Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

औरंगाबादेत काँग्रेसचे पाटील

0
0
चर्चांचे गुऱ्हाळ, दिल्लीवाऱ्या, श्रेष्ठींच्या बैठकांनंतर अखेरीस सोमवारी सायंकाळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराचा तिढा सुटला. माजी आमदार नितीन पाटील यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केल्याचे यावरून स्पष्ट केले.

व्यसनमुक्तीसाठी नाटक, चित्रप्रदर्शन अन् लघुपट

0
0
विलक्षण ताणतणावाच्या आयुष्यात समाजाला भेडसावणारे अनेक संकटांपैकी एक आहे व्यसनाधिनता. युवा पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनांकडे झुकली आहे. यामुळे कर्करोग, अवयव गमावणे आणि मृत्युसारख्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

शालेय उपक्रमांतून आरोग्य विभागाचा जागृती उपक्रम

0
0
‌किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्य समस्या विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमांव्दारे समजावण्याचा स्तुत्य उपक्रम मनपाच्या आरोग्य विभागाने राबवला. निबंध स्पर्धा व प्रश्नमंजुषेद्वारे गेल्या सप्टेंबर महिन्यात मनपाअंतर्गत २० शाळांच्या २१२७ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेतल्या गेल्या.

अखेरपर्यंत रंगभूमीचा ध्यास

0
0
चित्रपटात उल्लेखनीय यश मिळवल्यानंतरही ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांची रंगभूमीवरील निष्ठा कायम होती. शेवटच्या आजारापर्यंत नाटकांच्या दौऱ्यासाठी पवार राज्यभर दौरा करीत होते. गणेशोत्सवात ‘बायांनो नवरे सांभाळा’ या नाटकाचे मराठवाड्यात चार प्रयोग केले.

महाराष्ट्राचे सां‌गीतिक दर्शन

0
0
चित्रपट संगीतातून रसिकांना परिचित झालेला गायक स्वरुप भाळवणकर ‘महाराष्ट्र अँथम’मुळे प्रकाशझोतात आला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन असलेले अँथम तरुणांना पसंतीस पडल्याचे औरंगाबादमध्ये झालेल्या ‘युथ कॉनक्लेव्ह’मध्ये याची प्रचिती आली. या पार्श्वभूमीवर स्वरुपशी साधलेला संवाद...

‘फ्लॅश’मध्ये चमकले भावी अभियंते

0
0
‘फ्लॅश’ इव्हेंटच्या प्रत्येक स्पर्धेत मुलांइतकीच मुलींनीही रुची दाखवली. विविध कॉलेजच्या तब्बल सहाशे पेक्षाअधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल स्पर्धेत भावी अभियंत्यांनी आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरविल्या. महाराष्ट्र टाइम्स या इव्हेंटचा मिडिया पार्टनर होता.

पोरांचं ‘सोशल इंजिनीअरिंग’

0
0
राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएस. याचं एक तत्त्व आहे, ‘नॉट फॉर मी, बट फॉर यू’. या उक्तीनुसार, तत्वानुसार जेएनईसी कॉलेजच्या सर्व शाखांचं मिळून एक शिबिर पुण्याजवळील ‘आपलं घर’ येथे झालं.

सफर चांदण्या रात्रीची

0
0
चांदण्यात न्हालेली गडवाट, हवेतला सुखद गारवा, निवडक सोबत्यांसह केलेला इतिहासाचा जागर, पहाटे गडाच्या तटबंदीहून केलेलं सूर्यनारायणाचं स्वागत...हे सगळं मनसोक्त अनुभवण्याचा अर्थातच चांदण्यातल्या ट्रेकचा मोसम सुरू झालाय. तेव्हा मस्तपैकी तयारी करा आणि मूनलाइट ट्रेकिंगची मनसोक्त मजा लुटा.

लातूर मतदारसंघामध्ये मोदींची लाट नाही

0
0
लातूर लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची लाट नाही. अतिशयोक्ती वाटावी, अशी जाहिरातबाजी होत असल्याची टीका आमदार अमित देशमुख यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांच्याशी पत्रकाराचा संवाद काँग्रेस पक्षानी आयोजित केला होता.

