Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

सातवांची दमछाक

$
0
0
हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजीव सातव यांची प्रचारादरम्यान दमछाक सुरू असून राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सहकार्य त्यांना मिळत नाही. महायुतीचे सुभाष वानखेडे यांनाही पक्षांतर्गतच्या धुसफुसीचा फटका प्रचारादरम्यान सहन करावा लागतो आहे. मतदारसंघात या दोनच उमेदवारांमध्ये खरी लढत आहे.

टँकरचा फेरा

$
0
0
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता गेल्या वर्षीच्या तुलनेत फारशी जाणवत नसली तरीही औरंगाबाद जिल्ह्यात १९ गावांमध्ये ३२, तर उस्मानाबाद जिल्ह्यामधील २१ गावात २५ टँकर सुरू करण्यात आले आहेत.

लुटमार करणारा गजाआड

$
0
0
वैजापुर तालुक्यातील लोणीखुर्द व परिसरात एकाच रात्रीत पाच ठिकाणी लुटमार करत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील एका सदस्याला मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. ग्रामीण पोलिसांच्या दरोडाविरोधी प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली असून अन्य सहा आरोपीचा शोध सुरु आहे.

मॅजिक पेनने चोरी

$
0
0
वाळूपट्ट्यावरील रॉयल्टीच्या पावत्यावर ‘मॅजिक पेन’च्या सहाय्याने लिखाण करून, पुन्हा पुन्हा त्याच पावत्या वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या नायगाव वाळूपट्ट्याच्या कंत्राटदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0
गारपीट, अवकाळी पावसामुळे उद‍्ध्वस्त झालेल्या नांदेड व हिंगोली जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदाच्या हंगामात शेतीचे नुकसान झाल्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले होते. एका शेतकऱ्याने नदी पात्रात उडी मारली व एकाने गळफास घेतला आहे.

शासन-शाळा संघर्ष

$
0
0
२५ टक्के मोफत प्रवेशाच्या निधीवरून इंग्रजी शाळांचे व्यवस्थापन व शासन यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. दोन वर्षांचा निधी दिल्यानंतरच यंदा प्रवेश दिले जातील, अशी भूमिका शाळांनी घेतली. निकषानुसार प्रवेश द्या, मगच निधीचे बोला, असा पवित्रा शासनाने घेतला आहे.

पर्यायी रस्त्याचे काम सुरू

$
0
0
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जालना रस्त्यावरील महावीर चौक, मोंढा नाका आणि सिडको बसस्टँड या तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी जालना रस्त्यावरील ट्रॅफिकचा भार हलका होण्यासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

घरकुलाची प्रतिक्षा

$
0
0
जांबरगाव व विरगाव येथील तब्बल ७२ लाभार्थी घरकूल योजनेतून निवारा मिळण्याची पाच वर्षापासून प्रतीक्षा करीत आहेत. परंतु ग्रामपंचायतीमार्फत त्यांचा प्रस्ताव पाठवण्याला नसल्याने या लाभार्थ्यांच्या नावांचा प्राधान्य यादीत समावेश झाला नसल्याचे उघडकीस आले आहे.

पैठणकरांचा रेल्वेसाठी आग्रह

$
0
0
नियोजित सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग पैठणहून व्हावा यासंबंधी जालन्याचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने पैठणकरांच्या रेल्वेच्या स्वप्नावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे

औरंगाबाद-मनमाड पाऊण तासात

$
0
0
वाढत्या रेल्वेच्या संख्येप्रमाणे रेल्वे ट्रॅक मजबुतीकरणाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले होते. सध्या औरंगाबाद ते नगरसोल दरम्यान रेल्वे रुळाचे काम झाले. त्यानंतर या मार्गावर रेल्वेच्या वेग मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात एक्सप्रेसने चक्क पाऊण तासांत मनमाड गाठणे शक्य होणार आहे, अशी माहिती रेल्वे विभाच्या सूत्रांनी दिली.

