Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

धोकादायक रँपला रामराम

$
0
0
मतदान केंद्रावर बांधण्यात आलेल्या रँपला ज्येष्ठ नागरिक व अपंगांनी रामराम ठोकला. बहुतेक ठिकाणचे रँप धोकादायकच होते. त्यामुळे रँपवरून जाण्यापेक्षा पायऱ्या चढून जाणे त्यांनी पसंत केले.

कर्करूग्णाने बजावला हक्क

$
0
0
मागील वर्षभरापासून कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या एका मतदात्याने, आपले दुखः बाजूला सारून सारून मतदानाचा हक्क बजावला.

यादीतून अनेकांची नावे गायब

$
0
0
सिद्धार्थनगर असो भीमनगर भावसिंगपुरा शहरातील बहुतेक भागात मतदारांमध्ये कमालीचा उत्साह होता. महिला व तरुण मतदारांचा पुढाकार प्रामुख्याने नजरेत भरण्यासारखा होता. काही केंद्र वगळता सर्वच केंद्रावर दुपारी गर्दी होती. परंतु मतदारयादीत नावे नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही.

भरभरून मतदान

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघामध्ये मतदारराजाने गुरुवारी (ता.२४) स्वयंस्फूर्तीने मतदान केले. मतदारसंघामध्ये सरासरी ५९ टक्के मतदान झाले, असा प्राथमिक अंदाज आहे.

ही धडपड भ्रष्टाचार मुक्तीसाठी

$
0
0
‘भ्रष्टाचाराचे उच्चाटन करायचे असेल तर देशाचा नागरिक म्हणून मतदान करणे माझे कर्तव्य आहे. म्हणून दोन दिवसांसाठी का होईना मतदान करण्यासाठी ऑस्ट्रेलियातून आलो,' अशी प्रतिक्रिया गुरूवारी मतदान केल्यानंतर स्वरूप खेकाळेंनी दिली.

आधी लगीन लोकशाहीचे

$
0
0
मतदान करून काय फरक पडणार आहे, असे अनेक जण म्हणतात. मात्र ‘मतदान करा, फरक पडतो,’ असे म्हणत अतुल रंगनाथ बारगळ या नवरदेवाने लग्नाआधी वऱ्हाडासह मतदानकेंद्रावर जाऊन हक्क बजावला.

तक्रारदार कोणी पळवले?

$
0
0
सर्वसामान्य लोकांना थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे गाऱ्हाणे मांडता यावे यासाठी जनता तक्रार दिन सुरू करण्यात आला आहे. या पोलिस दरबारात हळू हळू तक्रारीच येणे बंद झाले आहे.

हक्कासाठीही कामगारांची लढाई

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे मतदान करण्यासाठी सुटी देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतरही सुटी न दिल्याने गुड ईअर कंपनीतील कामगारांनी कामावर न जाण्याचा निर्णय घेतला.

बंगालच्या मुला-मुलीची सुटका

$
0
0
पश्चिम बंगाल मधून पळवून आणलेल्या पंधरा वर्षाच्या दोन मुला मुलींची गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने मुकुंदवाडी येथून सुटका केली. या मुलांना सोडण्यासाठी एक लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नांदेडच्या आयुक्तांना नोटीस

$
0
0
विशेष शिक्षक भरतीप्रकरणी निवड होऊनही नियुक्ती न दिलेल्या प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने नांदेड- वाघाळा महापालिका आयुक्तांना नोटिस बजावण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. ए. एम. बदर यांनी दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ मे रोजी होणार आहे.

साताऱ्यात शांततेत मतदान

$
0
0
सातारा गाव व परिसरात असलेल्या मतदान केंद्रांवर गुरूवारी सकाळपासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सर्वच केंद्रावर ६० टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले. बऱ्याच नवमतदारांची नावे यादीत नसल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.

मुस्लिमबहुल भागात ५५ टक्के

$
0
0
मतदान केंद्राचा शोध, पोलचिट मिळविण्याचा संघर्ष, मतदानासाठी रांगा, अशा अनेक अडचणी पार करीत मुस्लिम बहुल भागात साधारणतः ५५ टक्के मतदान झाले.

वडगावात फेरमतदानाची मागणी

$
0
0
वाळूज व बजाजनगर परिसरातील १२९ मतदान केंद्रावर मतदान सुरळीत पार पडले. वडगाव कोल्हाटी येथील मशीनच्या क्रमवारीत बदल झाल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या ठिकाणी फेरमतदान घेण्याची मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी, सीईओ ‘साथ-साथ’

$
0
0
तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात आणि जिल्हा स्थळ असलेल्या उस्मानाबाद शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले पाहून खिन्न झालेल्या जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे व जिल्हा परिषदेच्या सीईओ सुमन रावत यांनी जिल्ह्यात विविध पातळीवरून स्वच्छता मोहीम अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन

$
0
0
जलसंवर्धनाचे अनेक कामे अनेक संस्था, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होत आहेत. लातूर जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याच काम आर्ट ऑफ लिव्हींगच्या कार्यकर्त्यानी लोकसहभागातून यंदाच्या उन्हाळ्यात सुरू केले आहे.

पालेभाज्याची वाटचाल तेजीकडे

$
0
0
नुकत्याच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतीला बसला आहे. यामध्ये ऊस, मका उन्हाळी भुईमुगसह आंबा व द्राक्ष यांचे मोठे नुकसान झाले. अशीच अवस्था पालेभाज्यांची सुद्धा झाली आहे.

तीन महिन्यांत २५ दिवस पाऊस

$
0
0
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात अवकाळी पावसाने हैदोस घातला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास ८० मिलिमीटर अवकाळी पाऊस झाला आहे. अजूनही हा पाऊस थांबलेला नाही गेल्या तीन महिन्यात उन्हाळयातील चक्क पंचवीस दिवस पावसाळी दिवस ठरले आहेत.

आघाडी, महायुतीचा विजयाचा दावा

$
0
0
परभणी लोकसभा मतदारसंघातून ६४.४१ टक्के झालेल्या मतदानानंतर आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. आघाडीचे विजय भांबळे, महायुतीचे संजय जाधव या दोन्ही उमेदवारांचे प्रमुख कार्यकर्ते आपापल्या विजयाची गणिते मांडण्यास गुंतलेली दिसत आहेत.

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीची आत्महत्या

$
0
0
घरा शेजारी राहणाऱ्या शिक्षकाशी पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पतीने संबधीत शिक्षक व पत्नीच्या नावाचा उल्लेख असलेले पत्र मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवले होते. त्यानुसार दोघा जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पाण्याचा प्रश्न संवेदनशीलतेने सोडवा

$
0
0
केज तालक्यातील धनेगावच्या मांजरा धरणाच्या मृत साठ्यात अवघा ४.९ दशलक्ष घनमीटर पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील अनेक जणांना यावर्षी पाणीटंचाइला तोंड द्यावे लागणार आहे.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images