Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

$
0
0
ठिबक सिंचनासाठी पाणी उपसा करण्याच्या परवानगीचा प्रस्ताव ‘कडा’ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी शेतकऱ्यांकडून चोवीस हजार रुपयांची लाच घेणारा शाखा अभियंता राम दिनकर ढाकणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (११ एप्रिल) पकडले.

‘ढ’ विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घ्या

$
0
0
अभ्यासात गती नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घ्या, असे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. याच महिन्यात विशेष वर्गातून अशा विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन सुधारायचे आहे.

जीटीएलच्या खांबांना महापालिकेचा शॉक

$
0
0
क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रस्त्याच्या रुंदीकरणादरण्यान विजेचे खांब हटवावे लागणार, मात्र या खांबांसाठी महापालिका पर्यायी जागा उपलब्ध करून देत नसल्यामुळे खांबांचे तात्पुरते स्थलांतर केले जात आहे. या कामामुळे पावसाळ्यात अडचणी वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शामली कुलकर्णी ठरली ‘यंग लीडर’

$
0
0
राष्ट्रीय स्तरावरील गाईड सब कमिटीवर यंग लिडर म्हणून औरंगाबादची शामली विकास कुलकर्णी हिची निवड झाली आहे. अशा प्रकारे निवड होणारी ही येथील पहिली विद्यार्थिनी ठरली.

निवडणूक कामातून ११०० कर्मचाऱ्यांची सुटका

$
0
0
मुला, मुलीचे लग्न, दीर्घ आजारपण, अशी अनेक कारणे सांगून निवडणुकीच्या कामातून सुटका करून घेण्यासाठी २२०० अधिकारी-कर्मचाऱ्यंनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले होते. यापैकी ११०० कर्मचाऱ्यांची ड्यूटी रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

आपापले वॉर्ड सांभाळा, मतदारांशी संपर्क साधा

$
0
0
आपल्याच वॉर्डात लक्ष द्या, मतदारांशी संपर्क साधा. फारच गरज पडली तर आजुबाजुच्या वॉर्डातही लक्ष घाला, अशा सूचना सर्वच राजकीय पक्षानी नगरसेवकांना दिल्या आहेत.

मतदार यादीत नाव नोंदवले

$
0
0
रस्त्यावर माठ, सुरई, झाडं विकता विकता शहरात दहा-पंधरा वर्षं सरली. शहराला आपलसं केलं. आम्ही औरंगाबादी झालो, पण इथं राहूनही मतदान करता येत नसल्याची खंत होती.

पाणी वाटपाचे काय?

$
0
0
निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक विकास विषयक प्रश्नांबाबत चर्चा होऊन आश्वासने दिली, घेतली जात आहेत. प्रसार माध्यमांनीही उमेदवार आणि मतदारांच्या अनेक ठिकाणी चर्चा घडवून आणल्या आहेत.

पाणीप्रश्नावरून बहिष्कारास्त्र

$
0
0
एक तपापासून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावे लागते. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वारंवार तक्रारी करूनही कुणीच लक्ष देत नाही त्यामुळे बारूदगरनाला परिसरातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

भरारी पथकाचा धाक, व्यापार थंड

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यंदा कडक अंमलबजावणी केली आहे. काळ्या पैशाच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकांकडून जप्त केलेल्या व्यवहाराच्या रकमा सोडवून घेण्यात वेळ जात असल्याने शहरातील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत.

खासदार निधीचे चार कोटी पडून

$
0
0
खासदार निधीतून लोकसभा मतदारसंघातील विविध तालुके तसेच, गावांमध्ये राष्ट्रीय प्राथमिकता असलेली विविध कामे केली जातात. मात्र, २००९ ते २०१४ या कालावधीत औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सुमारे २० कोटी ५० लाख रुपयांच्या निधीपैकी सुमारे चार कोटी रुपये शिल्लक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाकडे आलेली आकडेवारी सांगते.

महापालिका राबवणार मतदारांसाठी स्वाक्षरी मोहीम

$
0
0
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार जनजागृती कार्यक्रमात (स्वीप) नांदेड महापालिकेनेही सक्रिय सहभाग घेतला आहे. शहरातील वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी आणि चौकांमध्ये ‘मी मतदान करणारच’ असे फलक लावून त्यावरील रिकाम्या जागेत मतदारांना स्वाक्षरी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

परभणी मतदार संघात प्रचारयुद्ध जोरात

$
0
0
परभणी लोकसभा मतदारसंघात आघाडीने विजयासाठी जोरदार प्रचारयुद्ध सुरू केले आहे, तर महायुतीनेसुद्धा आपली जागा कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. आघाडीचे विजय भांबळे आणि महायुतीचे संजय जाधव या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत आहे.

जंगल सफारीसाठी गौताळ्यात तयारी

$
0
0
राज्यातील इतर अभयारण्यांच्या धर्तीवर गौताळा अभयारण्यात जंगल सफारी सुरू करण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या गौताळ्यात सफारीसाठी उपलब्ध सपाट भागाची चाचपणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे वन्य प्राण्यांच्या सहज वावरावर मर्यादा येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे.

अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

$
0
0
विमानतळाभोवती असलेली अतिक्रमणे हटवण्यावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी स्वीकारून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याऐवजी पालिकेने ही जबाबदारी विभागनिहाय अधिकाऱ्यांवर टाकली आहे.

‘शक्कर बावडी’त संरक्षक भिंत उभारणार

$
0
0
शक्कर बावडीत पोहण्यासाठी येणाऱ्यांना रोखणे शक्य व्हावे, यासाठी विहिरीभोवती संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्राने आहे. हियामत बाग परिसरातील शक्कर बावडीत शुक्रवारी (१२ एप्रिल) दुपारी पाय घसरून एका तीस वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

लातूरच्या जेवणावळीची चर्चा’च जास्त

$
0
0
लातूरमध्ये सरकारी, कर्मचारी यांच्या काही दिवसांपूर्वीच्या जेवणावळीची चर्चा रंगवली गेली, मात्र या प्रकाराच्या चौकशीअंती फारसे काहीही हाती लागलेले नाही. जेवणावळीवरून झालेली चर्चा पोकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्वारीचे भाव ३० रुपयांवर

$
0
0
मार्चमध्ये झालेल्या गारपिटीचा फटका भाकरीलाही बसला आहे. यंदा प्रथमच ज्वारी गव्हापेक्षा महाग झाली असून २५ ते ३५ रुपये किलोने किरकोळ बाजारपेठेत ज्वारीची विक्री होत आहे. एकेकाळी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेली भाकरी महागल्याने गृहिणींच्या चेहऱ्यावरील चिंता मात्र वाढली आहे.

शिवाजीनगरात पाणीबाणी

$
0
0
शिवाजीनगरातील सिडकोच्या बाराव्या योजनेतील शंभरावर घरांना गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. तीन दिवसांनंतर नळाला केवळ दहाच मिनिटे येत असल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ या भागातील नागरिकांवर आली आहे.

आंब्याची चव महागाईमुळे आंबट

$
0
0
गोड चवदार आंबे बाजारात दाखल होण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. यंदा सुरुवातीलच लालबाग बाजारात दाखल झाला. त्यापाठोपाठ रत्नागिरीचा हापूस, कर्नाटकच्या बदामसह दसरी आंबे बाजारात दाखल झाले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images