मे पासून स्टेशन रोड सुरू

$
0
0
क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन रस्त्याचे बांधकाम मे अखेरीस पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रस्त्यावर दोन ठिकाणच्या जलवाहिनी स्थालांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून कोणत्याही परिस्थितीत मे अखेरची मूदत पाळली जाईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

रक्षकांमुळे वाचले वृद्धेचे प्राण

$
0
0
हर्सूल तलावावरील सुरक्षा रक्षक कैलास वाणी यांच्यामुळे एका वृद्ध महिलेचा जीव मंगळवारी वाचला. ही महिला तलावात उडी मारून आत्महत्या करण्यासाठी आली होती. ती उडी मारणार तेवढ्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धावपळ करून तिला थांबवले व पोलिसांना बोलावून घेऊन त्यांच्या ताब्यात दिले.

पॅचवर्कसाठी ठेकेदारांना गोंजारले

$
0
0
शहरातील रस्त्यांच्या पॅचवर्कच्या कामाच्या रिटेंडरिंगचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून पालिकेच्या आयुक्तांकडे तो सादर करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेचा बाऊ न करता आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्यास पावसाळ्यापूर्वी पॅचवर्कची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चार महिन्यात बारा बुडाले

$
0
0
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व सुमारे तीनशे एकर क्षेत्रावर पसलेला हर्सूल तलाव हौसेने पोहणाऱ्यांना खुणावत असतो. मात्र अधूनमधून न पोहता येणारेही भटकत येतात. काही जण आत्महत्या करण्यासाठी तलाव गाठतात. या तलावात बुडून गेल्या चार महिन्यांत बारा जण मरण पावले आहेत.

जाधव पॅटर्न पावला

$
0
0
जिल्हा परिषदेच्या राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) विलास जाधव यांनी आर्थिक नियोजन केल्यामुळे झेडपीच्या तिजोरीत तब्बल आठ कोटी रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षीही सव्वातीन कोटी रुपये मिळाले होते.

डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी वेटिंग

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभागामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू होण्यासाठी अजूनही महिनाभराची प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी स्पष्ट चिन्हे आहेत. विभागातील विविध कामे पूर्ण होण्यासाठी आठवड्याचा कालावधी, तर निर्जंतुकीकरणासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

महिलांना भाषणाचीच समान संधी

$
0
0
घराणेशाहीचा वारसा लाभलेल्या महिलांनाच राजकारणात लक्षणीय संधी मिळते. प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान संधीचा विचार रुजलेला असताना राजकीय क्षेत्र अपवाद आहे. फक्त भाषणापुरताच महिलांच्या हक्काचा विचार होतो अशी खंत सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मुस्लिमांच्या मागासपणासाठी काँग्रेस दोषी

$
0
0
मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाला साठ वर्षापासून सत्तेत असलेला कॉँग्रेस पक्षच जबाबदार आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी केला आहे. मंगळवारी भाजप नेते गोपीनाथ मुडे यांच्या प्रचारार्थ बीड येथे जाण्यापूर्वी ते चिकलठाणा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

प्रचाराच्या धावपळीत उमेदवारांचे आरोग्याकडे लक्ष

$
0
0
सहा विधानसभा मतदारसंघात जाऊन जास्तीतजास्त मतदारांना भेटून मत मागायचे. उन्हाचा पारा ४० वर. दिवसभरात १० पेक्षा जास्त सभा, कॉर्नर बैठका घेण्याची धावपळ करताना तब्येतीवर परिणाम होऊ नये, याची काळजी उमेदवार घेत आहेत. दिवसभराचे प्लॅनिंग करताना किमान जेवण्याच्या वेळातरी पाळण्यावर भर आहे.

तू तिथं मी!

$
0
0
निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. निवडणुकीस दोन आठवडेच शिल्लक असल्याने उमेदवारांनी शहरी व ग्रामीण भागात प्रत्यक्ष प्रचारास कंबर कसली आहे. अर्थात प्रस्थापित व नव्या पक्षांची स्वतंत्र प्रचार शैली असल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>