Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अन्यथा अपक्ष म्हणून लढेन !

$
0
0
पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या उत्तमसिंह पवारांनी आता थेट कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींना इशारा दिलाय. उमेदवारी न दिल्यास ५ एप्रिलला लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करू, असे सडेतोड बोल त्यांनी सुनावलेत.

साहेबांच्या भाऊबंदकीत शिलेदारांची उडी

$
0
0
उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर ‘पाठित खंजीर खुपसला’ असा आरोप केला. तेव्हा ‘बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्या खाण्याची आबाळ झाली. दोन तळलेले वडे त्यांच्यासमोर यायचे.

लातूरमध्ये सभा, मिरवणुकींवर भर

$
0
0
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच निवडणूक प्रचाराचा वेग ही वाढत आहे. काँग्रेसच्यावतीने आमदार अमित देशमुख हे जिल्हा पिंजून काढत आहेत. पक्षाच्या उमेदवारासाठी ठिकठिकाणी सभा घेत आहेत.

भेदभाव विसरून कार्यकर्त्यांनी लागावे

$
0
0
आमची लढाई ही गरीब आणि श्रीमंत अशी आहे, काँग्रेसचे उमेदवार ज्या कळमनुरी तालुक्याचे आहेत. त्यांच्याच मतदार संघात शिवसेनेचे दहा जिल्हा परिषद सदस्य आहेत. खुद्द त्यांच्याच जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती ही शिवसेनेची आहे.

दानवे साडेअठरा कोटींचे मालक

$
0
0
महायुतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे १८ कोटी ४४ लाख रुपयांची संपत्ती आहे. सलग दहा वर्ष आमदार व पंधरा वर्षापासून ते खासदार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या शपथपत्रात त्यांनी ही माहिती दिली.

‘आप’चा उमेदवार ‘आम आदमी’च

$
0
0
कोणताही मोठा गाजावाजा नाही, ढोल ताशे नाहीत की डीजे नाही, अत्यंत शांततेत साधेपणाने मिरवणूक काढून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष लोमटे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला.

दात्यांच्या वारसांची फिरली नियत

$
0
0
एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये म्हणतात. हे राहिलं दूरच. आता तर, चक्क शाळा आणि आरोग्य केंद्राला दान दिलेल्या जागा परत मिळवण्यासाठी, जागा मालकांच्या वारसांनी कंबर कसलीय.

प्रधान सचिवांविरोधात याचिका

$
0
0
समांतर जलवाहिनीवाल्यांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात नगरविकास खात्याचे प्रधान सचिव श्रीकांतसिंह यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करताना महापालिकेलाही त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे.

करवसुली; पण किती?

$
0
0
‘कर वसूल झाला, कुणी नाही पाहिला’ असे म्हणण्याची वेळ महापालिकेचा एकूणच कारभार पाहता आली आहे. मालमत्ता कर किती वसूल झाला, याची माहिती कुणाकडेच अधिकृतपणे नाही.

दर्डांना गेटवर अडवले

$
0
0
काँग्रेस उमेदवार नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना आचार संहितेचा फटका बसला. मुख्य प्रवेशद्वारावरच दर्डांना पोलिसांनी अडवून धरले. नितीन पाटील यांना गेटवर जाऊन मध्यस्थी करावी लागली.

निलंगेकर, देशमुख यांच्या अस्तित्वाची लढाई

$
0
0
लातूर मतदारसंघातील प्रचाराचा पहिला टप्पा संपत आला आहे. या मतदार संघात १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खरी लढत ही दुरंगी असली तरी आम आदमी पार्टीचे दीपरत्न निलंगेकर आणि बसपाचे दीपक अरविंद कांबळे यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दोघांकडे ही त्यांचे ठराविक मतदार आहेत.

विकासासाठी काँग्रेसकडे सत्ता द्या

$
0
0
गेल्या १५ वर्षांपासून चंद्रकांत खैरे खासदार आहेत. या काळात शहराचा विकास खुंटला आहे. या शहराला परत आशिया खंडातील वेगाने वाढणारे शहर म्हणून ख्याती मिळवून द्यायची असेल व शहराचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन नितीन पाटील यांनी केले.

