समोरून येणाऱ्या बसला चुकवण्यासाठी रस्त्यावरून थोडी बाजुला होणाऱ्या सायकलस्वार मुलीच्या अंगावर अचानक मागून येणाऱ्या बसची धडक बसणार होती. मात्र प्रसंगावधान राखून तिने सायकल सोडून उडी मारली व पुढच्या क्षणी तिच्या सायकलचा चेंदामेंदा झाला. वडील नसलेल्या या मुलीचा जीव बचावला.
जीवावर बेतलेले सायकलवर भागले
↧
↧
बाबाजींचा मताशीर्वाद कुणाला?
या लोकसभा निवडणुकीत शांतीगिरी महाराज कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मताशिर्वाद देणार याचा फैसला गुरुवारी (१० एप्रिल) होणार आहे. गेल्या महिनाभरात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बाबाजींची भेट घेऊन आशीर्वाद मागितला होता. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारच्या निर्णयाकडे पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
↧
वीज कोसळून दोघांचा मृत्यू
भूम, परंडा व कळंब परिसरात बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपिटीपासून वाचलेल्या ज्वारीच्या पिकाची मळणी सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने नुकसान झाले आहे.
↧
जालन्यात २२ उमेदवार रिंगणात
पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर जालना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २२ उमेदवार उतरले आहेत.
↧
'मर्सिडीज बेंझ'च्या चाकांचा ११ महिन्यांत चुराडा
शंभरावर मर्सिडीज कार एकाचवेळी खरेदी करण्यात आल्याचे बिरूद मिरवणाऱ्या औरंगाबाद शहरातील एका ग्राहकाने केवळ ११ महिन्यांत मर्सिडीज कारच्या चाकांचा चुराडा झाल्याची तक्रार जिल्हा ग्राहक मंचात दाखल केली आहे. यात संबंधित ग्राहकाने दहा लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
↧
↧
प्रचारात महिलांकडे दुर्लक्ष
परभणी, हिंगोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवरांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. या दोन्ही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या ५० टक्के आहे. येथील उमेदवारांकडून महिला उमेदवारांना आकर्षीत करण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत.
↧
पुन्हा UPA सत्तेत येणार!: आबा
गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात काँग्रेस व मित्रपक्षाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे युपीए सरकार कार्यरत आहे. या सरकारने देशाच्या विकासाची काळजी वाहिली व लोकाभिमुख निर्णय घेतले. सर्व धर्मसमभावासाठी पुन्हा हेच सरकार केंद्रात सत्तेत येणे गरजेचे आहे. - आर आर पाटील
↧
पाण्याचे श्रेय लाटू नये -गोरंट्याल
जायकवाडीचे पाणी जालन्याला कायमस्वरूपी मिळवून देण्यामागे तत्कालीन केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे एै-या गै-यांनी त्याचे श्रेय लाटू नये, अशी टीका आ. कैलास गोरंट्याल यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांवर केली.
↧
डॉ. अर्शद चाऊस यांच्यावर गुन्हा
एम. आय. एम. चे अध्यक्ष डॉ. अर्शद चाऊस यांनी गंगापूर फाट्यावर वाहन तपासणीसाठी मोटार न थांबवता पोलिसांच्या अंगावर घालून सुसाट वेगाने पसार झाले. त्यानंतर शहरात मोटार अडवणाऱ्या व ताब्यात घेण्यासाठी घरी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केली.
↧
↧
दानवे, औताडेंवर गुन्हे
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भाजप, शिवसेना, महायुतीचे लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे, कॉँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार विलास औताडे, मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पार्टीचे मोहंमद रझवी यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मर्यादेपेक्षा जास्त कटआउट, बॅनर लावण्याचे दानवे आणि औताडेंविरोधात तक्रार आहे.
↧
सराटेंना 'नारळ' तर डोळेंना 'प्रेशर कुकर'
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघातून २७ उमेदवार आपले नशीब आजमवणार आहेत. बुधवारी झालेल्या चिन्हवाटपात अपक्ष उमेदवार बाळासाहेब सराटे यांना नारळ तर आई पक्षाचे उमेदवार राजू डोळे यांना प्रेशर कुकर, डॉ. फेरोज खान यांना फुगा, सय्यद शफियोद्दीन यांना पतंग हे चिन्ह मिळाले आहे.
↧
नाराज नाना झाले प्रदेश उपाध्यक्ष
निर्णय प्रक्रियेत नाही अन् माझ्यावर कोणती जबाबदारीही सोपविलेली नाही, असे म्हणत प्रचारापासून दूर असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नाना अर्थात हरिभाऊ बागडे आजपासून प्रचारात सक्रीय होणार आहेत. त्याचे कारण म्हणजे पक्षानी त्याच्यांकडे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
↧
मुंडेना दिवसरात्र मी दिसतो:पवार
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना दिवसाच नाही तर रात्रीही मीच दिसतो. त्यांच्या जवळची माणसे सांगतात की रात्रीही माझ्या नावानेच मुंडे जीभ चावतात, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बीडमधील सभेत काढला.
↧
↧
औरंगाबाद मतदारसंघात २७ उमेदवार
सोळाव्या लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. आता २७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
↧
सहा तासाचा रेल्वे लाईन ब्लॉक
मनमाड रेल्वे मार्गावरील दौलताबाद रेल्वे क्रासिंग गेट क्रमांक ४६ येथे भुयारी मार्ग तयार करण्यासाठी गुरुवारी दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत सहा तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे.
↧
निवडणुकीसाठी हव्या ७०५ गाड्या
लोकसभा निवडणुकीचे मतदान २४ एप्रिल रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाला एकूण ७०५ गाड्या लागणार आहेत. यातुन २५९ एसटी बसची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
↧
पुन्हा गारपीट आणि पाऊस
मराठवाड्याच्या लातूर, भूम, परांडा तालुक्यात अनेक ठिकाणी बुधवारी गारपीट
झाली. नांदेडसह अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. कळंब व उस्मानाबाद
तालुक्यात वीज पडल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
↧
↧
विमानांना पक्ष्यांचा धोका
विमानतळाच्या बाजूने असलेली मांस विक्रीची दुकाने, वाहणारा नाल्यामुळे विमानांना पक्ष्यांचा धोका निर्माण झाला आहे. वर्षभरात विमानासमोर मोठ्या आकाराचे पक्षी येण्याच्या तीन घटना घडल्याची माहिती देत, विमानतळ प्राधिकरणाने विमानांच्या संभाव्य अपघाताबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
↧
महावीर जन्म कल्याण महोत्सव
महावीर जयंतीनिमित्त सर्व जैन धर्मीय महिलांना एकत्र आणण्याच्या उद्दिष्टाने सकल जैन समाज आणि सकल महिला समितीने दहा दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम केला होता. याद्वारे जैन समाजातील तब्बल वीस महिला मंडळ एकत्र आले.
↧
विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध, लायब्ररी फुल्ल
आर्ट, कॉर्मस, सायन्स कॉलेजांच्या परीक्षा झाल्या आहेत तर इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध लागलेले आहेत. प्रोजेक्ट सबमिशनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या कॅबीन बाहेरील प्रोजेक्ट सबमिशनची गर्दी आता लायब्ररीकडे वळू लागली आहे.
↧
More Pages to Explore .....