Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

महायुतीला फायदा

$
0
0
कार्यकर्ता हीच आपली संपत्ती अशी भावना बाळगून कार्यरत असणारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी लोकसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांचा अनादर होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी आगामी काळात महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिशी उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय डायरी

$
0
0
मराठवाड्यातील प्रमुख राजकीय सभांचे संक्षिप्त वृत्तांकन

देश एकसंध राहिल्यास विकास होईल

$
0
0
देशातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सामाजिक संघटनांच्या नावाखाली धर्म व जातीयवादी संघटनांमुळे अंतर्गत वातावरण दूषित होते आणि विकासाचे मुद्दे बाजूला राहतात. विकासाच्या मुद्याला प्राधान्य देऊन देश एकसंध राहिला तरच उत्तम विकास होईल, असे मत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नितीन पाटील यांनी व्यक्त केले.

पोलिसपुत्राचा मृत्यू

$
0
0
कैद्यांची आरोपीपार्टी करणाऱ्या पोलिस व्हॅनने दोन दुचाकीस्वारांना चिरडले. यात निवृत्त ‍पोलिसाच्या मुलाचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी भाग्यनगर येथील शक्तीसहकार इमारतीसमोर घडला.

चेकचा चकवा

$
0
0
न वटलेले चेक ६५ न वटलेल्या चेकची संख्या ६५ असल्याचे सांगितले जात असले तरी, ही संख्या तीन आकडी निश्चितपणे असेल असे बोलले जात आहे. बनावट नोटा आणि न वटलेले धनादेश याचा अंदाज पालिकेच्या अधिकाऱ्यांना येत नसल्यामुळे कर वसुलीचा नेमका आकडा लपवून ठेवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महिलेचा जीव वाचवला

$
0
0
दारूड्या नवऱ्याचा त्रास असहाय्य झाल्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वे पटरीजवळ गेलेल्या महिलेचा जीव बुधवारी रात्री ओंकार सोशल ग्रुपच्या सदस्यांनी वाचवला. (क्राइम डायरी)

प्रचारयंत्रणेत धुसफूस

$
0
0
अंतर्गत वाद आणि समन्वयाचा अभाव यामुळे शिवसेनेची प्रचार यंत्रणा ग्रासली आहे. कुणाचे ऐकायचे आणि कसा प्रचार करायचा, असा प्रश्न पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समोर निर्माण झाला आहे

उपोषणाला परवानगी नाही

$
0
0
उस्मानाबाद मतदार संघातील आघाडीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या विरोधातील १४ एप्रिलच्या जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उस्मानाबाद येथील उपोषणास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यामुळे महायुतीमध्ये तीव्र नाराजीचे तर आघाडीमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

राजचे सेटिंग आंदोलन

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले टोल विरोधी आंदोलन सेटिंगचे आणि चिटिंगचे होते, अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी गुरुवारी (१० एप्रिल) येथे केली.

अजितदादा, धस यांना नोटीस

$
0
0
खुंटेफळ (ता. आष्टी, जि. बीड) येथील साठवण तलावाच्या कामासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुरेश धस यांच्यासह नऊ प्रतिवादींना नोटीस बजाविल्या आहेत.

सुख म्हणजे नक्की काय?

$
0
0
आजचं युग हे आधुनिक युग, स्पर्धेचं युग. आधुनिक तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं मात्र, माणसं दूर गेली. सुखाच्या शोधात माणसं आपली माणसं, आपलं गाव सोडून दूर गेली आणि सुख त्यांच्यापासून दूरदूरच राहिलं.

रूपेरी दुनियेचा खडतर प्रवास

$
0
0
रूपेरी दुनियेबाबत नवोदितांना असलेल्या आकर्षणाचा गैरफायदा घेऊन फसवणूक करतात. या फसवणुकीला रूपेरी दुनियेचा पहिला अनुभव मानून स्वबळावर तीन सिनेमांत भूमिका करीत नाट्यशास्त्र विभागाच्या संदीप थोरात या विद्यार्थ्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवल आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमातून महावीरांना अभिवादन

$
0
0
सांस्कृतिक कार्यक्रम व प्रदर्शनातून धार्मिक परंपरांचे शास्त्रीय महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे.

नवलाई अॅनिमेशनची?

$
0
0
कला व तंत्रज्ञानाचा उत्तम वापर असलेल्या अॅनिमेशन क्षेत्रातील करिअरकडे काही वर्षांपूर्वी तरुणांचा कल होता. गेल्या चार वर्षांपासून जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर विदेशातील कामांचे प्रमाण घटल्यामुळे स्थानिक अॅनिमेशन कंपन्या अडचणीत आहेत.

नव्या दमाच्या गाण्यांना नव्वदीचा ‘टच’!

$
0
0
‘पुरानी जीन्स’या आगामी सिनेमात २०१४ मध्ये तयार केलेल्या गाण्यांना नव्वदीचा फिल देण्यात आला आहे. ही किमया साध्य केलीय प्रसिद्ध संगीतकार राम संपत यांनी. या सिनेमात तनुज विरवाणी, आदित्य सिल आणि इझाबेल लिट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सर्वांगीण विकास महत्त्वाचा

$
0
0
संसदेत आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा खासदार हा संपूर्ण जिल्ह्याचा विकास करणारा असावा. जिल्ह्यामध्ये केवळ एखादे मोठे शहर येत नाही, जिथे तो स्वतः राहतो. तर ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असतो.

तलावातील पाणीपातळीही घट होण्यास सुरुवात

$
0
0
तालुक्यातील बऱ्याच भागात पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरी खोदण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी भूजल पातळी घटल्यामुळे विहिरी खोल करण्याचे काम सुरू केले आहे.

एसटी-जपची धडक, अठरा जखमी

$
0
0
पैठण- औरंगाबाद रस्त्यावरील सप्तशृंगी हॉटेलजवळ काळीपिवळी व एसटी बसची धडक बसून झालेल्या अपघातात अठरा जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जण गंभीर आहेत. हा अपघात शुक्रवारी (११ एप्र‌िल) दुपारी चार वाजता घडला.

बदल्या न झालेल्या अधिकाऱ्यांना कोर्टाची नोटीस

$
0
0
निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे बदली न झालेल्या सरकारी अधिकाऱ्यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजाविली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्याबद्दल हायकोर्टात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे.

नागरिकांना पाणीपुरवठा शक्य

$
0
0
नहर-ए-अंबरीची दुरुस्ती केल्यास रोजाबाग आणि परिसरातील सुमारे १५ हजार नागरिकांना पाणी पुरवठा करणे शक्य होईल. त्यासाठी चार मेन होलवर प्रत्येकी दहा ते बारा हजार रुपये खर्च करावे लागतील. नहरीतून रोज सव्वापाच लाख लीटर पाणी उपलब्ध होते.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images