Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

परवानगी घेऊन भंडारा केला का?

0
0
मावसाळा येथील हनुमान मंदिरात शुक्रवारी झालेल्या भंडाऱ्याची सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सोमीनाथ गोरे यांना ७ एप्रिल रोजी समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याची नोटीस बजावली आहे. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची भंडाऱ्यात महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी झाली होती.

डेंगीचे आव्हान आजही कायम

0
0
मागच्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक झपाट्याने वाढलेल्या आजारांमध्ये डेंगीचा समावेश होतो. विशे्षतः जून-जुलै ते ऑक्टोबर-नोव्हेंबर हा काळ डेंगीचा समजण्यात येतो. मात्र अलीकडच्या दोन ते तीन वर्षांमध्ये फेब्रुवारी-मार्चपर्यंतही डेंगीचे रुग्ण दिसून येत आहे.

मराठवाड्यात आकड्या मुक्कामी

0
0
सात दिवस प्रचंड ताप, अचानकपणे हात पाय आखडणे या त्रासामुळे मराठवाडा नऊ वर्षांपासून हैराण झाला होता. वैद्यकीय भाषेत या आजाराला चिकनगुण्या म्हणतात. पण हात पाय आखडणे व सांधेदुखीमुळे त्याला आकड्या हे नाव पडले. नऊ वर्षे उलटून गेली तरी आकड्याचा मुक्काम मराठवाड्यातून हललेला नाही.

झेरॉक्सने छळले; पालक अवघडले

0
0
‘जेईई मेन’ परीक्षेत रविवारी शहरातील विविध परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रवेशपत्र व बारावी हॉल तिकीटची फोटोकॉपी विद्यार्थ्यांना ऐनवेळी मागण्यात आली. त्यामुळे फोटोकॉपी नसलेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ उडाली.

काँग्रेस उमेदवाराचा मी आजोबा

0
0
जालना जिल्ह्याच्या राजकारणात आपण गेल्या ३५ वर्षांपासून काम करत आहोत. ग्राम पंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या २२ निवडणुका लढवल्या आणि त्यापैकी २१ जिंकल्या आहेत आणि याच अर्थाने बघितल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचे आपण आजोबा आहोत, असे प्रत्युत्तर खासदार रावसाहेब दानवे यांनी दिले.

मनसेचा मराठवाड्यात चकवा

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना औरंगाबाद मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहिल्याने राजकीय वर्तुळातल्या भल्याभल्यांना चकवा बसलाय. त्याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

कवितेचा प्रांत बहरतोय

0
0
कविता फावल्या वेळेत लिहायचा प्रकार, कविता लिहिणे रिकाम्या आणि हौशी लोकांचे काम या हेटाळणीयुक्त नजरेतून नवोदित कवीकडे अनेकजण पाहतात. हा समज मोडीत काढत शहरातील नवोदित कवींनी थेट राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत साहित्य क्षेत्रात उत्साह निर्माण केलाय.

हर्सूल तलावात चार मुले बुडाली

0
0
दहावीच्या परीक्षेचा शीण घालविण्यासाठी हर्सूल तलावात पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा सोमवारी (७ एप्रिल) पाण्यात बुडून मृत्यू झाला. सय्यद जुनेद कादरी सय्यद फैजोद्दिन कादरी - जहागीरदार (वय १५), सय्यद जबियोद्दिन कादरी सय्यद युसूफ कादरी- जहागीरदार (वय १६, दोघे रा. बुढीलेन) व ओसामा जमिरोद्दिन शेख (वय १७, रा. रोहिला गल्ली) यांचे मृतदेह तलावातून काढण्यात आले.

धनंजय मुंडेंसह १७जणांना अटकपूर्व जामीन

0
0
परळी येथील संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणी कर्ज प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आमदार धनंजय मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांच्यासह १७ संचालकांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने १६ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

...म्हणून आले महागले!

0
0
बहुगुणी अद्रक औषधीसाठीही वापरतात. त्यामुळं त्याला नेहमीच मोठी मागणी असते. सध्या दर्जेदार आद्रक ७० ते ८० रुपये प्रति किलो दरानं मिळतय. दिल्ली, यूपीसह गुजरात मधूनतून औरंगाबादच्या आद्रकाला मागणी वाढलीय.

