Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

आष्टी तालुक्यात ‘थ्रीडी’ला ब्रेक

$
0
0
बीड जिल्ह्यातील आष्टीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते भीमराव धोंडे यांनी शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये त प्रवेश केला. त्यांच्यासह आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

१ कोटींच्या नकाशाचे गूढ कायम

$
0
0
शहराच्या वाढीव हद्दीचा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी एक कोटी रुपये खर्च करून जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला आहे, पण या नकाशाचे गूढ कायमच आहे. त्यामुळे या विकास आराखड्याचे ‘झालर’ होण्याची भीती व्यक्त केली जात आहेत.

गोपीनाथ मुंडेची मनसेवर टीका

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चेहरा दाखवून मते मिळणार नाहीत, याची जाणीव मनसेला झाली असून त्यामुळे त्यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा आधार घ्यावा लागत आहे, मनसेची घसरण सुरू आहे, अशी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी केली.

मोदींना ‘पीएम’ होऊ देणार नाही

$
0
0
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए असो किंवा काँग्रेस आघाडीचे यूपीए यांच्यापैकी कोणलाही बहुमत मिळणार नाही. सत्तेच्या चाव्या बहुजन समाज पक्षाकडे असतील, असा दावा बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरूड यांनी केला आहे.

मार्च एंड सव्वासहाशे कोटींचा

$
0
0
मार्च एंड आला की, मंजूर निधी खर्च करण्यासाठी सरकारी कार्यालयांची लगीनघाई सुरू होते आणि अखेरला लेखा व कोषागार कार्यालयात बिले दाखल करण्याची घाई सुरू असते. महिना अखेर विभागात सादर होणाऱ्या बिलांची संख्या तब्बल सात हजार ५९० एवढी असून तब्बल सव्वासहाशे कोटींची ही बिले आहेत.

हीच का काँग्रेसची कारवाई?: मोदी

$
0
0
आदर्श घोटाळ्यात जेव्हा अशोक चव्हाणांचं नाव आलं तेव्हा त्यांच्यावर कारवाई होईल, असं काँग्रेसचे ‘शहजादे’ सांगत होते. मगं अशोक चव्हाणांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देणं ही काँग्रेसने त्यांच्यावर केलेली कारवाई समजायची का?, असा सवाल भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मोदींवर उपचाराची गरजः पवार

$
0
0
‘काँग्रेसमुक्‍त भारत निर्माण करण्‍याची भाषा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे डोके फिरले आहे. निवडणुका संपल्यावर त्‍यांच्‍यावर चांगल्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये आपण उपचार करू,’ असा शब्दांत त्यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

‘वायर कटिंग मशीन’ ठरला बेस्ट प्रोजेक्ट

$
0
0
शासकीय अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या तयार केलेला ‘न्यूमॅटिक वायर कटिंग मशीन’ बेस्ट प्रोजेक्ट ठरला आहे. ‘टीसीएस’कडून विद्यार्थ्यांच्या या प्रोजेक्टला बेस्ट प्रोजेक्ट म्हणून गौरविण्यात आले.

५६ लाखांची रक्कम जप्त

$
0
0
परभणी, उस्मानाबादमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी रविवारी ५६ लाख ५० हजार रुपयांची बेनामी रोकड जप्त केली.

नाष्टा २०; जेवण १०० रुपयांत

$
0
0
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून दाखवला जाणारा खर्च अत्यंत कमी असल्यामुळे प्रशासनाने निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्याचे दर जाहीर केलेत. यामध्ये नाष्टा २० तर व्हेज जेवणासाठी १०० रुपये व नॉनव्हेज जेवणासाठी १३५ रुपये खर्चाची मर्यादा घातलीय.

समाजवादी पक्षाला अद्याप उमेदवार मिळेना

$
0
0
समाजवादी पक्षाला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून अजूनही उमेदवार मिळालेला नाही. उमेदवारांच्या शोधात सध्या सपाचे नेते कामाला लागलेत.

देशात मोदींची लाट : खैरे

$
0
0
‘देशात सध्या नरेंद्र मोदींची लाट आहे. देश त्यांच्याकडे मोठया आशेने बघत आहे. देशाला आता परिवर्तन हवे. हे परिवर्तन महायुतीच देऊ शकते,’ असे प्रतिपादन खा. चंद्रकात खैरे यांनी केले. महायुतीचे उमेदवार खैरे यांच्या प्रचारार्थ आमदार रोड, संभाजी चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली.

वॉटस् अप वरील प्रचाराला तरुणाई कंटाळली

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. वॉटस् अप, फेसबुकवर विविध राजकीय पक्षांच्या पोस्टनी धुमाकूळ घातलाय. विविध ग्रुप तयार करुन प्रचार करण्यात येत आहे. मात्र, या प्रचाराला तरुणाई कंटाळली असल्याचे दिसत आहे.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी भाजप साधणार संवाद

$
0
0
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी येत्या एक ते सात एप्रिल या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोर्डे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून प्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

आचारसंहितेची आडकाठी नाही

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असली तरी वीज नियमाक आयोगांना वीज दरांमध्ये बदलांबाबतची प्रक्रिया सुरू ठेवता येईल, मात्र संबंधित राज्यातील मतदानानंतर वीज दरांबाबतचा निर्णय जाहीर करता येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

पाडव्याचा गोडवा

$
0
0
आनंदाला निमित्त शोधणारी माणसं नाहीत इथं. अन् निमित्त मिळालं तर संधीचं सोनं करणारी माणसं आहेत इथं. हिंदू नववर्षाची सुरुवात करणाऱ्या पाडव्याच्या गोडव्याने सध्या शहरातले मार्केट फुल्ल आहे. सोने, इलेक्ट्रॉनिक बाजारात तेजी आहे. प्लॅटच्या बुकींगमधली मरगळही त्यामुळे कमी झालीय.

गुढीपाडवा: पाठवा तुमचा फोटो

$
0
0
गुढीपाडवा. आपल्या सणांमधील पहिला महत्त्वाचा सण. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आपले मराठी नववर्षही गुढीपाडव्यापासूनच सुरू होते. घराघरात गुढीपाडवा अत्यंत उत्साहात साजरा होतो. सोमवारी तेवढ्याच उत्साहात शहरात गुढीपाडवा साजरा होईल. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने यंदा तुमच्या गुढीच्या फोटोंसह गुढीपाडवा साजरा करायाचे ठरवले आहे.

कृषी सल्ला केंद्र सुरू

$
0
0
शेतीमालाच्या बाजारभावातील चढ-उताराची पुरेशी माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांना किमान नफा मिळत नाही. तसेच शेतीमालाचा दर्जा राखण्याबाबत शेतकरी निरुत्साही असल्यामुळे व्यापारी भाव पाडतात.

वर्ष नवे, हर्ष नवे!

$
0
0
हिंदू नववर्षाचा पहिला महिना चैत्र. अन् नववर्षाचा पहिला मांगल्यपूर्ण दिवस म्हणजे शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा ! ब्रह्मदेवाने निर्मिती केली तो हा दिवस. प्रभू श्रीरामांचा अयोध्येस पुनरागमनाचा पवित्र दिवस म्हमजे गुढीपाडवा.

उमरगा येथे भीषण अपघात, २ ठार

$
0
0
लातूरहून गुलबर्गा येथे जाणाऱ्या एका गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात लातूरचे प्रथम न्यायदंडाधिकारी विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी अझीज तांबेळी त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उमरगा येथे उपचार सुरू आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images