Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

वाघोबांसाठी कुलर्स, सापांना उष्णतेच्या झळा

$
0
0
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने महापालिकेतर्फे सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील प्राण्याची काळजी घेतली जात आहे. परंतु मुक्या प्राण्याची काळजी घेण्यातही दुजाभाव केला जात आहे. वाघांना थंड हवा लागावी यासाठी कुलर्स लावण्यात आले आहेत, मात्र सर्पालयातील सापांना तळपत्या सूर्याचा कोप सहन करावा लागत आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यास दंगली उसळतील

$
0
0
‘नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडले. आता मोदी पंतप्रधान झाल्यास देशामध्ये जातीय दंगली उसळतील,’ असे वक्तव्य बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी रविवारी व्यक्त केले. त्या मराठवाड्यातील बसप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमखास मैदान येथे घेतलेल्या जाहीर सभेत बोलत होत्या. सभेला मोठी गर्दी होती.

बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर मनधरणी सुरू

$
0
0
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणाऱ्या मतदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न जागृती अभियानाच्या पथकाकडून करण्यात येणार आहे.

आचारसंहितेवरील निर्बंधांमुळे शरद पवार झाले व्याकुळ

$
0
0
पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणारे शरद पवार हे आता आचारसंहितेवरील निर्बंधामुळे व्याकुळ झाले आहेत. त्यामुळे शरद पवार हे आचारसंहितेसंदर्भात आगपाखड करू लागले आहेत, अशी बोचरी टीका शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलताना ‌केली.

एक खिडकी सुविधेमुळे प्रचार झाला सुलभ

$
0
0
लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना त्यांचा प्रचार सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यांन्वीत केलेल्या एक खिडकी कक्षामुळे विविध परवानग्या मिळविण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. या कक्षामार्फत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १०९ सभा व १२१ प्रचाररॅलींना परवानगी देण्यात आल्याची माहिती कक्षप्रमुख डॉ. विजयकुमार मुंडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पोलिस दक्ष

$
0
0
बीड जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिस विशेष काळजी घेत आहेत. यासाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा बीडमध्ये तैनात करण्यात आला आहे. एखाद्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास पाचव्या मिनिटाला पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी पोचेल व परिस्थिति नियंत्रणात आणील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

मित्राच्या नावावर परीक्षा देणारा गजाआड

$
0
0
अंबरवाडीकर कॉलेज येथे पॉलीटेक्निकच्या तृतीय वर्षाची परीक्षा देणाऱ्या एका तोतया परीक्षार्थीवर वाळूज पोलिस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा परीक्षार्थी मित्राच्या नावावर परीक्षेला बसला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

देशात इतिहास घडविण्याची हीच संधी

$
0
0
सबंध देशभरात काँग्रेस विरोधी वातावरण आहे. १९७७ नंतरची ही मोठी लाट आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून डी. बी. पाटील यांना विजयी करुन देशात इतिहास घडवा, असे आवाहन लोकसभेचे उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मुदखेड येथे जाहीर सभेत केले.

समस्या अन् विकासावर मौन

$
0
0
लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघात प्रचार संथ सुरू आहे. कार्यकरत्यांचा निरुत्साह आहे. तर उमेदवारांनी जिल्ह्यातल्या समस्या आणि विकासांवर मौन बाळगले आहे. त्यामुळे रावसाहेबांचा विश्वास मोदी लाटेवर तर औताडेंची मदार दानवेंच्या निष्क्रियतेवर आहे.

छळणाऱ्या काँग्रेसला जागा दाखवा

$
0
0
देशातील प्रत्येक घटकाला गेल्या ६० वर्षांपासून छळण्याचे काम काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. आगामी काळात काँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्या. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे.

‘पेडन्यूज’चा दणका

$
0
0
विविध वृत्तपत्रांमधून प्रचारार्थ प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये समानता आढळून आल्याने, या बातम्या नसून ‘पेडन्यूज’ आहेत, अशी माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सहनियंत्रण समिती यांची खात्री झाली आहे. त्यामुळे या बातम्यांना ‘पेडन्यूज’ समजून त्याचा खर्च आपल्या प्रचार खर्चात समाविष्ट का करू नये, अशी नोटीस माध्यम सहनियंत्रण समितीने खासदार डॉ. पद्मसिंह पाटील व अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या रोहन देशमुख यांना बाजवण्यात आली आहे.

बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे

$
0
0
बीड लोकसभा मतदार संघात दोन्ही प्रमुख पक्षाकडून स्टार प्रचारक हे दोन मुंडेच आहेत. भाजपकडून परळीच्या आमदार आणि गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे-मुंडे गावागावात जावून वडिलांसाठी प्रचारसभा घेत आहेत. तर राष्ट्रवादी कडून विधानपरिषद सदस्य धनंजय मुंडे आपल्या काकाविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्यासाठी मते मागत आहेत.

फक्त दोन वेळा खा, वजन कमी करा !!

$
0
0
फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा, असा अनोखा फंडा औरंगाबादचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शोधून काढला आहे. विनासायास वजन कमी करा, असे सांगत ४० डॉक्टरांसह ५०० जणांवर यशस्वी प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले आहे.

देशमुखांच्या ‘गढी’ला खिंडार

$
0
0
आमदार अमित देशमुख यांच्याच बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला असून, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवसांचाच अवधी बाकी असताना झालेल्या या पक्षांतराने लातूर काँग्रेसला जबर धक्का बसला आहे.

पन्नास रुपयांत भद्रा मारुतीचे दर्शन

$
0
0
हनुमान जयंतीनिमित्त येथील श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी भाविक येण्यास सुरुवात झाली आहे. मंदिर संस्थानतर्फे गर्दी नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळून झटपट दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी ५० रुपये मोजावे लागतील.

आता यूजर चार्जेसचा बोजा

$
0
0
महापालिकेने आता शहरातील नागरिकांवर यूजर चार्जेसचा (उपभोक्ता कर) बोजा टाकला आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा न पुरवता मालमत्ता कराच्या नोटीसमध्ये या कराचा उल्लेख करून पालिकेने वसुलीची तयारीही सुरू केली आहे.

जात, धर्माची मानसिकता सोडावी

$
0
0
‘जात, धर्म, वर्ग या मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या ताकतीवर राष्ट्र समृद्ध झाले तर, खऱ्या अर्थाने राज्यघटनेच्या उद्देशिकेतील ‘वुई द पीपल’ हे शब्द सार्थकी ठरतील,’ असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक दिल्ली विद्यापीठातील प्रा. डॉ. एन. सुकुमार यांनी केले.

विविध संस्था, संघटनांतर्फे अभिवादन

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भडकलेट गेट येथे अभिवादनासाठी भीमसैनिकांनी सकाळपासून रिघ लावली होती.

वंदना ही तुला महामानवा

$
0
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवारी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी क्रांती चौकातून निघालेल्या मुख्य जयंती मिरवणुकीतील ढोलताशांचा गजर व जयभीमच्या घोषणांनी आसमंत निनादला.

नगर लिंकरोडचा खेळखंडोबा

$
0
0
वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक, कामगार तसेच पुण्याकडे जाणाऱ्या जड वाहनांच्या सोयीसाठी तयार केलेला ए. एस. क्लब ते पैठण रोड लिंक रस्त्याचा खेळखंडोबा झाला आहे. ‘एमएसआरडीसी’ ने अचानक हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images