Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

पैठणमध्ये खा. दानवेंना विरोध

$
0
0
जालना मतदार संघातील महायुतीचे लोकसभा उमेदवार रावसाहेब दानवे यांना प्रचारादरम्यान तालुक्यात अनेक ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागला. नियोजित जळगाव-सोलापूर लोहमार्गात पैठणच्या समावेशासंबंधी एकही शब्द न बोलल्याबद्दल ग्रामस्थ आक्रमक झाले.

औरंगाबादची कुमक मुंडेंसाठी बीडला

$
0
0
बीड मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह अनेक पदाधिकारी बीडला रवाना झालेत. त्यात काहीजण गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.

बॅलेट युनिटची डोकेदुखी

$
0
0
जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात लोकसभेसाठी रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे बेल्लारी, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, सोलापूरहून साडेचार हजार बॅलेट युनिट मागवण्यात आले, मात्र प्राथमिक तपासणीअंती यामधील २०० बॅलेट युनिट नादुरुस्त असल्याचे स्पष्ट झाले.

पाठिंब्याचा दुटप्पीपणा कशासाठी?

$
0
0
लोकसभा निवडणुकीतल्या भूमिकेबाबत पाठिंब्याचा दुटप्पीपणा कशासाठी? असा सवाल जय बाबाजी भक्तांतून विचारला जात आहे. शांतीगिरी महाराजांची निर्व्यसनी उमेदवाराला पाठिंबा द्या, ही भूमिका खरी की जय बाबाजी परिवाराचा नितीन पाटील यांना दिलेला पाठिंबा खरा, असा संभ्रम भाविकांत आहे.

महायुतीकडून दिशाभूल

$
0
0
रामदास आठवले आणि विनायक मेटे यांची व्यक्त‌िगत भलावण करून त्यांच्या चळवळीची महायुतीने दिशाभूल केली, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

‘पीडब्ल्यूडी’च्या रस्त्यांना ठेंगा

$
0
0
ऐतिहासिक औरंगाबादमधील खड्डेमय चकाचक करण्याचा राज्यकर्त्यांचा दावा पुन्हा एकदा हवेतच विरण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजूर केलेला निधीच अद्याप मिळालेला नाही.

‘शुक्राचार्यां’ना वेचून काढू

$
0
0
दिल्लीत ‘एनडीए’ची सत्ता येणारच आहे. त्यानंतर दोन-पाच महिन्यांनी राज्यातही महायुतीची सत्ता येईल. एकदा सत्ता येऊ द्या, मग समांतर जलवाहिनी, रस्त्यांचा विकास या कामांतील शुक्राचार्यांना वेचून काढू, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (१६ एप्रिल) येथील जाहीर सभेत दिला.

पर्यटकांच्या प्रतीक्षेत देखण्या प्रतिकृती

$
0
0
अंजिठा - वेरूळ लेणीतील शिल्प आणि चित्रकेलच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने जपानी सरकाच्या मदतीने ११० कोटीचे अजिंठा आणि वेरूळ अभ्यागत केंद्र तयार केले आहे. या अभ्यागत केंद्रात अजिंठा आणि वेरूळ लेण्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत.

मांदियाळी... संतांची

$
0
0
वाईन चारकोल आणि हँडमेड पेपरचा वापर करत संतांची मांदियाळी उभा करणारा चित्रकार निलेश गवळीच्या मुक्तहस्त चित्रांची न्यारी दुनिया निराला बाजार मधील तापडिया नाट्य मंदिरातील आर्ट गॅलरीत सजली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत १६ गुरुजी गायब

$
0
0
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा प्रशासकीय कारभार सांभाळणारे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी बुधवारी सकाळी अचानक भेटींचा धडाका लावला. औरंगाबाद, खुलताबाद आणि कन्नड तालुक्यांतील तीन शाळा आणि दोन पंचायत समित्यांना भेट दिली.

लोकसभा निवडणूक वाळूचोरांच्या पथ्यावर

$
0
0
तालुक्यातील बाभुळगावगंगा, पुरणगाव, वांजरगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळुची चोरी होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. निवडणूक कामात गुंतल्यामुळे महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

जीटीएलमुळे इन्व्हर्टरला ‘सोनियाचे दिन’

$
0
0
विभागीय महसूल आयुक्तालय असणारे शहर म्हणून औरंगाबादमध्ये लोडशेडिंग नाही. मात्र जीटीएलच्या कृपेमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे उष्म्यापासून बचाव करण्यासाठी इन्व्हर्टरची मागणी वाढली आहे.

पैठणमध्ये सात बुकींना अटक

$
0
0
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पैठणमध्ये मटका घेणाऱ्या बुकींविरोधात कारवाई करीत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. नऊपैकी सात बुकींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख चार हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

वखारीला आग; लाखोंचे नुकसान

$
0
0
आंबेडकरनगर भागात लाकडाची वखार व फ्रीज दुरुस्तीच्या दुकानाला बुधवारी रात्री बारा वाजता भीषण आग लागली. ही आग पहाटे पाच वाजता आटोक्यात आली. आगीत साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

लघु, मध्यम उद्योगांना सीआयआयचे पाठबळ

$
0
0
इंजिनिअरिंग क्षेत्रातील अनेक मोठे उद्योग त्यांना लागणारे पार्टस् इतर ठिकाणाहून मागवतात. हे काम काम येथील लघु, मध्यम उद्योजकांना दिल्यास सुमारे एक हजार कोटी रुपये स्थानिक मार्केटमध्येच राहतील.

रेल्वेच्या वेगात वाढ

$
0
0
मुदखेड ते आदिलाबाद आणि परभणी ते औरंगाबाद या दोन विभागात लूप लाईनची संख्या वाढवल्यामुळे रेल्वेगाड्यांचा या मार्गावरील वेग दर तासाला सरासरी तीस किलोमिटरने वाढला आहे.

भावी अभियंत्यांना कौतुकाची थाप

$
0
0
हायटेक इंजिनिअरींग कॉलेजमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ‘हायटेक यंत्रास् २०१४’ मध्ये एकापेक्षा एक सरस प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहण्यासाठी आलेल्या वीस कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या पाठिवर कौतूकाची थाप मारली आहे.

मुरूम तस्करांची रेल्वेरुळापर्यंत मजल

$
0
0
पडेगाव, मिटमिटा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बांधकामाच्या पाया भरणीसाठी वापरण्यात येणार्या मुरुमाची चोरी केली जात आहे. प्रशासनाचा धाक नसल्याने गौन खनीज तस्कारांनी रेल्वेरुळापर्यंत पाय पसरले आहेत.

झेडपी शाळांनी घेतला अभ्यासाचा ध्यास

$
0
0
जिल्हा परिषद शाळेत १९ फेब्रुवारी ते १४ एप्रिल दरम्यान ‘एकच ध्यास करू अभ्यास’ हे अभियान राबवण्यात आले. यादरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

ए. एस. क्लब चौकात गतिरोधकाची निर्मिती

$
0
0
नागपूर- मुंबई महामार्ग व नगररोडवरील ए. एस. क्लब चौफुलीवर सिग्नल ऐवजी तूर्त गतीरोधक बांधले आहेत. येथील अपघात टाळण्यासाठी सिग्नल तयार करावे, असे सिडकोला कळविण्यात आले आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images