Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

भावनांचं व्यवस्थेविरुद्ध प्रभावी बंड

$
0
0
पोलिस सेवेत एकदा नोकरी मिळाली की, घरदार विसरुन केवळ ‘ड्यूटी’च करावी लागते, हे प्रत्येक पोलिस कर्म-याला माहित असतं, पण त्याच्या भावभावना असतात. अनेकदा भावनांना मुरड घालून ते ही ड्यूटी चोखपणे पार पाडतातच, पण एखादी वेळ अशीही येते की, जेव्हा भावनांचा बांध फुटतो आणि त्याच्या हातून अतिरेकी कृत्य घडून जातं.

आली अंगणी चैत्र गौराई....

$
0
0
भीमाशंकर कॉलनीतील शैलजा मुंशी यांनी ब्राह्मण महिलांच्या एकत्र‌िकरणाच्या उद्देशाने ‘ब्राह्मण महिला मंच’ची स्थापना केली असून याचा शुभारंग नुकताच करण्यात आला.

कॉलेजांच्या ‘रझाकारी’चा विद्यार्थ्यांना फटका

$
0
0
परीक्षेतील नियमांच्या नावाखाली औरंगाबादच्या कॉलेजांनी रविवारी झालेल्या ‘जेईई मेन’ परीक्षार्थींना रझाकारीचा प्रत्यय दिला. केवळ पाच ते दहा मिनिटे उशीर झाल्याचे सांगत विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्यास भाग पाडले. कॉलेजांच्या प्रतापामुळे अनेक परीक्षार्थींच्या डोळ्यातून अश्रू तरळले. एमपी लॉ कॉलेज परीक्षा केंद्रावर तर एका संतापलेल्या विद्यार्थ्याने चक्क हॉलतिकिटच फाडले.

विकासकामांच्या आधारेच मताचा जोगवा

$
0
0
‘काँग्रेसप्रणित आघाडी सरकारच देशाची प्रगती सरू शकतो, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिलांना न्याय व दिलासा देण्याचे कामही हेच शासन करू शकते,’ असा ठाम विश्वास देशातील जनतेला असल्यामुळेच विविध विकासकामांच्या जोरावरच आम्ही जनतेपुढे मतांचा जोगवा मागतो आणि जनताही आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मतदान करून विजयी करते,’ असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी केले.

विकास करणारा नेता काँग्रेसला नको

$
0
0
‘काँग्रेस पक्षामधील स्थानिक नेत्यांची चौकडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना औरंगाबादचा विकास करणारा काँग्रेस उमेदवार नको आहे. यामुळे त्यांनी पक्षातील लोकांना डावलून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात गेलेल्या उमेदवाराला जाणीवपूर्वक तिकीट दिले आहे. मराठा जातीच्या नावावरून दिलेल्या या उमेदवारांनी स्थानिक मराठा शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे,’ असा आरोप समाजवादी पक्षाचे उमेदवार सदाशिव गायके यांनी केले.

प्रशिक्षणाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांचे मतदान

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदार संघांतर्गत असलेल्या मतदारांना इडीसीद्वारे (निवडणूक नेमणूक प्रमाणपत्र) त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणीच मतदान यंत्रावर मतदान करता येणार आहे.

उमेदवारवाढीमुळे प्रशासनाची होणार धावपळ

$
0
0
बीड आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंधामध्ये उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे औरंगाबाद मतदारसंघातील मतदान यंत्रे बीडला पाठवावे लागले. यामुळे आता बीडचे मतदान झाल्यानंतर ही यंत्रे परत आणावी लागणार आहेत. त्यानंतर ही यंत्रे कम्प्युटरच्या माध्यमातून तयार करण्यामध्ये प्रशानाची धावपळ उडणार आहे.

मतदार ओळखपत्रांचे १५ एप्रिलपासून वाटप

$
0
0
जिल्ह्यात मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे मतदारसंघामध्ये सुमारे ५६ हजार, तर जिल्ह्यामध्ये सुमारे ६५ हजार नवीन मतदारांचीनोंदणी झाली. या मतदारांना आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने १५ एप्रिलपासून मतदार ओळाखपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

पिक्चर चलेंगे, नही ‘मतदान’ करेंगे

$
0
0
निवडणूक आयोगाने यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदार जागृती करण्याचे ठरविले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा किमान १० ते १५ टक्के मतदान वाढावे, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

विलास औताडे यांची संपत्ती साडेपंधरा कोटींची

$
0
0
जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्याजवळ १५ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे.

