Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

३ लाख मतदार पोलचिटपासून वंचित

$
0
0
मतदानापूर्वी प्रत्येक मतदारापर्यंत पोलचिट पोहचवण्याचा अतिआत्मविश्वास प्रशासनाला नडला आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सुमारे तीन लाख मतदारांना २३ एप्रिलपर्यंत प्रशासनाकडून पोलचिट मिळाल्या नाहीत.

बैलगाड्या ओढून फेडला नवस

$
0
0
मुकुंदवाडी येथील ग्रामदैवत आई तुळजाभवानी यात्रेस बुधवारपासून मोठ्या उत्साहात बुधवारपासून सुरुवात झाली. यावर्षी सुमारे पन्नास भाविकांनी गावाच्या वेशीपासून मंदिरापर्यंत बारा बैलगाड्या ओढून नवस पूर्ण केला. या यात्रेची परंपरा दोनशे वर्षे जुनी आहे.

‘मांजरा’च्या पाण्याची आयुक्तांकडून दखल

$
0
0
बीड जिल्ह्यातील केज तालक्यातील धनेगावच्या मांजरा धरणात पाणीसाठा तळाला गेला आहे. आज या धरणाच्या मृत साठ्यात अवघा ४.९ पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील अनेक जणांना यावर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

अण्णा हजारे धमकी प्रकरणी दोघे ताब्यात

$
0
0
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्याच्या संशयावरून लो‌हारा (जि. उस्मानाबाद) येथील दोन जणांना उस्मानाबाद व पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

जलतरणिकेकडे ओढा वाढला

$
0
0
ढगाळ हवामानामुळे सध्या औरंगाबाद शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली घसरले असले तरी उकाड्यामुळे लहान मुलांपासून थेट ज्येष्ठ नागरिकांची पावले महापालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलावाकडे वळत आहेत.

खैरेंच्या विरोधातील याचिका फेटाळली

$
0
0
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२३ एप्रिल) फेटाळली.

नियोजनाचे तीन तेरा

$
0
0
औरंगाबादची लाइफलाइन असलेल्या जालना रोडवर तीन उड्डाणपूल होणार आहेत. २४ तास प्रचंड रहदारी असलेल्या जालना रोडवर उड्डाणपूल उभारताना वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे. ती होऊ नये म्हणून नियोजित जागांच्या बाजूंनी पर्यायी रस्त्यांचे काम सुरू आहे.

चेतक घोडा लवकरच जागेवर

$
0
0
विश्वभारती कॉलनी चौकात चेतक घोडा या महिन्याच्या अखेरपर्यंत बसवला जाणार आहे. चबुतऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, ते तीन दिवसांत संपेल. घोड्याची नवीन प्रतिकृती फायबरची असली तरी तिचा लूक मेटॅलिक आहे.

एटीएम कार्ड चोरून एक लाखाला गंडा

$
0
0
पंधरा दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेल्या एका कुकने हॉटेलमालकाचे एटीएम कार्ड चोरून तब्बल एक लाख आठ हजार रुपयांला गंडा घातला. त्याने एटीएम कार्डचा वापर पनवेल व इतर ठिकाणच्या हॉटेलांमध्ये केला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोरुग्णांचे घाटी हॉस्पिटलमध्ये हाल

$
0
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मनोविकृतीशी संबंधीत बहुतांश महत्वाची औषधी मिळत नसल्याने मनोरुग्णांचे अतिशय हाल होत आहेत. गोरगरीब मनोरुग्णांना एक महिन्यापासून उपचाराविना परतावे लागत आहे.

तुपे यांची याचिका फेटाळली

$
0
0
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नाव नसल्याने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी याचिका दाखल केली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विशिष्ट मुदतीत आक्षेप नोंदवला नाही आणि शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला.

फळांचा राजा भाव खाणार

$
0
0
अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे रसदार आंबे (गावरान आंबे) बाजारात येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. परिणामी, अन्य प्रांतातून येणाऱ्या लाल बाग, बदाम आणि हापूस जातीच्या आंब्यांचे दर वाढू लागले आहेत.

