Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पालिकेचा ३ कोटी रुपयांचा तोटा

$
0
0
‘प्रोझोन’ मॉलमुळे महापालिकेला मालमत्ता करात तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला असे म्हणत पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सर्वसाधारण सभेच्या निर्णयावरच निशाणा साधला.

राज्यात ३४ पेक्षा जास्त जागा जिंकणार

$
0
0
देशभर नरेंद्र मोदी यांची लाट आहे. बीडमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय होणार असून राज्यात ३४पेक्षा जास्त जागा मिळतील, असे भाकित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले आहे.

औरंगाबादकरांची तहान मिटणार

$
0
0
उन्हाळ्यातच काय, पण पुढच्या पंधरा वर्षांत औरंगाबादेतील नागरिकांना पाण्याची चिंता करण्याचे कारण नाही. जायकवाडी धरणात करण्यात आलेल्या अॅप्रोच कॅनॉलच्या कामामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.

सौंदर्य सोनेरी महालाचे!

$
0
0
नऊशे वर्षांच्या इतिहासाची साक्ष असलेला सोनेरी महाल नावीन्यपूर्ण कामामुळे अधिक आकर्षक झाला आहे. दर्शनी भागात नुकतेच बांधकाम झाल्यामुळे महालाच्या सौंदर्यात भर पडली आहे. सरदार पहाडसिंग यांची ही भव्य वास्तू पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

टॅलेंटचं टेक ऑफ

$
0
0
मॅनेजमेंट-इंजिनीअरिंग-मेडिकल शिक्षणात आलेले साचलेपण दूर करण्यासाठी नव्याने उदयास आलेल्या क्षेत्रांत पाय रोवणे गरजेचे आहे ही नवी क्षेत्रे कोणती, याची माहिती मुले घेत आहोत. ठराविक पारंपरिक शिक्षण घेऊन ती मुलं वेगळं काही करता येईल का? याचा विचार करत करिअर करू लागली आहेत.

सरकारी वेबसाइटवरून नेते, मंत्र्यांचे फोटो काढा

$
0
0
निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व वेबसाइटवरून मंत्री, राजकीय नेते यांचे फोटो काढून टाकावेत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

कोणाला वाटलं म्हणून तिकीट कापलं नाही

$
0
0
‘कोणाला वाटलं म्हणून कोणाचं तिकीट कापलं नाही. अन् उमेदवारी अचानक जाहीर झाली नाही. त्यासाठी हायकमांडनं मोठी प्रक्रिया राबवली,’ असे म्हणत पहिल्यांदाच बंडाच्या पावित्र्यात असलेल्या उत्तमसिंह पवारांना पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी सडेतोड उत्तर दिले.

बंडोबावर चर्चा नको, फक्त नियोजन हवे

$
0
0
आता कॉँग्रेसमध्ये बंडखोरीबाबत पुन्हा चर्चा नको. काय बोलायचे ते फक्त नियोजनावरच बोला, असे सांगून बाळासाहेब थोरात, राजेंद्र दर्डा आणि अब्दुल सत्तार या ज्येष्ठ नेत्यांनी अन्य मुद्यावरील चर्चेला पूर्णविराम दिला.

ऑईलची मागणी घटूनही विक्रीसाठी पंपचालकांवर दबाव

$
0
0
टू स्ट्रोक ऐवजी फोर स्ट्रोक दुचाकी व रिक्षांची वाढलेल्या संख्येमुळे पेट्रोलपंपांवरील ऑईलची मागणी मुळाच कमी झाली आहे. या परिस्थितीत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीकडून ऑईल विक्रीसाठी दबाव आणला जात असल्यामुळे पेट्रोलपंपचाल हैराण झाले आहे.

आयुक्तांची नजर आता शैक्षणिक संस्थावर

$
0
0
मोठ्या थकबाकीदारांकडील कर वसुलीच्या नंतर पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नजर आता शैक्षणिक संस्थावर गेली आहे. या संस्थांकडे थकलेला कोट्यावधींचा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

कर भरण्यासाठी वॉर्ड कार्यालयांमध्ये गर्दी

$
0
0
मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये नागरिकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून धिम्या गतीने केले जाणारे काम व सुविधांचा अभाव यामुळे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काँग्रेसचा उमेदवार लखपती, भाजपवाला कोट्याधीश

$
0
0
लातूर राखीव लोकसभा मतदार संघातील सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांची संपत्ती लाखात असून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी शपथपत्रात नमुद केलेली संपत्ती ही कोटीत असून त्यांच्याकडे व पत्नीकडे सहा मोटारी आहेत.

