Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 47944 articles
Browse latest View live

अळ्या निर्मूलन आणखी दोन दिवस

0
0
महापालिकेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात तयार झालेल्या अळ्यांच्या नायनाटासाठी आतापर्यंत अडीच हजार लिटर केमिकलचा वापर झाला. हे काम दोन दिवस चालणार आहे. आतापर्यंत दहा लाखांचा खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे विनोदवीर होणे नाहीत

0
0
तमाशा लोककलेला व्यापक करण्यात महत्त्वाचे योगदान असलेले वगसम्राट बाळू खाडे यांचे शनिवारी मिरज (जि. सांगली) येथे निधन झाले. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये काळू-बाळू जोडीने यशस्वी कार्यक्रम केले.

इंग्रजी पुस्तकांची बच्चापार्टीला भुरळ

0
0
उन्हाळ्याच्या सुटीत व्हीडिओ गेम्स, मोबाईल अॅप्स आणि कॉम्प्युटरच्या धबडग्यात लहान मुलांचे वाचन कमी झाल्याची ओरड होते; मात्र पुस्तकांच्या दुकानात इंग्रजी पुस्तकांची मागणी वाढल्याचे सुखावह चित्र आहे.

मामाने केला भाचीवर बलात्कार

0
0
मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बीड शहरात घडली. शहरातील नामदेवनगर भागात राहणाऱ्या चुलत मामाने भाचीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

रेल्वेला तुफान, बसला कमी गर्दी

0
0
उन्हाळी सुट्टया लागल्या असून निवडणुकही संपली आहे. त्यामुळे नागरिकांचा हॉलिडे मूड सुरू झाला असून रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे. उन्हाचा त्रास होत असल्याने रेल्वे स्थानकाच्या तुलनेत बस स्थानकात गर्दी कमी आहे.

नातू, सुनेला सक्तमजुरी

0
0
सासऱ्याला लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या सून व तिच्या मुलाला न्यायाधीश एस. एन. भोसले यांनी दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत एक वर्ष व सहा महिने सक्तमजुरी, प्रत्येकी दीड हजार व पाचशे रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत.

साडेसात लाख जप्त; चौघांना अटक

0
0
एका कारमधून साडेसात लाख रुपयांची बेहिशोबी रोकड घेऊन जाणाऱ्या अमरावती येथील चौघांना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. भोकरदन नाका परिसरात झालेल्या या कारवाईत ५ लाख रुपये किमतीची एक इंडिगो कार देखील जप्त करण्यात आली आहे.

बसस्टॉपची वाळुजमध्ये दुरवस्था

0
0
महाराणा प्रताप चौकात प्रवाशांना बसची वाट पहाण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्टॉपचा वापर चक्क चारचाकी गाड्यांच्या पार्किंगसाठी केला जात आहे. इतर बस निवाऱ्यांची पार दुरवस्था झाली आहे. कामगारांना बस येईपर्यंत थांबण्यासाठी एमआयडीसीने हा निवारा बांधण्यात आला आहे.

मतदान संपताच लोडशेडिंग सुरू

0
0
लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान संपताच महावितरणने शुक्रवारपासून लोडशेडिंग सुरू केले आहे. सरकारने निवडणुका उजेडात लढवल्या; आता मतदान होताच अंधार केल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

घाटीचे दोन कोटी बुडाले

0
0
घाटी हॉस्पिटलमध्ये डिजिटल मॅमोग्राफी मशीन घेण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने दिलेले दोन कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे बुडाले आहेत. आता या मशीनसाठी भविष्यात कधी निधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘ऑनलाइन’पेपरचा प्रवास खडतर

0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अनेक अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पाठवत आहे. यात रविवारी असलेल्या विविध अभ्यासक्रमांचा ऑनलाइन पेपरचा प्रवास तांत्रिक अडचणीमुळे खडतर झाला.

वाहनचालकांची नाकाबंदी

0
0
चाळणी झालेल्या रस्त्यांची कामे महापालिकेने जागोजागी सुरू केली आहेत. मात्र हे रस्ते करताना अनोखे नियोजन केल्याने ठिकठिकाणी वाहनचालकांची नाकाबंदी झाली आहे. मुख्य शहरात जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रांतीचौक ते पैठणगेट आणि कोर्ट ते समर्थनगर चौक या दोन रस्त्यांवरील वाहनचालक त्यामुळे बेजार झाले आहेत.

पाण्याच्या टाकीत केरकचरा

0
0
क्रांतीचौकातील पाण्याच्या टाकीचे छत एक वर्षापासून पडलेल्या अवस्थेत आहे. समांतर जलवाहिनीच्या योजनेत पाण्याच्या टाक्यांचे नव्याने काम करण्यात येणार आहे. त्यावेळी या टाकीचे काम करू, असे म्हणत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

सिडकोत महिलांचं इंग्लिश विग्लिश

0
0
पदवीपर्यंत शिक्षण घेतले, लग्न झाल्यावर प्रपंच, मग काय तर मुलांचे संगोपन, शिक्षण, नंतर त्यांची लग्न वगैरे. भारतीय महिलांचे हेच जीवन आहे. अनेकजणी तर डिग्रीपर्यंत शिक्षण घेऊनही करिअरपेक्षा कुटुंबास प्राधान्य देतात. आयुष्याची पन्नाशी गाठल्यावर आता आयुष्यात शिकण्यासारखे काय असेल असे वाटणे स्वाभाविक आहे.

मराठवाड्यात पुन्हा टंचाईचा ‘फेरा’

0
0
औरंगाबाद विभागामध्ये पुन्हा टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या असून, विभागात एप्रिलच्या अखेरीस सुमारे १३० टँकरने टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीटंचाईची तीव्रता कमी असली, तरीही पुढील महिनाभरात टँकरची संख्या वाढू शकते.

उपायुक्त पेडगावकर यांच्या बदलीचे आदेश

0
0
महापालिकेचे उपायुक्त सुरेश पेडगावकर यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ एप्रिल रोजी काढले असून, त्यांना शासनाच्या मराठी भाषा विभागात रुजू होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेत पेडगावकर वादग्रस्त ठरले होते.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ६८ कोटी रुपयांचे वाटप

0
0
जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ८१ कोटी रुपये आले असून, नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

लाइफ केअर हॉस्पिटलची उभारणी

0
0
उदगीर येथे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील रुग्णांसाठी लाइफ केअर हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. या ‌हॉस्पिटलच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आले असून अक्षय्य तृतीयापासून ( २ मे रोजी ) याठिकाणी रुग्ण सेवेलाही प्रारंभ होत आहे.

पालिकेच्या कामांचा तपशील संकेतस्थळावर

0
0
कम्प्यूटर, मोबाइल आणि आयफोनच्या युगात नागरिकांनी कार्यालयात येऊन लेखी तक्रार द्यावी अशीच एकमेव अपेक्षा न ठेवता पालिकेच्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विभागाशी संबधित उपस्थित केलेल्या शंकेला विभागप्रमुखांनी उत्तर दिले पाहिजे.

नांदेडचा पारा ४३.५ अंशावर

0
0
गेल्या दोन-तीन दिवसांत वातावरणामध्ये उष्णतेची वाढ झाली आहे. सोमवारी नांदेड जिल्ह्याचा पारा ४३.५ अंश सेल्सियस वर गेला आहे. रविवारी ४३ अंश सेल्सियस इतकी तापमानाची नोंद झाली होती.
Viewing all 47944 articles
Browse latest View live




Latest Images