारींची दखल घेत पालिका आयुक्तांसह एलबीटी अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश दिले.

‘नॅशनल हाय-वे’चे विभाग आता ‘पीडब्ल्यूडी’कडे

$
0
0
मराठवाड्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी स्थापन करण्यात आलेले औरंगाबाद आणि उस्मानाबाद हे दोन विभाग आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.

मदतीच्या पॅकेजची गारपीटग्रस्तांना गुगली

$
0
0
गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विशेष पॅकेजची घोषणा केली, मात्र पन्नास टक्यांपेक्षा अधिकचे नुकसान व दोन हेक्टरपर्यंतची मर्यादेच्या नियमामुळे ही घोषणा मराठवाड्याच्या बहुतांश बाधित शेतकऱ्यांसाठी गुगलीच ठरली आहे.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0
सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनी म्हणून नोकरी देण्याच्या आमिषाने इप्टा टेक्नोलॉजीज या कंपनीने सुमारे ४५० विद्यार्थ्यांची तब्बल ९० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

तोफांनी गाजवला दिवस

$
0
0
शहीद दिनानिमित्त आयोजित ‘यूथ कॉनक्लेव्ह’चा पहिला दिवस तोफांनी गाजवला. लष्करातील निवडक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सैनिकांद्वारे तोफांची बांधणी व हाताळणी प्रात्यक्षिक सादर करताना ‘भारत माता की जय’ च्या घोषणांनी मैदान दणाणून गेले. रविवारी या प्रदर्शनाचा समारोप आहे.

‘कॅम्पस’चे वारे जोरात

$
0
0
औरंगाबाद शहरात गेल्या दोन दिवसांत इंजिनीअरिंगच्या विविध शाखांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला शिकत असलेल्या ८० विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटर्व्ह्यूच्या माध्यमातून नोकरीची संधी मिळाली आहे.

मोदींमुळे देशाच्या ऐक्याला सुरूंग

$
0
0
नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील दंगलीत दिवसाढवळ्या माणसे मारली गेली. मात्र, दंगलग्रस्तांना भेटण्याचा आणि त्यांचे सांत्वन करण्याचा साधा शिष्टाचारही मोदींनी पाळला नाही. अशा नेत्याच्याहातात देशाची सत्ता दिल्यास ऐक्याला सुरुंग लागेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

मराठवाड्यात दुष्टचक्र थांबेना

$
0
0
गारपिटीने झालेल्या नुकसानीने त्रस्त झाल्यामुळे जीवनयात्रा संपविण्याचे दुष्टचक्र अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. मराठवाड्यात गेल्या २४ तासांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत व त्यासाठीच्या निकषांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने नाराजी पसरली आहे.

लतादिदी-मोदी कनेक्शनवर टीका

$
0
0
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर सर्वजण प्रेम करतात. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे अँम्बेसेडर बनू नये, अशी अपेक्षा आम आदमी पार्टीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे व्यक्त केली. गुजरातचा विकास झाला, हे फसवे चित्र आहे. दंगलीसह अन्य वास्तव वेगळेच आहे, ते त्यांनी पाहावे. लतादिदिविषयी असलेल्या प्रेमापोटीच ही अपेक्षा करत असल्याचेही पाटकरांनी नमूद केले.

‘मासिआ’तर्फे गारपीटग्रस्तांना मदत

$
0
0
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चर (मासिआ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच औरंगाबाद जिमखाना क्लब येथे झाले. सुनील भोसले अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसाने कोट्यावधींचे नुकसान झाले.

‘फिर वही शाम वही गम...’

$
0
0
‘फिर वही शाम वही गम वही तनहाई है ..दिल को समझाने तेरी याद चली आई है..’ ; ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो..’ अशी एकापेक्षा एक दु:ख, वेदना, दर्दभरे कंपन सादर करणारी गाणी ज्येष्ठ गायक श्रीकांत पारगावकर यांनी शनिवारी (२२ मार्च) सादर केली.

‘एमआयटी’त आजपासून ‘फ्लॅश’ महोत्सव

$
0
0
एमआयटीच्या मैदानावर भावी अभियंत्यांचा उद्या मंगळवारपासून जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. निमित्त आहे. ‘फ्लॅश’ महोत्सवाचे. दोन दिवस चालणाऱ्या या टेक्निकल आणि नॉन टे‌क्निकल उपक्रमात विविध तेरा स्पर्धां रंगणार आहेत.

नाथ मंदिरात भाविकांची मांदीयाळी

$
0
0
नाथषष्ठीनिमित्त औरंगपुरा येथील संत एकनाथ मंदिरात आज भाविकांची मांदियाळी दिसून आली. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला आहे. नाथषष्ठी निमित्त विविध धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images