हाउस ऑफ बांबू

0
0
वन्यजीव संरक्षक विभागाने निसर्ग पर्यटनासाठी ‘जंगल हट’ हा अभिनव उपक्रम पूरणवाडीत सुरू केला आहे. डोंगराच्या माथ्यावरील बांबू हटमधून सीता खोरी धबधबा आणि दरीतील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याची अपूर्व संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. लवकरच ‘बांबू हट’ची संख्या वाढवून गौताळा अभयारण्याला निसर्ग पर्यटनाला नवा आयाम दिला जाणार आहे.

'त्यांना' आवरणार कसे?

0
0
हर्सूल तलावामध्ये दररोज पोहण्यासाठी दीडशेच्यावर तरुण येतात. या दहा किलोमीटरच्या परिघात असलेल्या तलावाच्या सुरक्षिततेसाठी दोनच सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. पोहणाऱ्यांना आवरण्यास गेल्यास सुरक्षारक्षकांनाच मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना आवरावे कसे? हा प्रश्न आहे.

जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई

0
0
जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाईमुळे ५० गावांचा घसा कोरडा पडला आहे. त्यामुळे ३२ टॅँकर सुरू करण्यात आलेत. त्यासाठी ७२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून पैठण ६ व गंगापूर तालुक्यात एक टॅँकर सुरू आहे.

गारपीटग्रस्तांसाठी २९० कोटी

0
0
गारपीटग्रस्तांसाठी सरकारने जाहीर केलेल्या निधीपैकी २९० कोटी रुपयांचा दुसरा टप्पा विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. यापुर्वी २२० कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाला होता. आता हा दुसरा टप्पा मिळाल्याने मराठवाड्यासाठी आवश्यक असलेल्या ९९४ कोटीं रुपयांपैकी ५१० कोटी रुपये मदत मिळाली आहे.

जेलमधून बाहेर पडताच घरफोड्या

0
0
गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील बापू केशव बनसोडे या अट्टल गुन्हेगाराला शनिवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून दीड लाख रूपयांचे चोरीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. लोणावळा येथे खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटलेल्या या आरोपीने कारागृहातून बाहेर पडताच शहरात येऊन पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली होती.

सर्जनशीलतेला वाव?

0
0
सोशल मीडियाच्या जंजाळात शहरी तरुणाई हरवून गेलीय. संपर्काचे सहजसोपे माध्यम सोशल मीडियात दररोज नवनवीन बदल होतात. विनोद, कविता, चुटकूले, व्यंगचित्र, घटनांवरील तात्कालिक प्रतिक्रियांवरुन काहीजणांच्या प्रतिभेकडे लक्ष वेधले जाते.

नियतीच्या खेळात सामान्यांची सरशी

0
0
राजकारण ही अत्यंत अवघड अशी बाब. साध्यासुध्या, सरळमार्गी माणसाला जमणारी ती बाब नव्हे. धोरणी, बेरकी, सतत पुढे जाण्याची इर्षा, दुसऱ्यावर मात करण्याचे सारखे मनसुबे, प्रसंगी लांड्यालबाड्या, कुरघोडी, दुसऱ्याला अडचणीत आणून सत्तेवरून खेचायचे, अशा गोष्टी सर्वसामान्यांना जमत नाहीत.

‌सियावर रामचंद्र की जय...

0
0
जय श्रीराम जय श्रीराम या गजरात शहरातील विविध राममंदिरात मंगळवारी श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजता जन्मोत्सव सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

तरुणांचे ‘हाय-टेक’ ‘निर्माण’

0
0
अभियंत्यांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशीलतेला वाव देणारा राज्यस्तरीय ‘निर्माण-१४’ इव्हेंट बुधवारपासून औरंगाबादच्या हायटेक इं‌जिनीअरिंग कॉलेजमध्ये रंगणार आहे. हायटेक इंजिनीअरिंगच्या सिव्हिल विभागाच्या विद्यार्थ्यांच्या पुढकाराने होत असलेल्या या राज्यस्तरीय इव्हेंटमध्ये दहा स्पर्धा रंगणार आहेत.

विकासाचा वेध घेणारा नेता हवा

0
0
महागाई, नोकरीच्या संधी, शैक्षणिक सवलती, विकास व उत्तम प्रशासन असा चहूबाजूने सर्वसमावेशक विचार करणारा नेता, खासदार आम्हाला हवाय असं परखड मत मौलना आझाद कॅप्मसमधील तरूणाईनं व्यक्त केलं.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images