उत्तमसिंह पवारांची तलवार म्यान

$
0
0
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवारी नितीन पाटील यांना जाहीर होताच माजी खासदार उत्तमसिंह पवार यांनी बंडाचा झेंडा हातात उचलला होता. मात्र, निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटीच्या तारखेपूर्वी पक्षश्रेष्ठींनी त्यांना आमदारकीचे आश्वासन दिले. त्यानंतर पवार यांनी बंडांची तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोनशे मतदान केंद्रावर विशेष लक्ष

$
0
0
बीड लोकसभा मतदार संघात ३९ मतदान केंद्र हे अतिसंवेदनशिल म्हणून प्रशासनाने घोषित केली आहेत. याखेरीज १४० संवेदन शील आणि १९ जोखमीची केंद्र असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. या जवळपास जिल्ह्यातील दोनशे मतदान केंद्रावर निवडणूक विभागाचे वेब कास्टिंग आणि सिसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून विशेष लक्ष राहणार आहे.

सामान्यांची वाट लावणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवा

$
0
0
वर्षानुवर्षे सत्ता भोगून शेतकरी व सामान्य माणसाची वाट लावणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत धडा शिकवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर विराजमान करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार डी. बी. पाटील यांनी केले. भोकर तालुक्यातील भोसी, बेंबर, हाडोळी, वागद, खरबी, रिठा, कामनगाव, मोघाळी, हाळदा येथील प्रचार बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

महावितरण कर्मचा-याच्या आत्महत्येबद्दल चौकशी

$
0
0
मुंबई येथे महावितरणच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसस्टँड समोरील एका लॉजमध्ये पाच दिवसापूर्वी आत्महत्या करण्यात आली होती. नोकरी मिळवून देण्यासाठी घेतलेले पैसे परत देण्याच्या तगाद्यानंतर या कर्मचाऱ्याने आमत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

बनावट नोटांची जबाबदारी बँकेची

$
0
0
कराच्या रुपाने वॉर्ड कार्यालयात जमा झालेल्या बनावट नोटांची जबाबदारी बँकेवर टाकत पालिका हात झटकण्याच्या तयारीत आहे. वॉर्ड कार्यालयात जमा झालेली रक्कम रोजच्या रोज बँकेचे कर्मचारी घेऊन जातात. त्यामुळे त्या बनावट नोटा पालिकेच्या वॉर्ड कार्यालयातच जमा झाल्या असे म्हणता येणार नाही, असे लेखाविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चोरांचा स्केचच्या आधारे शोध

$
0
0
गेल्या आठवड्यात शहरातून पळविण्यात आलेल्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांनी मंगळसूत्र चोराचे स्केच तयार केले आहे. या स्केचच्या प्रती विविध ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आल्याअसून त्या आधारे शोध घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहे.

लग्नात नाचण्यावरुन एकाचा खून

$
0
0
दुपारचे लग्न त्यात उन्हाचा कहर. वऱ्हाडी मंडळी आली. नवरेदेव सजविला. लग्न लावण्याची घाई.आवरा सावर सुरु झाली. नवरदेवाचे मित्र नाचण्यात दंग होते. लग्न लावण्यास होत असलेल्या विलंबातून वाद झाला व वादेच रुपांतर चाकू हल्यात. वाळूजजवळील जोगेश्वरी येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता झालेल्या या घटनेत एका तरूणाचा भर मांडवात मृत्यू झाला आहे.

मनसेचे दोन पदाधिकारी गजाआड

$
0
0
सिडको पोलिसांनी अवैध दारूचा साठा नेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून साडेतीन हजाराची दारू व जीप जप्त केली. पकडलेल्या आरोपीमध्ये मनसेच्या जिल्हा उपाध्यक्षाचा तसेच फुलंब्री शहराध्यक्षाचा समावेश आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images