Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पोलिसांनाही इलेक्शनचे टेन्शन

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दल सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांना प्रशिक्षणापासून समाजकंटकावर कडक कारवाई आदीचा समावेश असल्याची माहिती आयुक्त राजेंद्रसिंह यांनी दिली.

गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

$
0
0
परतूर तालुक्यातील आंबा गावाच्या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या निषेधार्थ लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आंबा हे परभणी लोकसभा मतदार संघात येते.

गारपिटग्रस्तांसाठी सरकार निष्क्रिय

$
0
0
राज्यात गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे ‘न भूतो’ असे नुकसान झाले आहे. राज्य व केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत म्हणजे शासनाने शेतकऱ्यांची चालविलेली क्रूर चेष्टा असल्याचा आरोप भाजपचे पाशा पटेल यांनी केला आहे.

भाजपच्या वल्गनांना बळी पडू नका

$
0
0
गुजरातमध्ये हुकुमशाही करणाऱ्या भाजपच्या खोट्या वल्गनांना बळी न पडता विकासाची जाण असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

देश तोडण्याचे काम मोदींनी केले

$
0
0
‘गुजरातपेक्षा सर्वार्थाने विकसित व विस्ताराने मोठे असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याचा मुख्यमंत्री राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत सामान्य जनतेचे कामे करण्यावर आमचा भर होता.

महिनाभरात ५५ आत्महत्या

$
0
0
मराठवाड्यामध्ये २२ फेब्रुवारी ते २७ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या कालावधीत ५५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचा आकडा प्रशासनाकडे असून चौकशीअंती केवळ १४ शेतकऱ्यांच्या वारसांना प्रशासनाने मदतीचा हात दिला आहे.

सिलिंडरवरील एलबीटीवरून बेबनाव

$
0
0
गॅस सिलिंडरवरचा स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनाने अद्याप महाराष्ट्र शासनाकडे पाठवला नाही. याबाबतचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता.

‘तप्तपदी’वर थंडाव्याची ‘मात्रा’

$
0
0
उन्हाळ्याची चाहूल लागताच औरंगाबाद शहरातील पाच-सहा जलतरण तलावांवर येणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रणरणत्या उन्हात शरीराला गारवा देण्यासह सुदृढतेसाठीही स्विमिंग आवश्यक आहे. यामुळे तरुण तरुणींसह प्रौढांकडूनही स्वि‌मिंगला पसंती दिली जात आहे.

याद पिया की आयीऽऽऽ..

$
0
0
‘याद पिया की आए...’ ह्या ठुमरीला वेगवेगळ्या अंगाने ऐकवून रघुनंदन पणशीकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते नेवपूरकर फाउंडेशनच्या स्वराध्यास आर्ट सर्कलच्या मैफलीचे.

एप्रिल फूल डब्बा गुल!

$
0
0
सकाळी साखर झोपेत असताना अचानक मोबाइल वाजला आणि, ‘कॉलेजमध्ये विद्यापीठाचे पेपर चक्क मैदानात घेतले जाताहेत’, अशी माहिती मित्राकडून समजली आणि एक तरुण धावतपळत महाविद्यालयात पोहोचला.

कॉलेज‌िअन्सचं मिशन ‘सबमिशन’जोरात

$
0
0
मार्च एंड किंवा एप्र‌िल महिना आला आणि कॉलेजियन्सला चांगलाच घाम फुटतो. हा घाम काही कडक उन्हामुळे नाही तर सबमिशनच्या टेन्शनमुळे. वर्षभर कॉलेज लाईफचा मनमुराद आनंद घेत लेक्चर्स बंक करणाऱ्यांना घाम गाळायला लावणारं सबमिशन आता सुरू झालं आहे.

नक्षीदार सुरई - तोटीच्या माठांचे आकर्षण

$
0
0
औरंगाबाद शहराचे तापमान गेल्या आठ ‌दिवसांपासून ३८ ते ३९ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठांची व लहान आकारातील सुरईची मागणी वाढली आहे.

विक्रांत वायकोस यांना ‘कलारत्न’

$
0
0
हैद्राबाद आदर्श पॅलेसच्या वतीने देण्यात येणाऱ्या कलारत्न पुरस्कारासाठी कलाश्री अकादमीचे संचालक नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांची निवड करण्यात आली आहे. भारतातील ज्या व्यक्ती कला व सांस्कृतिक क्षेत्रात बहुमूल्य कार्य करतात अशा कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो.

भूखंड माफियांच्या टोळीत काँग्रेसचा माजी शहराध्यक्ष?

$
0
0
डॉ. अजिज कादरी यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या भूखंड माफियांच्या टोळीतील एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीत भूखंड माफियांच्या टोळीत काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाचा समावेश असल्याची माहिती उघड झाली आहे.

निवडणूक मार्गदर्शक पुस्तिका

$
0
0
लोकसभा निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापू लागलेले असतानाच दुसरीकडे कायदा व सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे.

जाधव पुन्हा कॉँग्रेसमध्ये

$
0
0
उमेदवारीची माळ गळ्यात पडताच ‘मी कधीही बहुजन समाज पक्ष सोडणार नाही,’ अशी ग्वाही देणारे उद्योजक जे. के. जाधव पदाच्या अपेक्षेने अवघ्या चार दिवसात पुन्हा कॉँग्रेसमध्ये आलेत. त्यामुळे बसपला दुसरा उमेदवार शोधण्याची पाळी आलीय.

मनसेचे इंजिन नेमके कुणामागे?

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता संपल्यातच जमाय. तरी देखील अद्याप इच्छुक उमेदवार काहीही घडू शकते या आशेवर कृष्णकुंजकडे डोळे लावून बसलेत.

प्रचाराची ‘पातळी’ सोडली

$
0
0
हातात मोबाईलचे लेटेस्ट व्हर्जन, त्यावर वॉटस् अप, फेसबुक, ट्विटर अशी अत्याधुनिक आयुधे असली म्हणजे माणूस प्रगत होतो असे नव्हे. तो प्रगत आहे असेही नव्हे. त्याच्यातले माकडपण कधीतरी उघड होतेच. निवडणुकीत नेमके तेच झालेय.

चंद्रकांत खैरे नऊ कोटींचे धनी

$
0
0
औरंगाबादचे खासदार व महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडे सुमारे नऊ कोटी ६१ लाख रुपयांची मालमत्ता आहे. खैरे यांच्या पत्नीच्या नावावर बिडकीन येथे १५ एकर जमीन आहे.

पोळीला बसणार महागाईचे चटके

$
0
0
गेल्या रब्बी हंगामात पाणी टंचाईचा तर, यंदा गारपिटीचा फटका गव्हाच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे परराज्यातील गव्हावर अवलंबून राहावे लागणार आहे. गव्हाचे यंदा चांगले उत्पादन होईल, असे चिन्ह होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images