Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

कांदे स्वस्त, लिंबू महाग

$
0
0
उन्हाचा कडाका वाढताच लिंबूची मागणी वाढली असून आठ दिवसांपूर्वी ७० ते ८० रुपये किलोने मिळणाऱ्या लिंबूसाठी १०० रुपये मोजावे लागत आहे. ग्राहकांसाठी समाधानाची बाब म्हणजे कांदे अवघ्या पाच रुपयांस मिळत असून वांगे, फुलकोबीसह मेथी, पालक आदी पालेभाज्यांचे दर वाढले आहेत, तर अन्य फळभाज्याचे दर स्थिर आहेत.

रानातल्या कवीचा आज सन्मान

$
0
0
मराठी कवितेच्या प्रांतात कृषी संस्कृतीचे शब्दधन पेरणारे ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना रविवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या जीवन गौरव वाङ्मय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

मनोविकृती विभागातील कामांची घाटी दवाखान्यात कासवगती

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) मनोविकृती विभागाच्या वॉर्डची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे जुन्या आठ व नऊ वॉर्डामध्ये हा विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विभागासाठी आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात होती. मात्र यापैकी अनेक कामे अद्याप पूर्ण झाली नाहीत. काही दिवसांपासून ‘काम बंद’ सारखी स्थिती झाल्याने स्थलांतर रखडले आहे.

‘डॉ. आंबेडकर जयंती शांततेत साजरी करा’

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक व लोकसभा निवडणूक काळात मद्यपान करून धिंगाणा घालू नये, मिरवणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. शहर पोलिस ठाण्यात शनिवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीला पोलीस उपअधीक्षक राम मांडुरगे, उपनगराध्यक्ष किरण पवार, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दुर्गाबाई पवार, पोलीस उपनिरिक्षक सरीता गाढे, महावितरणचे शहर अभियंता दशरथ तेलंग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नशेसाठी पैसे मिळविण्याकरिता चोऱ्या

$
0
0
शहरात महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याच दिवशी पोलिसांनी जैन मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्तींचा छडा लावला. त्यामुळे पोलिसांकडून भाविकांना महावीर जयंतीची भेटच मिळाली.

तपासणी बंद झाल्याने रुळ तुटण्याच्या घटना

$
0
0
अजिंठा एक्सप्रेस जाताना पोटूळ रेल्वेस्टेशनजवळ शनिवारी रात्री रूळ तुटल्यामुळे रेल्वे मार्गाची दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे रुळ तुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दर दोन दिवसांनी अभियंत्यांकडून होणारी रुळांची तपासणी बंद झाल्यामुळे हे प्रकार वाढले आहेत.

अट्टल दरोडेखोरांची टोळी गजाआड

$
0
0
दरोड्याच्या तयारीत असलेल्या अट्टल दरोडेखोरांच्या चार जणांच्या टोळीला दरोडा प्रतिबंधक पथकाने शनिवारी रात्री अटक‌ केली. पैठण - मुंगीरोडवरील पाटेगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. दरोडेखोरांच्या ताब्यातून दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात महिलेचा निर्घृण खून

$
0
0
एका महिलेचा खून करून शरीराचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून शहागड जवळील कुरण फाट्यावरील एका शेतात शनिवारी सापडले. या महिलेचे मुंडके गायब असल्यामुळे ओळख पटू शकली नाही. या घटनेचा गुन्हा अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्यात दाखल करून तपास करण्यात येत आहे.

ओव्हरटाइमचे पैसे थकले

$
0
0
महापालिकेने सुटीच्या दिवशी काम केल्याबद्दल ओव्हरटाइमची रक्कम थकल्यामुळे सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी यापुढे सुटीच्या दिवशी काम न करण्याचा इशारा दिला आहे. प्राणीसंग्रहालयातील २७ कर्मचाऱ्यांचे पालिकेकडे आठ लाख ८९ हजार रुपये थकले आहेत.

२५ लाखांच्या लोभाने ४२ हजार गमावले

$
0
0
कौन बनेगा करोडपतीमध्ये २५ लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे अमीष दाखवून एका विद्यार्थिनीची ४२ हजार रुपयाला फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कूलर घेताना ग्राहकांचा‌ खिसा झाला गरम

$
0
0
दिवसेंदिवस तापमान वाढते आहे. दुपार जीवघेणी होत आहे. अंगाची काहिली-काहिली होते. मग, अशात प्रत्येकाला आपल्या घरात थंडाथंडा कूलकूल वातावरण हवे असते. एसीतर प्रत्येकाला बसवणे शक्य नाही. मग पावले वळतात कूलरच्या दुकानाकडे. पण यंदा कूलर घेतानाही खिसा गरम होणार आहे. त्यांच्या किमती चक्क तीस टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पाण्याचा ‘ड्रम’ शंभर रुपयांनी महागला

$
0
0
उन्हाळा आला की औरंगाबादसारख्या ठिकाणी पाणी विकत घ्यावे लागते. खेड्यात दूरवरुन आणावे लागते. ते आणलेले पाणी साठवायला मग ‘ड्रम’ची खरेदी जोरात होते. यंदा मात्र या ड्रमला महागाईची झळ बसलीय. त्यांच्या किमंती जवळपास शंभर रुपयांनी वाढल्यात.

