Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

गारपीटग्रस्तांनी उभारली काळी गुढी

$
0
0
गारपीट, अवकाळी पावसाने उद्‍ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान जाणीवपूर्वक पन्नास टक्क्यांपेक्षा कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करून पिंप्रीराजा (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध केला.

गारपीटग्रस्तांनी उभारली पिंप्रीराजात काळी गुढी

$
0
0
गारपीट, अवकाळी पावसाने उद्‍ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान जाणीवपूर्वक पन्नास टक्क्यांपेक्षा कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करून पिंप्रीराजा (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध केला.

गारपिटीच्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करणार

$
0
0
सिल्लोड तालुक्यात आवकाळी पाऊस व गारपिटीने १३१ गावांत २४ हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याच्या अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आला. त्यानंतर हे नुकसान जास्त दाखविण्यात आले असल्याचा ठपका ठेण्यात येऊन पुन्हा पंचनामे करून अहवाल पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यत्रणेला दिले आहे.

मोफत प्रवेश न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. बालकांच्या सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळता) शाळांच्या मुख्याध्यापकांनी वंचित व दुर्बल घटकातील मुलांना पूर्व प्राथमिक किंवा इयत्ता पहिलीत २५ टक्के मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे.

वाळूपट्ट्याला परवानगी नको

$
0
0
पैठण तालुक्यातील टाकळी (अंबड) पट्ट्यातून वाळू उपसा करण्यासाठी वाढीव मुदत दिल्याने टाकळी अंबडसह जवळपासच्या दहा ते पंधरा गावांमध्ये भर उन्हाळ्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे.

बोटांचे ठसे सांगणार व्यक्तिमत्व

$
0
0
हातांच्या बोटांच्या ठशांवरून शास्त्रीय पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची चाचणी करण्याची डीएमआयटी पद्धत प्रचलित आहे. औरंगाबाद शहरात देखील या पद्धतीने परीक्षण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

शिवना ग्रामपंचायतीत बेबनाव

$
0
0
शिवना (ता. सिल्लोड) येथील ग्रामपंचयीतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांचा ठराव न घेता ग्रामसेवक व सरपंच मनमानी पद्धतीने कामे करून सदस्यांना माहिती देत नाहीत.

बस स्टॅँड गेले खड्ड्यात !

$
0
0
तब्बल गेल्या दहा महिन्यांपासून मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना खड्डयांचा त्रास सहन करावा लागतोय. हे खड्डे बुजवण्यासाठी एसटी प्रशासनाने आदेश दिले. मात्र, एसटीच्या बांधकाम विभागाने कसलीच पावले उचलले नाहीत.

नववर्षाचे मराठमोळे जंगी स्वागत

$
0
0
गुढीपाढव्या निम‌ित्त नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने सोमवारी सायंकाळी काढण्यात आलेली मिरवणूक शहरवासीयांसाठी आकर्षण ठरली.

पाडवा पावला, ६० कोटींची उलाढाल

$
0
0
हिंदू नववर्ष गुढीपाडव्याने गेल्या तीन महिन्यांपासून थंड असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला तेजी दिली. गुढीपाडव्यानिमित्त शहरातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारामध्ये सुमारे ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली.

पालिकेच्या सुवर्णजयंती योजनेत घोळ

$
0
0
पालिकेच्या सुवर्णजयंती योजनेत घोळ झाल्याचे उघडकीस आले असून काही नगरसेवकांशी लागेबांधे ठेवत दुपट्टीपेक्षा जास्त अर्ज विकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शहरात तापमानाची चाळीशी कायम

$
0
0
राज्याध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्यात. औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या प्रमाणात वाढ होत असून गेल्या तीन दिवसांपासून शहराचे तापमान ३८ अंशापर्यंत राहत आहे. शहरात शुक्रवारी तापमानाने चाळीशी ओलांडल्यानंतर सोमवारीही शहरात ४०. १६ तापमान होते. त्यामुळे उकाडा वाढला आहे.

शाळांची ‘शाळा’ सुरू

$
0
0
शहरातील नामांकीत इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केली. शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच शाळांनी प्रवेशाची सुरू केलेली ‘शाळा’ अनेक पालकांना मात्र अडचणीची ठरणार आहे.

परीक्षा संपल्यावर विद्यार्थी संसदेचे उद्घाटन

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या विद्यार्थी संसदेचे उद्घाटन चक्क परीक्षा संपल्यावर ३ एप्रिल रोजी करत आहे. शैक्षणिक वर्ष जवळपास संपले असताना औपचारिकता म्हणून हा उद्घाटनाचा खटाटोप सुरू आहे.

कर भरण्यासाठी तुफान गर्दी

$
0
0
पालिकेसाठी थर्टीफस्ट मार्च फारच धामधुमीचा व गर्दीचा राहिला. गुढीपाडव्याची सुट्टी असूनही नागरिकांनी पालिकेच्या वॉर्ड कार्यालयात कर भरण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे तळपत्या उन्हातही वॉर्ड कार्यालयाच्या बाहेर रांगा दिसून येत होत्या.

माझे गोकूळ गवसले !

$
0
0
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर प्रत्येकाला स्थलांतर करणे अपरिहार्य असते. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, निवृत्तीनंतर आवडत्या गावी, शहरी जाण्यासाठी. स्थलांतर हा जीवनाचा स्थायी भाव होतो.

तिची ताकद, तिची शक्ती

$
0
0
तिनं काकोबा आणि बोकोबांचा हल्ला मोठा हिमंतीनं परतावून लावला. लढली, झुंजली. घर वाचवलं तिनं. तिच्या ताकदीनं शत्रू तर पळाला. सोबतच घरातल्या कर्त्यालाही तिची हिंमत आणि किंमत कळाली. तिची ताकद आणि शक्ती कळाली.

रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये २० बेवारस गाड्या पडून

$
0
0
रेल्वेस्टेशन पार्किंगमध्ये विविध कंपनीच्या २० बेवारस गाड्या पडून आहेत. या गाड्यांच्या मालकांनी येथे गाड्या लावल्या. पण त्या घेण्यासाठी ते आलेच नाहीत. अशाच मालकांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

गडाख यांना हवी विखेंची ‘कमिटमेंट’

$
0
0
आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा नेवासे तालुक्यातील प्रचार गडाख-विखे गटाकडून स्वतंत्रपणे सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विखे यांनी हस्तक्षेप न करण्याची ‘कमिटमेंट’ गडाख यांना हवी असल्याचे बोलले जात आहे.

फुगा, पाव, शिट्टी आणि टोपी

$
0
0
‘ताई, माई, आक्का. विचार करा पक्का. अन् शिट्टीवर मारा शिक्का.’ किंवा ‘मी आमुक-तमुक. अपक्ष उमेदवार. माझं निवडणूक चिन्ह आहे टोपी. कृपया टोपीचं बटण दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा,’ असा प्रचार कुणी केलाच तर हासू नका.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images