बाजार समितीचे उत्पन्न ‘खासगी’मुळे घटले

$
0
0
तालुक्यातील सर्व कापसाचे खरेदी विक्री व्यवहार खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होत असल्यामुळे मुळ सहकारी तत्वावरील बाजार समितीचे उत्पन्न दोन वर्षापासून कमी होत आहे. बाजार समितीला कापसाच्या उलाढालीमधून मिळणाऱ्या दोन ते अडीच कोटी रुपयांच्या कमिशनवर पाणी सोडावे लागले आहे.

आत्महत्येस प्रवृत्त करणारे पोलिसांच्या हाती लागेनात

$
0
0
मित्रनगर परिसरात पत्नी व मुलाचा खून करून आत्महत्ये केलेल्या मनोज जैस्वालच्या प्रकरणाला तीन आठवडे उलटले आहेत. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या चौघा आरोपीपैकी तीन आरोपी अद्यापही जवाहरनगर पोलिसांना सापडले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जमिनीचा हिस्सा मिळाविसाठी पुजाऱ्याला धमकी

$
0
0
अनेक वर्ष न्यायालयीन लढाई लढल्यावर गरीब पुजाऱ्याला पैठण तालुक्यातील आखतवाडा येथे मिळालेल्या इनामी शेतजमिनीतून काही हिस्सा मिळावा यासाठी गावातील काही गुंड व्यक्ती सरपंच व तलाठ्याच्या सहाय्याने पुजारी शेतकऱ्याला त्रास देत आहे. याप्रकरणी पुजारी शेतकऱ्याने पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मुद्दसीरचा खून गॅस व्यवसायातून नव्हे तर अनैतीक संबधातून

$
0
0
मकसूद कॉलनी येथील मुद्दसीर शेख ख्वाजामीया याचा खून गॅस व्यवसायाच्या स्पर्धेतून नव्हे तर अनैतिक सबंधातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काम करणाऱ्या तरुणांनी १३ मार्च खून करून मृतदेह गौताळा अभयारण्याजवळ एका दरीत फेकला होता.

अर्धवट पंचनाम्यांमुळे गारपीटग्रस्तांना निधी वाटपात अडचणी

$
0
0
गारपीटग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेल्या निधीपैकी २२० कोटी रुपयांचा पहिला टप्पा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आला असून, पंचनामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये या निधीचे वाटप करण्यात येणार आहे. अनेक गावांतील पिकांचे पंचनामे अद्यापही बाकी असून, या गावांमध्ये मात्र निधीवाटप करता येणार नाही.

रॅँम्पवर अवतरणार भावी फॅशन डिझायनर

$
0
0
फॅशन डिझायनर होण्याचे स्वप्न बघणारी एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगच्या ५५ विद्यार्थ्यांचा शनिवारी (२९ मार्च) वार्षिक फॅशन शो ‘कॅलिडोस्कोप - २०१४’ आयोजित करण्यात आला आहे.

पाण्याची गुणवत्ता तपासणार

$
0
0
संपूर्ण शहराच्या प्रत्येक भागात अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या पाण्याची व जलस्रोतांची नेमकी स्थिती काय आहे? किती शुद्ध-अशुद्ध-प्रदूषित आहे? याचा शास्त्रीय वेध घेण्यासाठी विशेष मोहीम जागतिक जल दिनानिमित्त २२ मार्चपासून सुरू झाली. या मोहिमेतून शहरात कुठल्या भागात किती गुणवत्तापूर्ण पाणी आहे? याचा आलेख समोर येणार आहेच; शिवाय ज्या भागात पाण्याची गुणवत्ता नाही, तिथे गरजेनुसार कुठल्या उपाययोजना राबवता येऊ शकतात, याचाही वेध घेण्यात येणार आहे.

सरकारी ‘व्हीसी’ला सशर्त परवानगी

$
0
0
निवडणूक आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) घेण्यासाठी निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. केवळ नैसर्गिक संकटाच्या काळात मंत्र्यांना अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी केवळ एकदाच व्हीसी घेण्यात येईल.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images