‘अण्णांनी बिनधास्त प्रचाराला यावे’

0
0
‘ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी बिनबुडाचे करण्यात मास्टरी मिळवली आहे. मात्र, त्यांनी उस्मानाबाद मतदारसंघात येऊन माझ्याविरोधात प्रचारासाठी यावे,’ असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मंगळवारी दिले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आव्हान दिले.

‘बारामतीच्या पार्सलची बीडसाठी गरज नाही’

0
0
माझ्या विकासाच्या खुणा जिल्ह्यातील गावोगावी असून, बारामतीकरांचे बीडवर पुतना मावशीचे प्रेम आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जिल्ह्यात बारामतीचे पार्सल आणण्याची गरज नाही, अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी केली.

महायुती, आघाडी... कोठेच आलबेल नाही

0
0
उस्मानाबाद मतदारसंघातून काँग्रेस आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील नाराजीही प्रकर्षाने समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यशैलीविषयी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असून, शिवसेनेमध्ये उमेदवार रवींद्र गायकवाड यांच्याविषयी नाराजी आहे.

डीपीवरचा भार करतो हैराण

0
0
सातारा येथील गट क्र. ९९ मधील मोरे डी. पी. वर क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन दिल्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. तसेच रात्रीच्या वेळी लाईट गेली तर दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागते. मागच्या दोन वर्षापासून हा त्रास सुरू आहे.

पॉलिटेक्निक पेपरफुटीचा तपास थंड बस्त्यात?

0
0
‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमांच्या पेपरफुटीला चार महिने पूर्ण झाले तरी पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोचणे शक्य झालेले नाही. विभागीय स्तरावर तीन समित्या, राज्यस्तरावर डॉ. गुपचूप समिती यापलिकडे तंत्रशिक्षण विभागाचा तपास पोचलेला नाही.

घाटीत औषधांचा तुटवडा

0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) गेल्या आठ ते दहा दिवसांपासून औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत घाटीमध्ये अनेक अतिशय महत्वाची औषधे उपलब्ध नाहीच.

रसवंतीच्या घुंगरांचा नाद जोरात

0
0
ऊन्हाचा चटका वाढला तशी रसवंतीतली लगबग वाढली. ऊकाड्यात उष्णता कमी करून थकवा दूर करणारे सर्वांचे आवडते पेय म्हणजे उसाचा रस. तशी गेल्या फेब्रुवारीपासूनच रसवंत्या थाटण्यास सुरूवात झाली. पण ऊन्हाचा पारा वाढताच रसवंतीतली गर्दी वाढतेय.

जनावरांना वाचवण्यासाठी धडपड

0
0
जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यात पिके आडवी झाल्यामुळे कणसे सडली आहेत. चारा काळा पडून अक्षरशः कुजल्यामुळे यावर्षी चारा टंचाई निर्माण झाली आहे.

भीमशक्तीच्या जिल्हा संघटकाचा खून

0
0
भीमशक्तीचे जिल्हा संघटक राजू जाधव यांचा चाणक्यपुरी भागात चाकूने वार करुन निर्घृण खून करण्यात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. जाधव यांनी भाचीला छेडणाऱ्या एकाला मारहाण केली होती.

विद्यार्थ्याला खंडणी मागणारे जाळ्यात

0
0
एका परप्रांतीय विद्यार्थ्यांना विकण्यासाठी दिलेल्या लॅपटॉपवर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची भिती घालून वीस हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या दोघांना सायबरसेलच्या पथकाने अटक केली.

आता पाणपोयांची उभारणी नाही

0
0
कोट्यावधींची गुंतवणूक अडकली. देखभाल दुरूस्तीची व्यवस्थाही नाही. पाणपोयांवर पाणी पिणाऱ्यांची संख्याही नगण्य आहे. त्यामुळे आता पाणपोयांमध्ये पैसा गुंतवायचा नाही, असे धोरण पालिकेच्या प्रशासनाने तत्वतः स्वीकारले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images