Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अतिक्रमणावर बुलडोजर

$
0
0
रस्ता रुंदीकरण आणि व्हाइट टॉपिंगच्या कामात अडसर ठरणारी समर्थनगर रस्त्यावरील सुमारे अठरा अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या पथकाने हटवली. त्यामुळे आता रुंदीकरणाचा व व्हाईट टॉपिंगचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुलाने चार वाहने उडविली

$
0
0
श्रीमंत घरातील अल्पवयीन मुलाचा कार चालविण्याचा शौक इतराच्या जीवांवर उठला. भरधाव कार चालवून युवकाने, शनिवारी सकाळी रोपळेकर चौकात, चार वाहनांना उडविले. यात एका महिलेसह तिघे जखमी झाले आहेत.

चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

$
0
0
जिल्ह्यात गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी रब्बी हंगामात जवळपास आठ लाख मेट्रीक टन चारा उत्पादन होते. यंदा चारा अक्षरशः सडल्यामुळे जनावरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

रस्त्याचे काम मजुरांच्या भरवशावर

$
0
0
समर्थनगरमधील रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगचे काम निव्वळ ठेकेदाराच्या मजुरांच्या भरवशावर सुरू आहे. ठेकेदाराने अधिकारी तर कामाच्या ठिकाणी दिसतच नाहीत, पण पालिकेचे अधिकारीही कामाच्या दर्जावर विशेष लक्ष ठेवत नाहीत.

५३ लाखांची रोकड केली जप्त

$
0
0
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ‌औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार ३४२ जणांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पथकाने विविध सोळा ठिकाणी केलेल्या कारवाईत ५३ लाख ६२ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.

सेनेची प्रचार यंत्रणा ढेपाळली

$
0
0
औरंगाबादेतील शिवसेनेची प्रचार यंत्रणा ढेपाळल्यामुळे संपर्क प्रमुखांनी थेट मुंबईहून शनिवारी शहरात यावे लागले. त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे काम उपटले. नगरसेवक व शाखाप्रमुखांना त्यांनी प्रचाराची यंत्रणा आखून दिली. या यंत्रणेच्या बाहेर पडू नका असे त्यांनी बजावले.

हवा विकासाचा ध्यास...

$
0
0
आमच्या मतदारसंघाच्या खासदाराला शहर, जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास हवा. शैक्षणिक, औद्योगिक, व्यावसायिक विकासाबरोबरच शहर परिसरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या खासदाराने कसोशिने प्रयत्न करायला पाहिजेत.

दहशतवादावर परखड ‘नाट्यमय’ भाष्य

$
0
0
कायद्याचा रोखठोकपणा अंमलात येत नसल्यामुळे देशात दहशतवादी कारवाया घडत आहेत. कठोर शिक्षा दिल्यास दहशतवादाला आळा बसेल, असे रोखठोक भाष्य करणाऱ्या ‘दबंग’ नाटकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३९व्या नाट्य महोत्सवाला शनिवारी सुरुवात झाली.

औरंगाबादचा पारा ४१ अंशांवर

$
0
0
औरंगाबादकरांना गेल्या तीन-चार दिवसांपासून कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. तापमानाचा पारा सातत्याने ४० अंशांवर पोचत होता. तापमानाने शनिवारी उच्चांक गाठला.

शांतीगिरी महाराजांच्या भूमिकेकडे लक्ष

$
0
0
औरंगाबाद आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रभाव असलेले शांतीगिरी महाराज लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे व काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यात लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

नवे मतदार ठरणार निर्णायक

$
0
0
मतदारसंख्येची लोकसंख्येसोबत सांगड घालून निवडणूक आयोगाने यंदा मतदार नोंदणीवर जाणीवपूर्वक भर दिला. या मोहिमेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तब्बल ५६५६७ नवे मतदार नोंदविण्यात आले.

सात हजार मतदान यंत्रांची गरज

$
0
0
बीडच्या लोकसभेच्या रणांगणात ३९ उमेदवार राहिले आहेत. त्यामुळे प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एवढे उमेदवार निवडणूक लढवत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रात तीन बॅलेट युनिट लागत आहेत.

मोदींचे ‘विकास मॉडेल’ बकवास

$
0
0
नरेंद्र मोदीचे विकास मॉडेल बकवास आहे. गांधी घराण्याचे राष्ट्रीय एकात्मतेसाठी मोठे योगदान असून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची काही मंडळी भ्रष्टाचारी आहेत, अशी टीका राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देगलूरच्या जाहीर सभेत बोलतांना केली.

'गिरी खूनाची सीबीआय चौकशी करा'

$
0
0
लातूर शहर युवक काँग्रेसची पदाधिकारी असलेल्या कल्पना गिरी यांचा मृत्यू हा गुढ पद्धतीने झाला आहे. त्याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. यामधील गुन्हेगाराना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी भाजपाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी लातूरात पत्रकार परिषदेत केली.

२१ उमेदवारांचे ३६ अर्ज

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी औरंगाबाद मतदारसंघामध्ये २१ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर एकूण ४५ उमेदवारांचे ६७ अर्ज दाखल करण्यात आले आहे, ७ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.

उन्हामुळे दिवसाच्या प्रचारात अडचण

$
0
0
गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात तापत चाललेल्या उन्हामुळे दिवसभर ‘शुकशुकाट’, तर रात्री मात्र प्रचाराचा ‘कडकडाट’ असे सध्याचे चित्र आहे.

प्रश्नपत्रिका हाताळणी होणार कमी

$
0
0
पॉलिटेक्निक पेपरफुटीनंतर आता राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांच्या हाताळणीची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्नपत्रिकांच्या लिफाफ्यांचा प्रवास अनेकांच्या हातांमधून होणार नाही.

अल्पवयीन मुलाने चार वाहने उडविली

$
0
0
श्रीमंत घरातील अल्पवयीन मुलाचा कार चालविण्याचा शौक इतराच्या जीवांवर उठला. भरधाव कार चालवून युवकाने, शनिवारी सकाळी रोपळेकर चौकात, चार वाहनांना उडविले.

हैं...तय्यार हम !

$
0
0
औरंगाबादेत शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपत आल्या आहेत. काही शाळांच्या परीक्षा संपल्या आहेत. यामुळे एप्रिल महिन्यात मुलांना सध्या समर क्लासेसचे वेध लागले आहेत. शहरात यंदा विविध संस्थांतर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिब‌िरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्वासाठी गायत्री महामंत्र जप

$
0
0
समाजाला अनिष्ट विचारांपासून दूर घेऊन जाणे आणि मानवाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अखिल विश्व गायत्री परिवाराद्वारे विश्वव्यापी आध्यात्मिक अनुष्ठान आयोजित केले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images