Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

दोन वर्षानंतर मिळणार मुबलक ‘पॉवर’

$
0
0
पॉवर ग्रीड कार्पोरेशन व महापारेषणच्या उपकेंद्र निर्मितीमुळे पुढील दोन वर्षात औरंगाबाद ‘वीज जंक्शन’ होईल. उत्तर व इशान्य भारत आणि विदर्भात निर्माण झालेली वीज औरंगाबादमार्गे इतरत्र वळवली जाईल.

गुणवंतांना हवी तुमच्या दातृत्वाची साथ

$
0
0
अमृता सुरेश कहांडळ हिने अत्यंत कठीण परिस्थितीत मात करीत दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवले. तिचे वडील लोडिंग गाडीवर चालक, तर आई मिरची कांडप चालविते. कांडप यंत्रासाठी आईला मदत करीत अमृताने दहावीचे हे यश मिळविले. सतत वर्गात पहिली येणाऱ्या अमृताला डॉक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करायची आहे.

अनुसूचित जमातीशिवाय इतर सेवानिवृत्तांना जात पडताळणी नाही

$
0
0
मुंबई उपनगर विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या परिपत्रकामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनुसूचित जमाती शिवाय इतर कोणत्याही प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही.

जुन्या अभ्यासक्रमासाठी ‘वन चान्स प्लीज ’

$
0
0
इंजिनीअरिंगच्या जुन्या अभ्यासक्रमातील बॅचला पुढील अंतिम वर्षाच्या प्रवेशासाठी येत्या शैक्षणिक वर्षात कॅरिऑन देऊन त्यांचा पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी देण्याची मागणी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

काळ्या बाजारातील गहू जप्त

$
0
0
एपीएल योजनेचा ४० क्विंटल गहू व तांदूळ लाभार्थ्यांना वाटप न करता काळ्या बाजारात विक्री केल्या प्रकरणी वैजापूर तालुक्यातील पूरणगाव व वांजरगाव येथील स्वस्त धान्य दुकानदारांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

लोकशाही दिनी अधिकाऱ्यांची दांडी

$
0
0
नागरिकांच्या तक्रारी दूर व्हाव्यात, यासाठी होणाऱ्या लोकशाही दिनाला विभागप्रमुख गैरहजर राहत आहेत. त्यामुळे तालुक्यात लोकशाही दिन ‘दीन’ झाला असून सरकारी यंत्रणा हा लोकोपयोगी कार्यक्रम बंद पाडणार का, अशी शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.

पत्नीस जाळणाऱ्यास जन्मठेप

$
0
0
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीस जाळून मारल्याप्रकरणी रांजणगाव शेणपुंजी (ता. गंगापूर) येथील राजू विश्वनाथ जाधव (४५) यास वैजापूर येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेपेची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे.

नापास खेळाडू होणार उत्तीर्ण

$
0
0
दहावी आणि बारावीत नापास झालेल्या खेळाडूंना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. या खेळाडूंना दोन आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने सुधारित गुणपत्रिका देण्याचे आदेश न्या. रवींद्र बोर्डे व न्या. रवींद्र घुगे यांनी दिले आहेत.

ITI प्रवेशासाठी १९३८१ अर्ज

$
0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ‘आर्टिझन टू टेक्नोक्रॅट’ या योजनेंतर्गत व्यवसाय पदविका अभ्याक्रमाची पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी जाहीर करण्यात आली. यात विद्यार्थ्यांना आपला मेरीट नंबर देण्यात आला.

पैनगंगेला पूर; शेती पाण्याखाली

$
0
0
हिमायतनगर परिसरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कयाधू नदी भरून दुथडी वाहत आहे. विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेला पूर आला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

मुबलक पाणी; जागरुक नागरिक

$
0
0
उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत असलेल्या वेदांतनगर वॉर्डात फारशा नागरी समस्या नाहीत. शहराच्या इतर भागांप्रमाणे दोन दिवसांआड नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. काटेकोर वेळापत्रकाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

डान्स बार कायद्यात जाणीवपूर्वक पळवाटा

$
0
0
'राजकारणी व पोलिस अधिकाऱ्यांच्याच मालकीचे डान्स बार असल्याने कायद्यात मुद्दाम पळवाटा ठेवल्या असतील. राज्य सरकारने या त्रुटी दूर करून कराव्यात,' अशी मागणी अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत केली.

इंजिनीअरविना सिल्लोडचा PWD विभाग रिकामा

$
0
0
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील उपविभागीय कार्यालयातील तीन शाखा अभियंत्याची बदली झाली असून उपअभियंता व एक शाखा अभियंता महिन्याच्या रजेवर आहेत.

मॉडर्न मार्केटच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु

$
0
0
शेतीमालासाठी अत्याधुनिक बाजारपेठ निर्माण व्हावी, यासाठी टर्मिनल मार्केटप्रमाणे येथील जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मॉडर्न मार्केट उभारण्यात येणार असून प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे कामही सध्या जोमाने सुरु झाले आहे.

अन्नचाचणी प्रयोगशाळा शोभेपुरती

$
0
0
मुंबईनंतर राज्यात प्रथम सुरू झालेली औरंगाबादमधील अन्नचाचणी प्रयोगशाळा लोकविश्लेषकाअभावी बंद पडली आहे.

बारा महिने सुरू असते जरेवाडीची शाळा

$
0
0
बीड जिल्ह्यातील जरेवाडीची शाळा वर्षभर निरंतर सुरू असणारी शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेतील शिक्षक संदीप पवार यांच्या प्रयत्नातून ही शाळा उभी राहिली आहे.

हुदा, ब्‍ल्यू प्लॅनेट, दाना, स्टील वॉटर चा सुगंध दरवळला

$
0
0
अत्तराच्या शौकिन सातत्याने वेगवेगळ्या सुगंधी अत्तराच्या शोधात असतात. यंदा बाजारात हुदा, ब्ल्यू प्लॅनेट, दाना आणि स्टील वॉटरसारखे अत्तराचे नवीन प्रकार बाजारात उपलब्‍ध झाले आहे.

भाडेकरूचे सामान पळविणा-या घरमालकावर गुन्हा

$
0
0
बाहेरगावी गेलेल्या भाडेकरूच्या घरातील सामान पळविल्या प्रकरणी घरमालक व त्याच्या दोन मुलांवर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैनगंगेच्या पुराने ५ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान

$
0
0
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांचे अंशतः नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

'जायकवाडी'चे फोटो काढणारा ताब्यात

$
0
0
पैठण येथील जायकवाडी धरणाचे गुप्तपणे छायाचित्र काढताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images