Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

हेमाडपंथी वारसा झळाळून निघणार

$
0
0
शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या हेमाडपंथी मंदिरांची औरंगाबाद शहर आणि परिसरात मोठी संख्या आहे. बदलत्या काळात काही मंदिरांची दूरवस्था झालीय. निवडक मंदिरांचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाने पाऊल उचलले आहे.

नांदेड लोकसभेची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर

$
0
0
नांदेड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेशी निगडीत सर्व प्रकारची अद्यावत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.nanded.nic.in या संकतस्थळावरील `इलेक्शन २०१४` या आयकॉनवर उपलब्ध आहे.

कंडक्टरची डोकेदुखी

$
0
0
एसटीमध्ये तिकीट देण्यासाठी वापरले जाणारे यंत्र (इटीआयएम) कंडक्टरसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या यंत्राची देखभाल दुरुस्ती व खराब झालेली यंत्रे वेळच्या वेळी बदलल्या नाहीत. त्यामुळे यंत्रातील बिघाडामुळे कंटक्टरला कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

घाटी, कॅन्सर हॉस्पिटलला मिळणार कोटींची उपकरणे

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (घाटी) शासकीय विभागीय कॅन्सर हॉस्पिटलला व्हेंटिलेटर, डिफ्रिबिलेटर, एक्स-रे, सोनोग्राफी अशी अनेक महत्त्वपूर्ण उपकरणे मिळणार असून, ही उपकरणे काही कोटी रुपयांच्या घरांत असू शकतात, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली.

शेतकरी २ वर्षांपासून वीज कनेक्शनपासून वंचित

$
0
0
फुलंब्री सब स्टेशन परिसरामध्ये २०११-१२ मध्ये विद्युत वितरण कंपनीने ‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत जे शेतकरी विहिर, विंधन विहिरीवरील विद्युत कनेक्शनपासून वंचित होते त्यांच्याकडून महिन्याच्या आत कनेक्शन देण्याच्या नावाखाली कोटेशन भरून घेतले.

टेम्पोच्या धडकेने तरुणी ठार

$
0
0
परभणी येथून फिरण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणीच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात तरुणी जागीच ठार झाली असून तरुण गंभीर जखमी झाला आहे.

उत्तमसिंह पवार बंडखोरीच्या तयारीत

$
0
0
लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर करताच माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरीचा झेंडा उचलला आहे. काँग्रेसमध्ये इमानेइतबारे काम करणाऱ्याला ‌उमेदवारी न देता, पक्षाशी गद्दारी करणाऱ्या उमेदवारी जाहीर करून पक्षप्रमुखांनी विश्वासघात केल्याची तोफ उत्तमसिंह पवार यांनी डागली.

मनसेची मोर्चेबांधणी; मात्र महायुती निश्चिंत

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतिगिरी महाराज व राज ठाकरे यांची भेट महत्वाची मानली जात आहे. असे असताना महायुतीमध्ये मात्र विजयाबाबत निश्चिंतपणा असल्याचे जाणवत आहे.

'आम आदमी' ची गंगाजळी कोरडी

$
0
0
आम आदमी पक्षाने जनतेतून निधी गोळा करून निवडणुकीची तयारी सुरू केली. मात्र, मराठवाड्यात गारपीटीमुळे पक्षाच्या निधीसंकलनाला फटका बसला आहे. औरंगाबादमध्ये ‘आप’ ने प्रचार सुरू केला आहे.

बसप, लोकशाही आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात

$
0
0
महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि बहुजन समाज पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारांचे पत्ते अद्याप उघड केले नाहीत. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र बैठकसत्र सुरू करत प्रचार सुरू केलाय.

विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न

$
0
0
माहेरहून पन्नास हजार रुपये आणण्यास नकार दिल्याने विवाहितेला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी (२२ मार्च) दुपारी किराडपुरा भागात घडला. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी कट्ट्यांचे ग्राहक निघाले दुचाकी चोर

$
0
0
गावठी कट्टे खरेदी करण्यासाठी आलेले आरोपी अट्टल दुचाकी चोर निघाले आहेत. पोलिसांनी प्रमुख आरोपीला पकडल्यानंतर या चौघांनी धूम ठोकली होती. याना ‌रविवारी अटक करण्यात आली असून, चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जैन मंदिरावर ‘नजर’

$
0
0
शहरातील जैन मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गेल्या काही महिन्यांत चोरट्यांनी या मंदिरांना लक्ष केले. त्यानंतर जैन समाजाच्या वतीने पुढाकार घेऊन मंदिर सुरक्षिततेबाबत सजगता बाळगण्यात येत आहे.

MDR-TB लॅब लवकरच रुग्णांच्या सेवेत

$
0
0
क्षयरोग (ट्युबरक्युलॉसिस) आणि क्षयरोगाच्या सर्वसामान्य औषधांना दाद न देणाऱ्या मल्टिड्रग रेझिसटन्ट-ट्युबरक्युलॉसिस (एमडीआर-टीबी) अर्थात अतिगंभीर प्रकारच्या क्षयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस देशभर वाढत आहे. शहर-जिल्ह्यासह मराठवाड्यातही एमडीआर-टीबी रुग्णांचे निदान होत आहे.

रेल्वे उड्डाणपुलासाठी २३ कोटी रुपये द्या

$
0
0
रेल्वेस्टेशन एमआयडीसी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी २३ कोटी १० लाख रुपये द्या, असे पत्र पालिकेने एमआयडीसीला दिले असून त्याची प्रत उद्योग सहसंचालकांना पाठवली आहे.

पोलिसांमुळे मिळाले ३० हजार रुपये परत

$
0
0
बहिणीच्या लग्नासाठी कंपनी मालकाकडून तीस हजार रूपये उसने घेऊन, रेल्वेने जाण्यासाठी निघालेल्या तरूणाची बॅग हरविली आणि त्याने बहिणीसाठी पाहिलेले स्वप्न क्षणात हरवले. औरंगाबादहून जालनापर्यंत गेलेल्या या तरूणाने पुन्हा औरंगाबाद गाठले.

पाणी टंचाईवर ‘रिचार्ज मॉडेल’

$
0
0
मराठवाड्यातील शेतीत सुधारणा करण्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने ‘रिचार्ज मॉडेल’ उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक तालुक्यातील एका गावात हा प्रयोग राबवला जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी दिली.

मालमत्तांच्या मूल्यांची गद्धेपंचविशी

$
0
0
शहरातील मालमत्तांचे पंचेवीस वर्षात फेरमूल्यांकन झाले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आलीय. पन्नास हजारांपेक्षा जास्त मालमत्तांना जुनाच कर आकारला जातोय. त्यामुळे पालिकेला दरवर्षी कोट्यावधींचे नुकसान सहन करावे लागत असून या नुकसानीत वाढच होतेय.

राष्ट्रवादीला आष्टीमध्येच खिंडार

$
0
0
लोकसभा निवडणुकमध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांना त्यांच्याच आष्टी तालुक्यामध्ये खिंडार पडले आहे. आष्टी तालुक्याचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

बेशिस्त वाहतुकीचा जिवाला फास

$
0
0
सर्वाधिक वर्दळीचा बाबा पेट्रोल पंप चौक (महावीर चौक) ते मिलकॉर्नर रस्ता वाहतुकीच्या विस्कळीत नियोजनामुळे वाहनचालकांसाठी तापदायक ठरला आहे. अॅपे रिक्षाचालकांनी संपूर्ण रस्ता ताब्यात घेतल्यामुळे दुचाकीचालक त्रस्त झालेत, तर सिद्धार्थ उद्यान व मध्यवर्ती बसस्थानक परिसराला रिक्षांनी वेढा घातला आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images