Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

मतदान केंद्रावर पोलिसांचा ‘वॉच’

$
0
0
बीड लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून बुधवारी मतदान पथके त्यांच्या मतदान केंद्रावर पोचली आहेत. बीड जिल्ह्यातील अठरा लाखाच्या जवळपास मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

टेम्पो-ट्रकच्या धडकेत दोन ठार

$
0
0
गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक व पाईप घेऊन जाणारा टेम्पोची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. हा अपघात औरंगाबाद रस्त्यावरील निल्लोडजवळ सकाळी सहा वाजता झाला.

येरमाळा यात्रेस भाविकांची गर्दी

$
0
0
येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेत लाखो भाविकांनी येडेश्वरी मातेचे दर्शन घेतले. येडेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी गारपीट व अवकाळी पावसामुळे चिंताग्रस्त असे वातावरण असतानाही भाविकांनी गर्दी केली होती.

पतीची जन्मठेप कायम

$
0
0
सतरा वर्षाच्या विवाहितेला भोसकून खून केल्याबद्दल हिंगोली सेशन्स कोर्टाने पतीला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवली आहे.

नुकसानीच्या फेरसर्वेक्षणाचे आदेश

$
0
0
गेल्या महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे चुकीचे पंचनामे केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांनी सात गावांमधील पिकांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

७५ टक्के मदतीचे वाटप

$
0
0
फेब्रुवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हयाला मिळालेल्या ५७ कोटी रुपयांपैकी ७५ टक्के रकमेचे वाटप झाले आहे. उर्वरित निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी दिली.

गारपीटग्रस्तांच्या बिले लवकरच माफ

$
0
0
गारपीटग्रस्तांचे जानेवारी ते जून या महिन्यांचे वीज बिल माफ करण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

माणिकराव ठाकरे बदली खेळाडू

$
0
0
काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार नितीन पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी आयोजित केला होता. ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना बदली खेळाडू म्हणून भूमिका बजावावी लागली.

घरफोड्याची ‘फिफ्टी’ करणारा गजाआड

$
0
0
घरफोडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या दाद्या उर्फ दादाराव उमाप याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याने दोन गुन्ह्याची कबुली दिली असून ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला.

फॅशनिस्टा प्रदर्शनाचे आयोजन

$
0
0
बदलती लाइफस्टाइल आणि त्याला अनुरूप अशा फॅशनेलबल कपडे, अलंकार आणि इतर वस्तूंची रेलचेल असणाऱ्या फॅशनिस्टा प्रदर्शनाचे आयोजन हॉटेल विंडसर कॅसेल येथे करण्यात आले आहे.

सिडकोतून दोन मंगळसूत्रे पळवली

$
0
0
अवघ्या तासाभरात दोन महिलांची मंगळसूत्रे दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवल्याचा प्रकार मंगळवारी (१६ एप्रिल) सायंकाळी सिडको एन-४ भागात घडला. हनुमान जयंतीनिमित्त दर्शन करून परतणाऱ्या महिलांना चोरट्यांनी लक्ष्य केले. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

निवडणुकीत अडले साताऱ्याचे टँकर

$
0
0
साताऱ्यातील रहिवाशी पाण्यासाठी वणवण भटकत असताना ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे पाठवलेला १५ टँकरचा प्रस्ताव निवडणूक कामामुळे अडकून पडला आहे. त्यामुळे निवडणूक संपेपर्यंत हे टँकर सुरू होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

पाणीटंचाईवर टँकरची मात्रा

$
0
0
उन्हाळ्यामुळे नागरिकांची पाण्याची गरज वाढत असून काही प्रमाणात पाणीटंचाईही डोके वर काढत आहे. या परिस्थितीत वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे चार टँकरची मागणी केली आहे. या चार टँकरव्दारे एका दिवसात प्रत्येकी पाच फेऱ्या मारून पाणी पुरविण्याची योजना आहे.

रस्त्याच्या मधोमध ट्रान्सफॉर्मर

$
0
0
औरंगाबाद शहराकडे येणाऱ्या जडवाहनांना परस्पर बीड बायपास रस्त्यांकडे वळविण्यासाठी मिटमिटा येथील जुन्या जकात नाक्यासमोरून नागपूर- मुंबई या राष्ट्रीय महार्गाला जोडणार्या लिंक रोड बांधण्याचा निर्मण घेण्यात आला आहे.

वाहतुकीवरून आगारप्रमुख आमने सामने

$
0
0
समांतर वाहतुकीवरून सध्या मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख आणि सिडको आगारप्रमुख आमने सामने आलेत. प्रवासी भगाव अभियानामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.

विद्यार्थ्यांना दिलेली ‘ती’ खिचडी ओके

$
0
0
जवाहरकॉलनी येथील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक फेब्रुवारी रोजी दिलेली ‘ती’ खिचडी ओके होती. विषबाधा होण्यासारखा कोणताही घटक त्या खिचडीत नव्हता, असा सुस्पष्ट अहवाल फॉरेन्सिक लॅबने दिला आहे, अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी एम. ए. शेख यांनी दिली.

पुणे मार्गावर ‘शीतल’

$
0
0
औरंगाबाद ते पुणे या मार्गावरील प्रवाशांची वाढलेली संख्या व उन्हाळ्यात एसी बसला वाढलेली डिमांड लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ‘शीतल’ बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे व्हॉल्वोपेक्षा कमी दरात प्रतिमाणसी ४३३ रुपयांत वातानुकूलित, आरामदायी प्रवास करता येईल.

विद्यार्थी झाले भूवैज्ञानिक

$
0
0
शासकीय विज्ञान संस्थेतील भूशास्त्र विभागाच्या सात विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत निवड करण्यात आली आहे. त्यांना कनिष्ठ भूवैज्ञानिक या पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

पन्नास संशयित ATS च्या रडारवर

$
0
0
औरंगाबादसह मराठवाड्यात विविध दहशतवादी संघटनाचे सुमारे ५० संशयित हस्तक दहशतवादी प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) रडारवर आहेत. त्याचबरोबर परदेशवारी करणाऱ्या व एक वर्ष, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ परदेशात राहून नुकत्याच शहरात परलेल्या तरुणांची माहिती घेणे सुरू केले आहे.

लोमटे खर्चात सर्वांना भारी

$
0
0
निवडणूक आयोगाने उमदेवाराला खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरीही उमेदवारांचा खर्च तपासणारा विभाग यांचा खर्चाच्या तपासणीत किती तत्पर आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत आयोगाकडे उमदेवारांनी दाखल केलेल्या खर्चामध्ये आम आदमी पार्टी असलेल उमदेवार ‘खास’ झाले आहेत.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images