वाटमारी करणारे तिघे जेरबंद

$
0
0
जळगाव बायपासवर तरुणांना अडवून दुचाकी व पाच हजार रुपये पळविणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कुंभेफळ येथून अटक केली. हा प्रकार २४ फेब्रुवारी रोजी केंब्रीज स्कूलजवळ घडला होता. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ज्वेलर्सची दुकाने फोडणाऱ्या आरोपीला १६ वर्षाने अटक

$
0
0
सिडको परिसरात ज्वेलर्सची दुकाने फोडणाऱ्या टोळीतील विष्णू पुंजाराम मुळे (वय ५०) या फरार आरोपीला तब्बल १६ वर्षानंतर पकडण्यात आले आहे. याच टोळीतील सिडको पोलिस ठाण्यातील स्वछतागृहाचे गज वाकवून पळालेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

साधा तापही असू शकतो मलेरिया

$
0
0
ताप आला की सर्वांना भीती असते ती मलेरियाची. कधी कधी ते खरेही असते. साधा तापही मलेरिया असण्याची शक्यता असते. मराठवाड्यात प्रामुख्याने फ्लॅसमॉडियम व्हायव्हॅक आणि फॅलिपॅरम अशा दोन प्रकारच्या मलेरियाचे रुग्ण आढळतात.

समर्थनगरातले क्रीडांगण बळकाविण्याचा प्रयत्न

$
0
0
समर्थनगरातील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेली पालिकेची जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. जागा मालकाने पालिकेचे अधिकारी व भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्या संगनमताने जागा हडपण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप केला जात आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित लोडशेडिंग

$
0
0
देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली जीटीएलतर्फे अघोषित लोडशेडिंग केली जात असल्यामुळे जवाहरकॉलनी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणारे उन्ह आणि तीन-तीन, चार-चार तास खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट होण्याची चिन्हे आहेत.

मराठवाडा एक्स्प्रेसचा ‘एसी कोच’ गायब!

$
0
0
मनमाडहून नांदेड मार्गे धर्माबादला जाणारी मराठवाडा एक्स्प्रेसला असलेला जादा एसी कोच रेल्वेसोबत आला नाही. यामुळे बुकिंग केलेल्या प्रवाशांचे हाल झाले. एसी डब्बा न आल्याने तीस ते चाळीस प्रवाशांचे पैसे रेल्वेने परत केले.

सतरा वर्षांच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

$
0
0
एका सतरा वर्षाच्या तरुणाने रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्या हा मुलगा असून या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गारपीटग्रस्तांसाठी आले दोन कोटी १९ लाख रुपये

$
0
0
तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यातील सात कोटी ३६ लाख रुपयांपैकी दोन कोटी १९ लाख रुपये प्राप्त झाले असून ते शेतकऱ्यांच्या बँके खात्यावर तत्काळ जमा केले जात आहेत. येत्या काही दिवसात उर्वरित पाच कोटी १७ लाख रूपये मिळणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली.

तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्याला लाचप्रकरणी हायकोर्टाची नोटीस

$
0
0
तत्कालीन उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे यांनी लाच मागितल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती व लाचलुचपत विभागाने त्यांना लाच स्वीकारताना पकडले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊनही कारवाई न होता डीएमआयसी प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

निवडणुकीच्या वाऱ्यानंतरच पर्यटनाची झुळुक

$
0
0
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सिमला, कुलू, मनाली, काश्मीर शहरातल्या पर्यटकांना खुणावतो. मात्र, यंदा निवडणुकीचा हंगाम असल्याने उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्यांनी त्यात बदल केलाय. आधी मतदानाचा हक्क आणि नंतरच पर्यटन असे नियोजन बहुतांश जणांनी केलेय. त्यामुळे पर्यटनातली धमाल निवडणुकीनंतर सुरू होणाराय.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images