लातूरमध्ये लागल्या पैजा

$
0
0
लातूर लोकसभा राखीव मतदारसंघाची निवडणूक ही लोकसभेसाठी नव्हती, तर ती होती काँग्रेसच्या देशमुख आणि भारतीय जनता पक्षाच्या निलंगेकराच्या अस्तित्वासाठी. त्यामुळे या निवडणुकीत विजयी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून रहिले आहे.

विमान प्रवाशांचा टक्का वाढला

$
0
0
औरंगाबाद विमानतळावरून दिल्ली आणि मुंबईला जाण्यासाठी तीन विमान कंपन्यांकडून सेवा दिली जाते. तिन्ही कंपन्यांनी एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या कालावधीत तब्बल साडेतीनलाख प्रवाशांचा प्रवास सुखकर केला. त्यापूर्वीच्या वर्षांपेक्षा विमान प्रवाशांच्या संख्येत सुमारे आठ हजारांनी म्हणजे दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पहिल्या मतदानाचे सेलिब्रेशन

$
0
0
‘राजकारणातील खलबतांवर आत्तापर्यंत घरातील मोठ्या व्यक्तींच्या गप्पा आम्ही सतत ऐकत होतो. आज (२४ एप्र‌िल) मतदान केल्यावर आम्हीपण मोठ्या व्यक्तींच्या रांगेत आलो आहोत. काही दिवसांपासूच आमच्या कट्ट्यावर राजकीय उमेदवारांविषयी पहिल्यांदाच चर्चा सुरु झाल्या आहेत..’ अशा भावना व्यक्त केल्या आैरंगाबादच्या ‘फर्स्ट टाइम व्होटर्स’ असलेल्या युवक-युवतींनी.

बोलक्या शिल्पांचा निर्माता

$
0
0
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकलेतून अमोल नामपल्ले या उमद्या तरुण शिल्पकाराने वेगळा ठसा उमटवलाय. राज्यातील वेगवेगळ्या शहरात अमोलने घडवलेल्या शिल्पाकृती दिमाखात उभ्या आहेत. सिडको परिसरातील स्टुडिओत या शिल्पाकृती तयार झाल्या असून नुकतंच जिराफ तयार करण्याचं काम पूर्ण झालंय.

स्टेट, सादियाची जादू चालली

$
0
0
‘मतदान झाल्याननंतर सुटीचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी दोन सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमांच्या तिकिटांवर दहा टक्के सवलत देण्यात आली होती. मतदारांमध्ये वाढलेल्या जागृतीचा उपयोग करून घेण्यासाठी सिनेमाचालकांचा हा अनोखा फंडा चर्चेचा विषय ठरला.

ज्येष्ठ म्हणतात अजून तरुण आहे

$
0
0
‘पूर्वी मतदानाला चला असे कोणी आम्हाला फारसे सांगत नव्हते. बॅलेट पेपरवर शिक्का मारायचो त्याला वेळ लागायचा. आज केवळ बटन दाबायचे आहे. सुविधांमध्ये मोठा बदल झालाय,’ अशा शब्दांत वयाच्या नव्वदीत पोहचलेले केशरचंद गंगवाल सांगत होते. अशाच भावना चंदमणबेन तापडिया, रंगनाथ अंबेकर या ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.

१० हजार रुग्णांच्या हक्कावर गदा

$
0
0
निवडणूक आयोग, केंद्र-राज्य सरकार, प्रसारमाध्यमे तसेच असंख्य संस्था-संघटनांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान जागृती केली. त्याचाच भाग म्हणून अनेक दिवसांपासून जाहिरातींचा जबरदस्त माराही सुरू होता.

निळ्या ठिपक्यानं ऊर भरून आला

$
0
0
‘पावणेबाराच्या सुमारास मतदान केलं. रितसर ओळखपत्र दाखवलं. तिथल्या कर्मचाऱ्यानं बोटाला निळी शाई लावली. मतदान यंत्राचं बटन दाबलं. बझर वाजला. हातातल्या निळ्या ठिपक्याकडं पाहत बाहेर पडलो. अन् राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याबद्दल ऊर भरून आला,’ अशी भावना मातोश्री वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांनी गुरूवारी मतदान केल्यानंतर व्यक्त केली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images