बहुमजली इमारतींची अग्निसुरक्षा हेच आव्हान

$
0
0
तीन मजल्यांच्या इमारतींचे औरंगाबाद शहर इतिसाहजमा झाले असून, पाच-सहा-सात-दहा मजल्यांच्या इमारती शहरात होत आहेत. भविष्यातील डीएमआयसी प्रकल्पात तर इमारतींचे मजले १० ते १५ पर्यंत जाणार असल्याचा कयास आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत सध्याची अग्निशमन यंत्रणा अजूनही चार मजल्यांवर पोहोंचू शकत नाही.

पाच वर्षांत एकदा भेटणारा खासदार नको

$
0
0
लोकसभेचे मतदान अवघ्या काही दिवसांवर आले आहे. खासदारकीचे उमेदवार मतदारांचे उंबरठे झिजवत आहेत. एकदा मत मागण्यासाठी आलेला उमेदवार खासदार झाल्यानंतर पाच वर्षात तोंड दाखवत नाही. असा खासदार आम्हाला नको आहे. खासदार हा जनतेचे प्रश्न जाणून घेणारा असावा. केंद्र शासनाच्या विविध योजना त्याने मतदारसंघासाठी आणल्या पाहिजेत.

निर्णयप्रक्रियेत महिलांनी यावे

$
0
0
प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्त्रीला राजकीय तक्त्यात महत्व कमी दिले जाते. राजकीय क्षेत्र ख-या अर्थाने निर्णयाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात ‌महिलांचा सहभाग वाढला, तर थेट निर्णय प्रक्रियेत म‌हिला अधिक असतील. ज्यामुळे महिलांना कोणत्याही कुबड्याची गरज भासणार नाही, असे प्रतिपादन लेखिका सुनीता अारळीकर यांनी केले.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी औरंगाबादेत विविध पक्ष, संघटनांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे यासह अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून सोमवारी सायंकाळी मिरवणुकांचेही आयोजन केले आहे.

‘चाचू’ची चटका लावणारी एक्झिट

$
0
0
गोरगरीब रुग्णांची दिवस-रात्र सेवा करणारा, कमी पैशांत किंवा पैशांशिवाय रुग्णांना नेण्या-आणण्यापासून सर्व ती मदत करणाऱ्या चाचू अर्थात अहमद सैदोद्दीन अन्सारी (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेक वर्षांपासून घाटी परिसरात कायम तळ ठोकून रुग्णसेवेचे कार्य करणाऱ्या चाचूने अचानक एक्झिट घेतल्याने रविवारी घाटीत दिवसभर हळहळ व्यक्त होत होती.

सर्वाधिक प्रदूषित नद्या गुजरातमध्ये

$
0
0
पाणी हा जीवनाचा आधार असून तो देशातील नागरिकांचा एक मुलभूत अधिकार आहे, मात्र आज कोणताही पक्ष पाण्याला महत्व देत नाही. पर्यावरणाचा विचार न करता विविध उद्योगांना देण्यात आलेल्या परवानग्यांमुळे गुजरातमधील सर्वाधिक नद्या प्रदूषित झाल्या आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी केले. ते औरंगाबादमध्ये रविवारी बोलत होते.

सरकारचा अजब न्याय, मांस निर्यातीवर सबसिडी

$
0
0
केंद्र सरकारची अनेक धोरणे चुकीची आहेत. एकीकडे सरकार मांस, मत्स्योद्योगाला चालना देण्यासाठी त्यांच्या आयातीवर सबशिडी देते. दुसरीकडे अस्वस्थ शेतकरी, बेरोजगार युवकांसाठी मात्र कुठलीच सबशिडी मिळत नाही. आपण मांस निर्यात करतो आणि सहजासहजी आपल्याकडे ज्या गोष्टी उत्पादित होतात ते गायीचे दूध व दूध पावडर आयात करतो, यापेक्षा दुर्देव ते काय ? ’ अशी खंत सुनीलसागर महाराज यांनी व्यक्त केली.

समंजस सहवासात घडलो

$
0
0
‘कवितेच्या शब्दांनी रंगरुप आणि नवी दृष्टी दिली. कोणत्याही क्षेत्रात भरपूर काम केल्यानंतरही दुर्लक्षित राहण्याची शक्यता असते. मला समंजस माणसांचा सहवास मिळाल्यामुळे न्यूनत्व कमी होऊन चांगली कामगिरी करता आली. सुदैवाने थोरामोठ्यांच्या सहवासातूनच माझी घडण झाली,’ असे कृतार्थ उद्गार ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांनी काढले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images