Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

९६ टक्के मतदारांनी वापरले ओळखपत्र

$
0
0
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ओळख पुराव्याचा वापर करण्याऱ्यांची संख्या तब्बल ९६.४३ इतकी विक्रमी आहे. केवळ ३.५७ टक्के मतदारांनी इतर फोटोंचा वापर ओळख पुरावे म्हणून सादर करून मतदानाचा हक्क बजावला आहे.

एसटीची वरात निघाली अमेरिकेला

$
0
0
गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात येणार आहे. त्याशिवाय महामंडळाच्या कारभारात परिवर्तन घडवून आणण्याचा उद्देशाने एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे त्यांच्या अन्य सहकाऱ्यासह आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर निघाले आहेत.

सिनेस्टाइलने पाठलाग करून खून

$
0
0
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे दिवसाढवळ्या सिनेस्टइल पाठलाग करून खून करण्यात आला. इनोव्हा गाडीत आलेल्या मारेकऱ्यांनी सिनेस्टाइल पाठलाग करून रिवॉल्व्हर मधून गोळ्या झाडल्या.

हिंगोली मतदारसंघात प्रभाव कोणाचा?

$
0
0
हिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट हस्तक्षेप करून राजीव सातव यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याने येथील जयपराजयाला वेगळे महत्त्व आहे.

पाणी बंदच्या अफवेने धावपळ

$
0
0
नळाला आठ दिवस पाणी येणार नसल्याची अफवा पसरल्याने शुक्रवारी शहरात सर्वांनची पाणी साठवण्यासाठी धावपळ केली. परंतु नगर पालिकेने या अफवेचे खंडन केले असून कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसून पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

उच्च शिक्षणात फार बदल नाही

$
0
0
गेल्या पाच वर्षात उच्चशिक्षणात फारसा बदल झाला नाही. शासनाची उच्चशिक्षणाबद्दलची भूमिका उदासीन आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले.

दुचाकींची धडक; दोन ठार

$
0
0
दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून तीन गंभीर जण जखमी झाले आहेत. या दोन्ही दुचाकींवर प्रत्येकी तीन जण बसले होते. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडे पाच वाजता धर्म तलावाजवळ झाला.

जिल्ह्याबाहेर जाण्याचे ३८५ शिक्षकांचे प्रयत्न

$
0
0
औरंगाबाद जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ३८६ शिक्षकांनी अर्ज केले असून ५५० जण जिल्ह्यात येण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान बदलीच्या अर्जांमधील त्रुटींमुळे या आंतरजिल्हा बदल्या तूर्त थांबल्या आहेत.

मुदत संपलेल्या गाड्यातून एसटीची वाहतूक

$
0
0
औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या डेपोकडील ३५ पैकी २५ निमआराम बस जवळपास भंगारात काढण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु चेसीसचा पुरवठा होत नसल्यामुळे याच मुदत संपलेल्या या बसमधून प्रवासी वाहतूक केली जात आहे.

तीन दिवसांआड पाणी पुरवठ्यामुळे संताप

$
0
0
दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टीत वाढ करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना १ एप्रिल पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात तीन हजार पन्नास रुपये पाणीपट्टी भरावी लागणार आहे.

कार दुरूस्त करण्याचे ‘धूत मोटर्स’ला आदेश

$
0
0
खरेदी केल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांत नादुरुस्त झालेली ‘फोक्सवॅगन पोलो’ कार शहरातील वितरकाने दुरुस्त करून द्यावी, असे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने नुकतेच दिले. ‘फोक्सवॅगन’चे येथील वितरक ‘धूत मोटर्स’ ने या कारमध्ये दोष नसल्याचा दावा करून दुरुस्तीची जबाबदारी झटकली होती.

मोबाइलवर बोलणाऱ्या ४२० जणांवर कारवाई

$
0
0
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या ४२० वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

नागरिक उकाड्याने त्रस्त

$
0
0
मान्सूनपूर्व कामाच्या देखभाल दुरूस्तीत जीटीएलचे व्यवस्थापन व्यस्त झाल्यामुळे शहराच्या विविध भागातील नागरिकांना उकाड्याने त्रस्त व्हावे लागले.

वीज तुटवडा उद्यापर्यंत

$
0
0
केंद्र सरकारच्या पॉवर ग्रीड आणि राज्य सरकारच्या महापारेषण कंपनीतर्फे चारशे केव्ही विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून सुरू करण्यात आले असून ते रविवारपर्यंत चालेल.

‘कौन बनेगा खासदार’ची चर्चा

$
0
0
शुकशुकाट असलेल्या पालिकेत तब्बल दीड महिन्यांनी चैतन्य आले. लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले अन् पदाधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी मोठ्या संख्येने शुक्रवारी गर्दी केली. चहाचा फुरका घेताना आणि सिगारेटचा झुरका सोडताना, चर्चा मात्र ‘कौन बनेगा खासदार’ याचीच होती.

स्थायी’त इच्छुकांची फिल्डिंग

$
0
0
स्थायी समितीचे आठ सदस्य निवडण्यासाठी पालिकेची विशेष सभा बुधवारी (३० एप्रिल) आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होणार आहेत, त्यांच्या जागी नवीन आठ सदस्य निवडले जातील.

टक्का वाढला, ९९चा विक्रम कायम

$
0
0
लोकसभा निवडणुकीत २००४च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे, मात्र १९९९मध्ये औरंगाबाद लोकसभेतील मतदाचा विक्रम कायम आहे. १९९९मध्ये मतदारसंघात ६६.०६ टक्के मतदान झाले होते.

महिलांचे मतदान कमी

$
0
0
भरपूर जागृती करूनही लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघात पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या मतदानाचा टक्का घसरला आहे. यंदा निवडणुकीमध्ये एकूण मतदानापैकी पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी ६५.६९ असून या तुलनेत यंदा ५७.६५ टक्के महिलांनी मतदान केले.

उमेदवारांचे देव पाण्यात

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे मतदान होऊन २४ तास उलटल्यानंतर आता उमेदवारांचे देव पाण्यात गेले आहेत. शिवसेना, काँग्रेसने आपापल्या विजयाचा दावा केला आहे. शुक्रवारी दोन्ही गटातील कार्यकर्ते विजयाचे गणित मांडून आपापल्या तंबूत समाधान मिळविण्याच्या प्रयत्नात होते.

जालना मतदारसंघात भरघोस मतदान

$
0
0
लोकसभेच्या जालना मतदारसंघात १० लाख ६५ हजार ४४३ मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक १ लाख ८९ हजार ५८६ मतदान फुलंब्री विधानसभा क्षेत्रात झाले. तुलनेत सर्वात कमी १ लाख ५३ हजार १०१ मतदान जालना विधानसभा क्षेत्रात झाले.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images